Thursday 28 July 2016

शेतक-यांनी कर्जाचे पुनर्गठन करुन घ्‍यावे
                                     -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø जिल्‍हयात 80 टक्‍के पिक कर्ज वितरित
Ø 100 टक्‍के उद्दिष्‍ट साध्‍य करा
 वर्धा,दि 21- जिल्‍हयात राष्‍ट्रीयकृत बँकांनी खरीप हंगामासाठी शेतक-यांना 80 टक्‍के पेक्षा जास्‍त कर्ज वाटप केले आहे. ज्‍या शेतक-यांना कर्ज हवे आहे, त्‍या शेतक-यांनी त्‍वरीत जिल्‍हाधिकारी कार्यालय किंवा जिल्‍हा अ्ग्रणी बँक व्‍यवस्‍थापक यांचेशी संपर्क करावा तसेच 2015-16 साठी कर्जाचे पूनर्गठन करण्‍याची प्रक्रिया सुरु आहे.शेतक-यांनी त्‍वरीत कर्जाचे पूनर्गठन करुन घ्‍यावे  असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
सर्व राष्‍ट्रीयकृत बँकाच्‍या अधिका-यांची बैठक जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षेतेखाली पार पडली .यामध्‍ये आंध्र बँक, देना बँक, स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद, युको बँक, या बँकांनी दिलेल्‍या उद्दिष्‍टापेक्षा अतिशय कमी कर्ज वितरण केल्‍यामुळे  याबँकाना नोटीस बजावण्‍याच्‍या सुचना जिल्‍हाधिकारी यांनी दिल्‍यात. तसेच स्‍टेट बँक आफ इंडिया, अलाहाबाद बॅक , बॅक ऑफ महाराष्‍ट्र , सेट़ल बॅक , युनियन बँक, यांनी 100 टक्‍के उद्ष्टि साध्‍य केल्‍याबाबत त्‍याचे अभिंनदन केले. 31 जुलै पर्यंत उर्वरित सर्व बँकांना 100 टकके उद्ष्टि पूर्ण करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी यांनी दिलेत.
1 लाख रुपयांपेक्षा अधिक  पिक कर्ज घेण्‍यासाठी सर्च रिपोर्ट साठी बँकानी एकसमान रक्‍कम आकारावी. तसेच शेतक-यांनी एकमुस्‍त कर्जाची रक्‍कम भरल्‍यानंतरही त्‍यांना कर्ज देण्‍यास बँकानी नकार दिला. या प्रश्‍नासदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडियाशी चर्चा करण्‍यात येईल. असे त्‍यांनी यावेळी सांगितले.
त्‍याचबरोबर मुद्रा लोन चा आढावा यावेळी घेण्‍यात आला. महिलांना उद्योजक म्‍हुणन पुढे आणण्‍यासाठी  बँकानी मुद्रा लोन उपलब्‍ध करुन दयावे जुन्‍या उद्योगांसोबतच नव्‍या उद्योजकांना सुध्‍दा मुद्रा लोन दयावे. तसेच बचत गटांना सुध्‍दा लोन देतांना प्राथमिकता दयावी, अशा सुचना त्‍यांनी या बैठकीत दिल्‍या. यावेळी जिल्‍हा अग्रणी बँक व्‍यवस्‍थापक विजय जांगडा, नाबार्डच्‍या स्‍नेहल बनसोड, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, तसेच सर्व राष्‍ट्रीयकृत बँकाचे अधिकारी उपस्थित होते.
००००ुन्‍या  ी ात आला. बँकानी महिला



No comments:

Post a Comment