Wednesday 11 January 2012

वर्धेत ग्रंथोत्‍सव 12 ते 14 जानेवारी रोजी


    वर्धा,दि.11– माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्‍ट्र  राज्‍य साहित्‍य व संस्‍कृती मंडळ आणि जिल्‍हा शासकिय ग्रंथालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 12, 13 आणि 14 जानेवारी 2012 रोजी न्‍यू. इंग्लिश हायस्‍कूलच्‍या प्रांगणात ग्रंथोत्‍सवाचा कार्यक्रम  आयोजीत  करण्‍यात आला आहे. अशी माहिती जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी आयोजित  पत्रकार परिषदेत दिली.
     जिल्‍हा  शासकिय ग्रंथालयाच्‍या सभागृहात पत्रकार परिषद घेण्‍यात आली. त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रंथपाल सुरज मडावी, विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर उपस्थित होते.
     ग्रंथोत्‍सवाबाबत अधिक माहिती देतांना प्रशांत दैठणकर म्‍हणाले की, दिनांक 12 जानेवारी 2012 रोजी दुपारी 3 वाजता ग्रंथदिंडी शासकिय ग्रंथालय वर्धा येथून काढण्‍यात येणार असून, ही दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरुन जाईल. ग्रंथोत्‍सवाचे उदघाटन दुपारी 3 वाजता डॉ. किशोर सानप यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी नागपूर-अमरावती विभाग नागपूरचे संचालक भि.म.कौसल राहणार असून, प्रमुख अतिथी जिल्‍हाधिकारी जयश्री भोज असतील.
    सायंकाळी 7 वाजता दीपमाला कुबडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्‍यात आले असून, या कविसंमेलनात जिल्‍ह्यातील नामांकित कवि अशोक बुरबुरे, दीपक रंगारी, डॉ. पुरुषोत्‍तम माळोदे, गंगाधर मुटे, मीना कारंजेकर, दिलीप विरखेडे, डॉ. मनोहर नरांजे, डॉ. भूषण रामटेके, अरविंद पाटील, नवीन इंदूरकर, संजय ओरके,राजेश डंभारे,साधना तेलरांधे सुरकार, अनंत नांदूरकर, मंजुषा ठाकरे चौगावकर, दिलीपकुमार जिंदे, मुकुंद देशपांडे, विद्यानंद हाडके, प्रशांत झिलपे, सम्‍यक अश्‍वघोष, प्रशांत ढोले, विद्या नरेंद्र खरे, नरेंद्र डेबे,संजयकुमार भगत, स्‍कर्मिश खडसे, गंगाधर पाटील, शांता पावडे, जयश्री कोटगीरवार, ज्‍योती भगत, सुषमा पाखरे, नरेंद्र लोणकर, अविनाश पोईनकर, गार्गी गायधनी, कोमल चाफले व शोभा कदम सहभागी होणार असून, कविसंमेलनाचे सूत्र संचालन संजय इंगळे तिगांवकर करणार आहेत.
    दिनांक 13 जानेवारी 2012 शुक्रवारला दुपारी 4 वाजता कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित असून, या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष प्रा. नवनीत देशमुख राहणार आहे. 
      या कार्यक्रमात आशा निंभोरकर, प्रभाकर पाटील, मीनल रोहणकर, प्रा.किशोर वानखेडे व सुरेश राहाटे राहणार असून, सुत्रसंचालन प्रा. नरेंद्र डेबे करतील.
     सायंकाळी 6 वाजता मराठी भाषेचे बदलते स्‍वरुप वर्तमान व भविष्‍य या विषयावर परिसंवाद होणार असून, या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष डॉ. सुभाष खंडारे राहणार आहे. यामध्‍ये प्रा. शेख हाशम, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. सतीश पावडे, डॉ. वंदना पळसापुरे, डॉ. किरण नाकतोडे, डॉ. दीपक पुनसे, प्रा. राजेश देशपांडे व प्रा. दिगांबर साबळे सहभागी होतील. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन सावरकर करतील.
     दिनांक 14 जानेवारी 2012 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत बालसाहित्‍य संमेलन व दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत युवा कवि संम्‍मेलन  आयोजीत असून, या कार्यक्रमाचे संयोजन सुशीलचंद्र भालेराव, प्रभाकर पाटील, पंकज वंजारे व मनीष जगताप करतील.
     दुपारी 2 वाजता ग्रंथोत्‍सवाचा समारोपीय कार्यक्रमाचे अध्‍यक्ष श्री.बी.मोहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प.वर्धा व प्रमुख उपस्थिती राजेश खवले निवासी उपजिल्‍हाधिकारी, वर्धा असतील. यावेळी ज्‍येष्‍ठ साहित्‍यीकांचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता सत्‍यनारायण बजाज सार्वजनिक जिल्‍हा ग्रंथालय बॅचलर रोड,वर्धा येथे विदर्भ साहित्‍य संघाचा साहित्‍य  पुरस्‍कार  वितरण समारोहाचा कार्यक्रम होणार आहे.
     ग्रंथ दिंडीचे संयोजक प्राचार्य पदमाकर बावीस्‍कर, प्रदीप दाते, डॉ. उमाजी नाल्‍हे ,डॉ.शोभा बेलखोडे व बा.द.हांडे राहणार असून, शालेय चित्र प्रदर्शनीचे संयोजन मुरलीधर बेलखोडे, प्रा. मोहन गुजरकर व प्रा. चितावर असतील. अक्षर कहानी वर्ध्‍याची कार्यक्रमाचे संयोजक सुशिलचंद्र भालेराव व प्रविण धोपटे हे असतील.
    ग्रंत्‍थोत्‍सवा निमित्‍त पुस्‍तके प्रदर्शनी व विक्रीचे व बचत गटाने उत्‍पादीत केलेल्‍या वस्‍तूचे स्‍टॉल ग्रंत्‍थोत्‍सव प्रेमींसाठी खाद्य पदार्थाचे सुध्‍दा स्‍टॉल उपलब्‍ध  असतील. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्‍यात आली.
    या ग्रंथोत्‍सवाच्‍या पत्रकार परिषदेला ग्रंथोत्‍सव समितीचे सदस्‍य प्रदीप  दाते, प्रा.पद्माकर बावीस्‍कर, प्रा. शेख हासम, प्रा. नवनीत देशमुख व प्रा. स्मिता वानखेडे उपस्थित होते.
                             00000

No comments:

Post a Comment