Thursday 28 July 2016

     पोषण आहार योग्‍य  प्रकारे मिळाल्‍यास
मानवाचा विकास शक्‍य
-         अशोक पावडे  
वर्धा,दि 22 – सकस पोषण आहार अभावी  मानवाचा विकास शक्‍य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्‍यक आहे. गावपातळीवर प्रत्‍येक घरी शासकिय कार्यालय परीसरात  परसबागे मधे   शास्‍त्रशुध्‍द सेंद्रीय पध्‍दतीने भाजीपाला व फळझाडाची  लागवड करणे गरजे आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्‍य व पोषण मिशन उपसंचालक अशोक पावडे यांनी केले.

            आज जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात  राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्‍य व पोषण मिशन अंतर्गत पोषण  आहार संदर्भात परसबाग प्रशिक्षण  कार्याशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेच्‍या उद्घाटन प्रसंगी पावडे बोलत होते. यावेळी राजमाता मिशनचे एमआयएस व्‍यवस्‍थापक उल्‍हास खळेगावकर, महिला बाल कल्‍याण चे उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी एस.एम.मेसरे, रिलायन्‍स फॉउन्‍डेशन च्‍या आश्विनी पाटील उपस्थित होत्‍या. 
            पुढे बोलतांना पावडे म्‍हणाले, गावपातळीवर असलेल्‍या अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, प्राथामिक शाळा , ग्रामपंचायत व घरोघरी लोकसहभागातून परसबाग तयार करावी. शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीचा अवलंब करुन सेद्रीय खताचा वापर करुन भाजीपाला, फळझाडे लावावी. यामुळे सध्‍या बाजारात येणा-या रासायनिक पध्‍दतीच्‍या आहाराला आळा बसून गावपातळीवर तयार करण्‍यात आलेल्‍या पोषणामुळे गर्भवती महिला, बालके यांना सकस आहार मिळून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्‍यास मदत होर्इल. पोषण आहार चळवळीसाठी राज्‍यातील 6 जिल्‍हयाचा समावेश असून वर्धा जिल्‍हा परिषदेच्‍या पूढाकराने येथे सुध्‍दा प्रायोगिक तत्‍वावर पोषण चळवळ सुरु करण्‍यात आली आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन गावपातळीवर लोकसहभाग घेऊन परसबाग तयार करण्‍याचे आवाहनही यावेळी त्‍यांनी केलेत.
            यावेळी श्री.खळेगावकर यांनी  सुध्‍दा पोषण आहार चळवळी विषयी मार्गदर्शन केले. तर रिलायन्‍स फाऊन्‍डेशनच्‍या आश्विनी पाटील यांनी परसबाग कमी जागेत, कमी खर्चात आणि सेद्रिय खत निर्मित कशी करावी यावर उपस्थित सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले.
            कार्यशाळेला जिल्‍हा परिषदचे सर्व विभागाचे विस्‍तार अधिकारी , एकात्मिक बाल विकास अधिकारी , अंगणवाडी पर्यवेक्षिका , अंगणवाडी सेविका  उपस्थित होत्‍या.
                                         0000

     आर्वी नगरपरिषद निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत 26 जुलै ला
वर्धा,दि 22 –जिल्‍हयातील आर्वी नगरपरिषदेच्‍या सन 2016-17 मध्‍ये होणा-या सार्वत्रिक निवडनुकीसाठी प्रभागाचे फेर आरक्षण 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता निश्चित करण्‍यात येणार आहे.
            आरक्षण सोडतीमध्‍ये अनुसुचित जाती , अुनसुचित जमाती मधील स्त्रियासाठी राखीव ठेवावयाच्‍या जागा, नागरिकांच्‍या मागासवर्गीसाठी (स्‍त्री आरक्षणासह) राखीव ठेवावयाच्‍या जागा व उर्वरित स्त्रियासाठी राखीव ठेवावयाच्‍या जागा यांचे आरक्षण निश्चित करण्‍यांत येईल.
            आर्वी येथील नगरपरिषद गांधी विद्यालय (ड्राईंग हॉल) येथे 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आरक्षण सोडत होणार असून यासाठी प्राधिकृत अधिकारी म्‍हणुन हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी यांची नियुक्‍ती जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली  असल्‍याचे जिल्‍हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्‍यात आले आहे.
                                                            00000
      
                        अपंगाना निःशुल्‍क साहित्‍य वितरणासाठी
                        मोजमाप शिबिराचे आयोजन
  वर्धा, दि.22- देवळी येथील पावर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेट यांच्‍या सामाजिक दायीत्‍व निधीतून कानपूर येथील  अलिम्‍कोभारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम तसेच जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने अपंग व्‍यक्‍तींना कृत्रिम अवयव व साहित्‍य वाटप करण्‍याकरिता तालुकास्‍तरावर शिबिराचे आयोजन करण्‍यात येत आहे.
            वर्धा, देवळी व सेलू तालुक्‍यासाठी सामाजिक न्‍याय भवन वर्धा येथे दि.26 जुलै रोजी, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यासाठी ग्रामिण रुग्‍णालय ,हिंगणघाट येथे दि. 28 जुलै, व आष्‍टी ,आर्वी व कारंजा तालुक्‍यासाठी ग्रामिण रुग्‍णालय आष्‍टी येथे दि.30 जुलै रोजी सदर शिबिर 10 ते 5 दरम्‍यान आयोजित होणार आहे. या शिबिरामध्‍ये अस्थिव्‍यंगांना व्‍हील चेअर, ट्रायसिकल,कॅलीपर, रोलेटर, क्रचेस, वॉकींग स्‍टीक,एडीएल कीट अंध व्‍यक्‍तींना अंधकाठी, ब्रेल स्‍लेट, ब्रेलकिंट, स्‍मार्ट काठी व वॉकींग स्‍टीक , कर्णबधिरांना श्रवणयंत्र  व मतीमंद  व बहुविकलांग व्‍यक्‍तींना सीपीचेअर, एम आर.किट अपंग व्‍यक्‍तींना  निःशुल्‍क पुरविण्‍यात येणार आहे.
शिबिरात येतांना अंपग व्‍यक्‍तींजवळ वैद्यकीय मंडळाचे अपंग प्रमाणपत्र अपंग प्रमाणपत्राचा दाखला, अपंग लाभार्थ्‍यांचे वार्षिक उत्‍पन्‍न 1 लाख 80 हजार च्‍या आत असल्‍याबाबतचे तलाठी ,तहसिलदार यांचा उत्‍पन्‍नाचा दाखला, अपंग जर पालकांवर अवलंबून असल्‍यास त्‍यांचे उत्‍पन्‍न 2 लाख 40 हजार च्‍या आत असल्‍याचा दाखला, आधार कार्ड किंवा निवडणुक ओळखपत्रे असणे आवश्‍यक.  हा लाभ घेण्‍यसाठी वयाची अट  नसून मागील तीन वर्षात कोणत्‍याही योजनेचा लाभ घेतला नसावा, अंपग दर्शविणारे रंगित पासपोर्ट साईज दोन फोटो व नुकताच काढलेला ऑडिओग्राम (फक्‍त कर्णबधिरासाठी) असणे आवश्‍यक आहे.
अधिक माहितीसाठी  0761 -2334717 , संजय मंडल 8828252181,संकेत राऊत 8093940270, पावर ग्रिड दुरध्‍वनी क्र. 011-26560112,26560121, सामान्‍य रुग्‍णालयाच्‍या दुरध्‍वनी क्रंमाक 07152-230772 , जिल्‍हा समाज कल्‍याण विभागाच्‍या या 07152-242783 या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी , जिल्‍हा परिषद यांनी केले आहे.
                                                0000

     अरविंद टेंभुर्णे जिल्‍हा नियोजन अधिकारी म्‍हणुन रुजू
वर्धा,दि 22 – जिल्‍हा नियोजन कार्यालय येथे जिल्‍हा नियोजन अधिकारी म्‍हणुन अरविंद रामभाऊ टेंभुर्णे नुकतेच  रुजू झालेले आहेत. त्‍यांनी यापुर्वी चंद्रपूर येथील ग्रामिण विकास यत्रंणा येथे सहायक प्रकल्‍प अधिकारी , गडचिरोली येथे सहायक जिल्‍हा नियोजन अधिकारी व नागपूर येथील ग्रामिण विकास यंत्रणा येथे सहायक प्रकल्‍प अधिकारी म्‍हणुन काम केलें आहे. 
                                                000

     उपोषणकर्त्‍या गृहरक्षकाच्‍या शिष्‍टमंडळाला
    महासमादेशकाचे चर्चेचे  आवाहन  
वर्धा,दि 22 –राज्‍य शासनानी गृहरक्षकाच्‍या सेवा समाप्‍ती आणि पुर्ननोदंणीच्‍या घेतलेल्‍या निर्णयावर मागील सात दिवसापासुन गृहरक्षकाचे उपोषण सुरु आहे. गृहरक्षकाच्‍या मागण्‍यासंदर्भात तोडगा काढण्‍यासाठी उपोषण करणा-या गृहरक्षकाच्‍या शिष्‍टमंडळाला होमगार्ड महासमादेशक राकेश मारिया यांनी 25 जुलै रोजी मुंबई येथील त्‍यांच्‍या कार्यालयात चर्चा करण्‍यासाठी आमंत्रित केले आहे.
महासमादेशक यांनी दुपारी 3 वाजता चर्चेसाठी वेळ दिली असून न्‍यायप्रविष्‍ट बाबीच्‍या व्‍यतीरिक्‍त इतर बाबीवर चर्चा करण्‍यास तयार असल्‍याचे कळविले आहे. याशिवाय 8 जुलै रोजी गृहरक्षकाच्‍या शिष्‍टमंडळाने महासमादेशक यांची भेट घेतली होती त्‍यावेळी शिष्‍ट मंडळाच्‍या विनंती नुसार महासमादेशक यांनी 12 वर्षाच्‍या शासननिर्णयाच्‍या अमलबजावणी व पुर्ननोंदणीच्‍या  अटीबाबतही स्‍थगिती दिली असल्‍याचे कळविले आहे.
                                                            0000



No comments:

Post a Comment