Saturday 30 July 2016

1 ऑगस्‍ट पासुन प्रशासनातर्फे  टोल फ्री क्रमांक सरु  
   वर्धा,दि 30-शासनाच्‍या विविध योजना  सामान्‍य जनतेपर्यंत पोहोचविण्‍यासाठी तसेच नागरिकांच्‍या समस्‍याचे निराकरण करण्‍यासाठी आणि नागरिकांच्‍या प्रतिक्रिया जाणून घेण्‍यासाठी टोल फ्री नंबर  जिल्‍हा प्रशासनामार्फत जिल्‍हाधिकारी कार्यालयात 1 ऑगस्‍ट पासुन करण्‍यात येणार आहे.
 शासनाच्‍या विविध योजना जिल्‍हाधिकारी प्रशासनामार्फत राबविण्‍यात येतात यामध्‍ये समाजातील दुर्लभ घटक, शेतकरी, शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त कुंटूबीय, निराधार महिला, वृध्‍द  , बेरोजगार यांच्‍यासाठीच्‍या योजनांव्‍यतिरिक्‍त नैसर्गिक आपत्‍ती व निवडणूकीसंबंधी सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी या दृष्‍टीकोणातून प्रशासनातर्फे सर्वसामान्‍यांकरिता 1800 233 2383 22 हा टोल फ्री क्रमांक नागरिकांच्‍या सेवेत येत्‍या महसूल दिनी म्‍हणजेच 1 ऑगस्‍ट पासुन उपलब्‍ध होणार आहेत. नागरिकांनी जिल्‍हा प्रशानामार्फत जे विविध उपक्रम राबविले जातात त्‍याबाबतच्‍या प्रतिक्रिया तसेच त्‍यांच्‍या समस्‍या या माध्‍यमातून उपलब्‍ध होतील हे मागचा हेतू आहे. तसेच नागरिकांच्‍या समस्‍याचे निराकरण तत्‍परतेने व्‍हावे याकरिता जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत यासाठी दोन कर्मचा-यांना स्‍वतंत्र काम सोपविण्‍यात येणार असल्‍याचे निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांनी कळविले आहे.
                                      0000



No comments:

Post a Comment