Thursday 17 March 2016

वर्धा तहसीलमधील लाभार्थ्यांना धान्य महोत्सवातच
मिळणार शेततळी योजनेच्या नोंदणीची सुविधा
Ø वर्धा तहसीलचे शुक्रवार ते रविवार शिबिर
         वर्धा, दि.17 - मागेल त्‍याला शेततळे या महत्‍त्‍वाकांक्षी योजनेच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक 29 फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागणीसाठी सुरुवात झाली आहे. तथापि वर्धा जिल्‍ह्यामध्‍ये शेतक-यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा या उद्देशाने दिनांक 18 ते 20 मार्च 2016 या कालावधीत मगनवाडी येथील एमगिरी परिसरात आयोजित धान्य महोत्सवात शेतक-यांना योजनेच्या लाभाबाबत, तसेच सातबारा, आठ अ ची नकल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली आहे.
                  तीन दिवसीय शिबिराचे आयोजन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेले आहे. या योजनेअतंर्गत तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत मागेल त्‍याला शेततळे या योजनेचे अर्ज उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.  वर्धा तालुक्‍यातील सर्व शेतक-यांनी या  योजनेचा लाभ थेट धान्य महोत्सवात घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्‍यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.     
                                                                     000000 


No comments:

Post a Comment