Thursday 28 July 2016

                        पोषण चळवळ राबवितांना लोकसहभाग घ्‍यावा
                                                           -अशोक पावडे
Ø जिल्‍हयात परसबागेची योजना प्रायोगिक तत्‍वावर राबविणार
            वर्धा, दि.19-आमचा गाव आमचा विकास या ध्‍येयानुसार काम करतांना गावात केवळ भौतिक सुविधाचा विकास करुन उपयोग नाही तर मनुष्‍याचा सर्वागण विकासाचे ध्‍येय ठेऊन नियोजन करावे. गावात गर्भवर्ती महिला व बालकांना चौरस व भरपूर आहार मिळण्‍यासाठी अक्षयपात्र आणि डोहाळजेवनाचा सार्वजनिक उपक्रम राबवावा. तसेच  पोषण चळवळ राबवितांना लोकसहभागावर भर दयावा असे प्रतिपादन  राजमाता जिजाऊ माता बाल  आरोग्‍य व  पोषण मिशन चे उपसंचालक अशेाक पावडे यांनी केले.
            जिल्‍हा परिषद सभागृहामध्‍ये राजमाता जिजाऊ मिशन आणि जिल्‍हा परिषद व महिला व बाल कल्‍याण विभाग यांच्‍या वतीने आयोजित पोषण  चळवळ या विषयावरील जिल्‍हा स्‍तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, राजमाता जिजाऊ मिशनचे एम.आय.एस. व्‍यवस्‍थापक उल्‍हास खळेगावकर, माहिती ,शिक्षण व संवाद तंज्ञ प्रफुल रंगारी, महिला व बाल कल्‍याण सभापती चंदाताई मानमोडे, शिक्षण सभापती वसंतराव आंबटकर, उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी एस.एम.मेसरे,  जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, सर्व पंयायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना श्री. पावडे म्‍हणाले प्रत्‍येक गावामध्‍ये सेंद्रिय भाजीपाला व फळे मिळण्‍यासाठी वर्धा जिल्‍हयामध्‍ये परसबागेची योजना प्रायोगिक स्‍वरुपात राबविण्‍यात येईल. गावातील गर्भवती महिला व बालकाची जबाबदारी ही गावाची जबाबदारी आहे आणि त्‍यासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्‍यात यावे. यामध्‍ये प्रत्‍येक महिना एका घटकावर केंद्रीत करावा. 20 जुलै ला प्रत्‍येक अंगणवाडी मध्‍ये गर्भवती महिलासांठी डोहाळ जेवण, 29 जुलै ला अतिरिक्‍त जेवण, ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या पहिल्‍या सप्‍ताहात स्‍तनपान सप्‍ताह, सप्‍टेंबर मध्‍ये आहाराचे नियोजनावर भर दयावा. या सर्व उपक्रमामध्‍ये लोकसहभाग महत्‍वाचा असून तो मिळविण्‍यासाठी प्रयत्‍न करावे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
            मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे मार्गदर्शन करतांना म्‍हणाल्‍या. राजमाता जिजाऊ माता –बाल आरोग्‍य कुपोषण मिशन अंतर्गत जिल्‍हयात होत असलेली ही कार्यशाळा येथील पुढील येणा-या  पिढीचा कायापालट करेल. याचा महत्‍वाचा दुवा बाल विकास अधिकारी असणार आहे. एक संपूर्ण पिढी शारीरीक व बौध्दिक दृष्‍टया विकसित करण्‍याचे श्रेय बाल विकास अधिका-यांना मिळेल. त्‍यामुळे एक ध्‍येय ठेवुन पोषण चळवळ राब‍वावी असे आवाहन त्‍यांनी सर्व अधिका-यांना केले.
खळेगावकर यांनी मुलांच्‍या वयानुसार त्‍यांची उंची आणि वजन वाढते की नाही, यासाठी प्रत्‍येक अंगणवाडी ,शाळा आणि प्रत्‍येक मुलाच्‍या घरी वय, उंची आणि वजनाचा तक्‍ता दयावा. पालकांना वय, उंची आणि वजन यांच्‍या समिकरणाचा बौध्दिक आणि शारिरीक वाढीवर कसा परिणाम होतो हे प्रात्‍याक्षिकाव्‍दारे समजावून सांगावे. मुलांच्‍या पोषणामध्‍ये आई- वडील आणि गावकरी यांचा प्रत्‍यक्ष सहभाग आवश्‍यक आहे. असेही त्‍यांनी सांगितले. तसेच यावेळी  पोषण मुल्‍य आणि आहार याविषयी थोडक्‍यात माहिती देऊन रिलायन्‍स फाऊडेंशन तर्फे राबविण्‍यात येत असलेल्‍या परसबागेच्‍या उपक्रमाची चित्रफीत दाखविली.
यावेळी प्रफुल रंगारी यांनीही समायोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमध्‍ये बोला तरी .... महिलांचे आरोग्‍य व पोषण प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले.
                                                                         0000
           
             




No comments:

Post a Comment