Thursday 28 July 2016

                    बचत गटानी गृह उद्योगातून बाहेर पडावे
                                      -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø लघु उद्योग देशातील दुस-या क्रमांकाचे रोजगार निर्मीती क्षेत्र  

            वर्धा, दि.20-महि‍ला बचत गटांनी लोणचे- पापड यासारख्‍या गृहउद्योगातून बाहेर पडून कृषी आधारित प्रक्रियाउद्योग उभारण्‍यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. तुमच्‍या पुढाकारातूनच गावात उद्योगाचे वातावरण तयार करुन तुम्‍ही गावाला नवा मार्ग दाखवू शकता. यासाठी प्रशासनाच्‍या वतीने सर्व सहकार्य देण्‍याची हमी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
            सुक्ष्‍म,लघु व मध्‍यम मंत्रालयालयाअतंर्गत येणा-या एमएसएमई – विकास संस्‍था नागपूर, जिल्‍हा उद्योग केंद्र आणि महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ उद्योजक असोशियशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हॉटेल विद्यादिप रिजन्‍सी येथे गुणवत्‍ता प्रबंधन मानके आणि प्रोद्योगिक उपकरण यावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी उदघाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री. नवाल बोलत होते. या कार्यक्रमाला एमएसएमईचे संचालक पी.एम. पार्लेवार , एमआयएचे अध्‍यक्ष प्रविण हिवरे, जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यावस्‍थापक संदिप पाटील, जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक प्रमोद पवार, विषयतंज्ञ सुरेद्र चोप्रा, डॉ. प्रो. विनोद गोरंटीवार, एमएसएमईचे सहायक संचालक व्‍ही.जी. निखाडे, खादी ग्रामोद्योगचे व्‍यवस्‍थापक  उपस्थित होते.
            जिल्‍हाधिकारी म्‍हणाले, ही कार्यशाळा जिल्‍हयातील लघुउद्योजक आणि बचत गटामार्फत चालविण्‍यात येणारे गृहउद्योग यांच्‍या  गुणवत्‍ता वाढीसाठी आवश्‍यक असणारे तांत्रिक बाबी माहिती होण्‍यासाठी आयोजित करण्‍यात आली आहे. ज्‍यांना उद्योग सुरु करावयाचा आहे त्‍यांनी आपल्‍या सर्व शंकाचे निरसन विषयतज्ञांकडून करुन घ्‍यावे. ही कार्यशाळा आयोजित करण्‍याबद्दल त्‍यांनी एमएसएमईच्‍या संचालकाचे अभिनंदन केले.
            यावेळी बोलतांना श्री. पार्लेवार म्‍हणाले, लघु उद्योग क्षेत्र हे देशातील दुस-या क्रमांकाचे रोजगार निर्मिैती क्षेत्र आहे. जपान, चिन यासारखे देश लघु उद्योगामुळे विकसित झाले. म्‍हुणुनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लघु उद्योग क्षेत्राला विकसित करण्‍यासाठी स्‍टार्टअप इंडिया , स्‍टॅडंअप इंडिया , कौशल्‍य भारत, मुद्रा लोन यासारख्‍या योजना सुरु केल्‍या. कोणताही उद्योग सुरु करण्‍यासाठी सुक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्योग विकास संस्‍था मदत करु शकते. नागपूर मध्‍ये समुहविकास योजनेअंतर्गत रेडीमेट गारमेंन्‍ट  आणि दालमिल असे दोन समुह तयार केले आहेत. आपल्‍या जिल्‍हयातही अशा प्रकारचे समुह किंवा इतर योजनाच्‍या माध्‍यमातून उद्योग उभारण्‍यासाठी निश्चित प्रयत्‍न करण्‍यात येतील अशी हमी त्‍यांनी दिली.
            यावेळी प्रविण हिवरे यांनी उपस्थितांना बॅकेंचे कर्ज वेळेत परतफेड तरच यशस्‍वी उद्योजक होता येते. तसेच बॅकेचे कर्ज घेतांना अटी व शर्ती वाचूनच सही करावी आणि नवा उद्योग सुरु करतांना सर्वेक्षण करुनच सुरु करावा अशा सुचना केल्‍यात.
अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक विजय जांगडा यांनी जिल्‍हयात आतापर्यंत 2 हजार 569 लोकांना मुद्रा लोन वाटप केलेअसून मुद्रा लोन स्‍टार्टअप इंडिया, स्‍टॅंडअप इंडिया यासारख्‍या कर्ज योजनाची माहिती दिली.
कार्यक्रमाला लघुउद्योजक, आत्‍माचे प्रकल्‍प उपसंचालक दिपक पटेल, शेतकरी उत्‍पादक कंपनीचे संचालक , बचत गटाच्‍या महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्‍या. कार्यक्रमाचे संचालन व आभार व्‍ही. जे. निखाडे          यांनी केले.
                                                                              00000

                                      शासकिय वसतिगृहातील ऑन लाईन
                                             प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक
          वर्धा, दि.20- मागासवर्गीय मुला- मुलींच्‍या सर्व शासकिय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सन 2016-17 करीता समाजकल्‍याण आयुक्‍तालयाने ऑन लाईन प्रवेश अर्जासाठी सुधारित वेळपत्रक जाहिर केले आहे. शासकिय वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्‍यांनी http://mahaeschol.gov.in या संकेतस्‍थळावरील वसतिगृह या लिंक वर ऑनलाईन अर्ज भरावे. असे आवाहन सहायक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
          सदर चे ऑनलाईन अर्ज वसतिगृहानिहाय संबंधित वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्‍या कडे online पाठवावे व ऑनलाईन अर्ज भरल्‍याची एक प्रिंटआऊट संबंधित वसतिगृहामध्‍ये देण्‍यात यावी .
            शालेय विद्यार्थ्‍यांनी व 10 वी नंतर चे अभ्‍यासक्रममाध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांनी ( व्‍यवसायीक अभ्‍यासक्रम वगळून)  31 जुलै पर्यंत. 12 वी नंतर पदविका ,पदवी, पदव्‍युत्‍तर पदवी (वयावसायिक अभ्‍यासक्रम वगळून) इत्‍यादी अभ्‍यासक्रमासाठी 20 जुलै ते 8 ऑगस्‍ट दरम्‍यान अर्ज भरावे. तसेच व्‍यावसायीक अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांसाठी 3 ते 15 ऑगस्‍ट या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा असे श्री. देशमुख यांनी कळविले आहे.                                                            
                                                                        00000
           


No comments:

Post a Comment