Tuesday 15 March 2016

जलजागृती अभियानाचा आज शुभारंभ
 जलजागृती अभियानामध्‍ये विविध संस्‍थांचा सहभाग
Ø जिल्हाधिकारी यांच्याहस्ते आज होणार उद्घाटन
Ø पाणी व्यवस्थापनावर जलतज्ञ डॉ. फडके, डॉ.ने यांचे मार्गदर्शन
Ø सप्ताहात जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम
       वर्धा, दिनांक 15 –  अल्प पर्जन्यमानामुळे राज्यात पाणी टंचाईची परिस्थिती आहे. जागतिक जल दिन 22 मार्च रोजी असल्याने या दिनाचे औचित्यसाधून टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी  दिनांक 16 ते 22 या कालावधीत जलजागृती अभियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते आज, दिनांक 16 मार्च रोजी विकास भवन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.
          उद्घाटनपर कार्यक्रमात धाम, बोर, पंचधारा, पोथरा नदीचे जलपूजन करण्यात येणार असून जलप्रतिज्ञेचे सामुहिक वाचन, वर्धा सिंचन पुस्तिकेचे विमोचन यावेळी होईल. राज्य जल सिंचन आयोगाचे माजी सदस्य डॉ. उल्हास फडके, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. दत्तात्रय वने पाण्याच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन करणार आहेत.
           कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जलतज्ञ माधव कोटस्थाने, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे विनेश काकडे, कार्यकारी अभियंता मांडवकर, अधीक्षक अभियंता जयंत गवळी, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, कार्यकारी अभियंता सु. गो. ढवळे, लघुपाटबंधारे विभागाचे अमित मेश्राम, निम्न वर्धा प्रकल्पाचे श्री. रब्बेवार, डॉ. सुभाष टाले यांची उपस्थिती राहणार आहे.    
             सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सप्ताहानिमित्त राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमाची रूपरेषा विभागनिहाय सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच वरिष्ठ भूजल वैज्ञानिक नितीन महाजन जिल्ह्यातील पाणी परिस्थिती आणि नियोजन याविषयावर सादरीकरण सादर करणार आहेत. तसेच पाणी बचत- जनजागृती चर्चासत्र होऊन कार्यक्रमाचा समारोप होईल.
                                                                                                                                                            दिनांक 17 18 मार्च  रोजी विकास भवन येथे औरंगाबादच्यावाल्मीमार्फत महिला बचत गट महिला लाभधारकांची सिंचन व्यवस्थापन जलसाक्षरता यामध्ये महिलांचा सहभाग या विषयावर दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिनांक 17 मार्च रोजी
आर्वी, देवळी, हिंगणघाट, सेलू वर्धा तालुकास्तरीय जलजागृती स्पताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे      आयोजन करण्यात आहे. दिनांक 18,19 मार्च रोजी प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, कालवे स्वच्छता श्रमदान, पाणी वापर संस्थांची नोंदणी करण्यात येणार आहे.
            दिनांक 20 मार्च रोजी  सकाळी 8 ते 11 यावेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बजाज चौक, शिवाजी चौक परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत जलजागृती पदयात्रा काढण्यात येणार आहे.  संध्याकाळी 5 ते 6 यावेळेत जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची जलजागृती  सायकल रॅली काढण्यात येणार आहे. निम्न वर्धा प्रकल्प विभाग, वर्धा-आर्वी नाका-शास्त्री चौक बॅचलर रोड मार्गे  रेल्वे, बस स्थानक, सोशालिस्ट, शिवाजी चौक, आर्वी नाका परत निम्न वर्धा प्रकल्प विभागापर्यंत सायकल रॅली काढण्यात येणार आहे.
            दिनांक 21 मार्च रोजी विभागीय उपविभागीय स्तरावर निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उपसा सिंचन परवाने वाटप शिबिर देवळी पुलगाव येथे घेण्यात येणार आहेतदिनांक 22 मार्च रोजी विकास भवन येथे सकाळी 11 वाजता महिला मेळावाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 12 ते 1.30 वाजेदरम्यान पाणी वापर सहकारी संस्थांची माहिती देण्यात येणार असून सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे, तरी या सप्ताहात जलजागृतीसाठी सर्व संस्था, संघटना, सामजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जलजागृती सप्ताहात पाणी वाचविण्याचा, नियोजनाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
0000


No comments:

Post a Comment