Monday 9 January 2012

जि.प. व पं.स. सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 लक्ष 1 हजार 750 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

      वर्धा,दि.9– राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचयत समित्यांची सार्वत्रिक निवडणूका जाहीर केल्या असून  येत्या फेब्रुवारी 2012 ला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या कार्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 लक्ष 1 हजार 750 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
     वर्धा जिल्हा परिषदेच्या 51 गटाच्या जागेसाठी घेण्यात येणा-या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये वर्धा तालुक्यातील 11 देवळी, सेलू, आर्वी व समुद्रपूर तालुक्यातील प्रत्येक सहा कारंजा तालुक्यातील पांच, आष्टी तालुक्यातील चार व हिंगणघाट तालुक्यातील सात गटाच्या जागेचा समावेश आहे.
     वर्धा जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये 102 गणांच्या जागेसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार असून, यामध्ये वर्धा तालुक्यासाठी 22 देवळी, सेलू, आर्वी व समुद्रपूर तालुक्यासाठी प्रतयेक्ष 12, हिंगणघाट तालुक्यासाठी 14 कारंजा तालुक्यासाठी 10 व आष्टी  तालुक्यासाठी 8 गणाच्या जागेचा समावेश आहे.
      जिल्ह्यात निवडणूक मतदान यंत्राची संख्या एक हजार १८४ त्यात राखीव यंत्र एकशे एकवीस राहणार असून एकूण मतदान यंत्र 1305 निवडणूकीच्या कार्यासाठी उपयोगी ठरणारे आहेत. त्यामध्ये वर्धा तालुक्यासाठी 252 मतदान यंत्राची गरज असून त्यापेकी 229 यंत्रे ही कार्यरत तर 23 यंत्रे राखीव राहतील. देवळी तालुक्यासाठी 132 मतदान यंत्राची गरज असून त्यापेकी 120 यंत्रे कार्यरत तर 12 यंत्रे राखीव राहतील. सेलू तालुक्यासाठी 167 मतदान यंत्राची गरज असून, 151 यंत्रे कार्यरत व 16 यंत्रे राखीव राहणार आहेत. आर्वी तालुक्यासाठी 162 मतदान यंत्राची गरज असून 147 यंत्रे कार्यरत व 15 यंत्रे राखीव राहतील. आष्टी तालुक्यात 94 मतदार यंत्राची आवश्यकता असून, त्यापैकी 85 यंत्रे कार्यरत व 9 यंत्रे राखीव असतील. कारंजा तालुक्यासाठी 142 मतदान यंत्राची गरज असून, त्यापैकी 129 यंत्रे कार्यरत व 13 यंत्रे राखीव ठेवण्यात येणार आहेत. हिंणगघाट तालुक्यासाठी 174  मतदान यंत्राची गरज असून, त्यापैकी 158 यंत्रे कार्यरत व 16 यंत्रे राखीव ठेवण्यात येणार आहेत. समुद्रपूर तालुक्यासाठी 182 मतदान यंत्राची गरज असून त्यापैकी 165 कार्यरत व 17 यंत्रे ही राखीव असतील.
     जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान निर्भिड व निष्पक्षपणे व्हावे यासाठी अधिकारी व कर्मचा-यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी एकूण निवडणूक निर्णय अधिकारी आठ असून प्रत्येक तालुक्यासाठी एक या प्रमाणे कार्यरत राहणार आहे. वर्धा जिल्ह्यासाठी 1305 मतदान केंद्राध्यक्ष व 4167 मतदान अधिकारी असे एकूण 5472 अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यामध्ये वर्धा तालुक्यासाठी 252 मतदान केंद्राध्यक्ष व 1008 मतदान अधिकारी असे एकूण 1260, देवरी तालुक्यासाठी 132 मतदान केंद्राध्यक्ष व 396 मतदान अधिकारी असे एकूण 528, सेलू तालुक्यासाठी 167 मतदान केंद्राध्यक्ष व 501 मतदान अधिकारी असे एकूण 668 आर्वी तालुक्यासाठी 162 मतदान केंद्राध्यक्ष व 486 मतदान अधिकारी असे एकूण 648 आष्टी तालुक्यासाठी 94 मतदान केंद्राध्यक्ष व 282 मतदान अधिकारी असे एकूण 376, कारंजा तालुक्यासाठी 142 मतदान केंद्राध्यक्ष व 568 मतदान अधिकारी असे 426, हिंगणघाट तालुक्यासाठी 174 मतदान केंद्राध्यक्ष व 522 मतदान अधिकारी असे 696 व समुद्रपूर तालुक्यासाठी 182 मतदान केंद्राध्यक्ष व 546 मतदान अधिकारी असे एकूण 728 कर्मचारी व अधिका-यांची  निवड केली जाणार आहे.
     वर्धा जिल्हा परिषदेमध्ये एकूण 51 गटाच्या मतदार गटामध्ये 26 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी तीन अनुसूचित जमातीसाठी चार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सात व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 12 असतील. असे निवडणूक कार्यालयातील एका अहवाल नमूद आहे.

No comments:

Post a Comment