जिवनावश्यक वस्तूच्या साठेबाजीवर
आळा घालण्यासाठी पथकाची निर्मिती
वर्धा, दि.18- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील
सर्व रास्त भाव दुकानदार, केरोसीन
परवानाधारक, पेट्रोलीयम पदार्थ विक्री परवानाधारक, होलसेल धान्य, साखर व तेलबिया, दाळीचे परवानाधारक इत्यादी परवाने
तसेच त्यांचे कडील साठयाची तपासणी करण्याचे दृष्टीने व साठेबाजीस आळा घालण्याचे दृष्टीने जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार पथक निर्माण
करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्ग तसेच इतर नागरिकांना
आवाहन करण्यात येते की, सदर पथकामध्ये
कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार त्यांना
नेमुण दिलेल्या कामाकरीता सहकार्य करावे असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले
आहे.
0000
6
थकबाकीदार शेतक-यांना मिळणार मोफत कापूस बियाणे
वर्धा, दि.18- राज्य
शासनानच्या वतीने इंडियन मर्चंट्स चेंबर
पुरस्कृत बियाणे कंपणीच्या सहकार्याने पीक कर्ज घेतलेल्या व सद्या थकबाकीदार
असलेल्या शेतक-यांना एक विशेष बाब म्हणून कापूस बियाण्याचे मोफत वाटप करण्यात येणार
आहे.
जिल्हयातील
सन 2012-13 व 2013-14 मध्ये पीक कर्ज घेतलेल्या व सद्या थकबाकीदार असलेल्या
शेतक-यांना एक विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासन व इंडियन मर्चंट्स चेंबर पुरस्कृत
बियाणे कंपणीच्या सहकार्याने कापूस बियाण्याचे वाटप मोफत करण्यात येत आहे.
यासाठी शेतकरी हा सन 2012-13 व 2013-14 या वर्षात पीक कर्ज घेतलेला परंतु कर्जाची
परतफेड न करु शकल्यामुळे थकबाकीदार असाव, तसेच खरीप हंगाम 2016 करीता पिक कर्ज
मिळण्यास अपात्र असलेला असावा. तसेच शेतक-याने अद्याप पर्यत पेरणी केलेली नसावी.
अशा शेतक-यांना 20 आर.क्षेत्र मर्यादेसाठी 2 पॉकीटाच्या मर्यादेत बीजी-2 कापूस व
40 आर क्षेत्र मर्यादेसाठी 2 पॉकीटाच्या बीजी-2 कापूस बियाण्याचे मोफत वाटप कृषी
विभागामार्फत करण्यात येत आहे.
पात्र शेतक-यांच्या
यादया संबंधित बॅकेमार्फत सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात
आल्या आहेत. सदरचे बियाणे तालुकास्तरावर सर्व तालुका कृषी अधिकारी यांचे
कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
गरुजु व पात्र
शेतक-यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यकाशी अथवा तालुका कृषी अधिकारी यांचेशी
संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment