Monday 16 July 2012


   पिण्‍याच्‍या  पाण्‍याचे नमुने घेवून तात्‍काळ उपाययोजना करा
                                                   - शेखर चन्‍ने
                                   
*आर्वी  येथे गॅस्‍ट्रोची साथ  नियंत्रणात
          * एकाही रुग्‍णाला लागण होणार नाही  याची खबरदारी घ्‍या.
                    * 8 हजार 500 घरांची  तपासणी
                    *  मेडीक्‍लोअरच्‍या 2 हजार बॉटल वितरीत करणार
                    * उपचारानंतर 33 रुग्‍णांना सुटी

            वर्धा, दि. 16 – आर्वी येथे  दूषित पाणी  पील्‍यामुळे  झालेल्‍या  अतिसाराची (गॅस्‍ट्रो) साथ लागनमुळे  पुर्णपणे  नियंत्रणात असून, यापुढे एकाही  नागरीकाला अतिसाराची लागन होणार नाही  या दृष्‍टीने दूषित पाणी  आढळलेल्‍या  सर्व घरांची  तपासणी करुन  मेडीक्‍लोअर  या औषधाचे  वाटप करा अशा सुचना जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी आज आरोग्‍य, पाणी पुरवठा व  नगर परिषदेच्‍या अधिका-यांना दिल्‍या.
       आर्वी येथील स्‍टेशन वार्डात  अतिसाराची लागन  झाल्‍याचे  निदर्शनास  आले असून  या परिसरातील  41 रुग्‍णांना  लागन होताच तात्‍काळ  वैद्यकीय उपचार देण्‍यात आले.  त्‍यापैकी केवळ  आठ रुग्‍ण  उपजिल्‍हा‍ रुग्‍णालयात  केवळ तपासणीसाठी  भरती असून त्‍यांना त्‍यांची  प्रकृती  उत्‍तम  असून, लवकरच सुटी देण्‍यात येणार आहे.  अतिसारामुळे रुग्‍ण दगावले नसल्‍याचेही  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.
            जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी  आज तातडीने आर्वी येथे भेट देऊन आरोग्‍य, पाणी पुरवठा, महसूल तसेच आर्वी नगर परिषदेच्‍या  मुख्‍याधिका-यासह  सर्व संबंधित अधिका-यांचे बैठक घेवून  अतिसाराची लागन  झालेल्‍या  वार्डाची तसेच  तेथील पिण्‍याचे पाण्‍याचे स्‍त्रोत, दुषि‍त पाण्‍याचे नमुने व औषधाच्‍या उपलब्‍धतेबाबत  माहिती घेतली.
            आर्वी येथे महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणासह 19 विहीरी व 42 हातपंपाव्‍दारे पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यात येतो. तसेच स्‍टेशन वार्ड, शिवाजी वार्ड , दादाजी वानखडे वार्ड, वलीसाहेब वार्ड व गणपती वार्ड या  भागात  पिण्‍याच्‍या पाण्‍याचे  नमुने दूषित असल्‍याचे आढळून आल्‍यामुळे तेथील घरांची  तपासणी करावी  व मेडीक्‍लोअर  औषध  त्‍यांना उपलब्‍ध करुन द्यावे अशी सुचना यावेळी  जिल्‍हाधिका-यांनी   केली.
            उपजिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी  अतिसाराची लागन झालेल्‍या भागात  तात्‍काळ वैद्यकीय  उपचारासाठी  तात्‍पुरती  सुविधा सुरु करावी तसेच प्रत्‍येक घरातील  नागरिकांना पिण्‍याचे पाणी  उकळून प्‍यावे  तसेच पाण्‍यात मेडीक्‍लोअर  औषध  टाकूनच पाणी प्‍यावे अशा सुचना करतानाच  पिण्‍याचे पाण्‍याचे नमुने घेण्‍यासाठी  वैद्यकीय चमू  सज्‍ज ठेवावी  असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
            आर्वी शहरातील ज्‍या  भागता पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या पाईपलाईन नादुरुस्‍त आहेत त्‍या तात्‍काळ दुरुस्‍त कराव्‍यात. ड्रेनेजचे पाणी वाहून जाण्‍यासाठी  जेसीपी व्‍दारे नाल्‍या खोल कराव्‍यात, तसेच टँकरव्‍दारे पाण्‍याचा पुरवठा करावा व पाण्‍याचे क्‍लोरीनेशन करुनच नागरिकांना पिण्‍याचे  पाणी उपलब्‍ध करुन द्यावे अशा सुचनाही त्‍यांनी यावेळी दिल्‍या. स्‍टेशन वार्डासह इतर वस्‍त्‍यांनाही जिल्‍हाधिका-यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच पिण्‍याचे पाणी नियमितपणे उकळून प्‍यावे असे आवाहनही शेखर चन्‍ने यांनी यावेळी नागरिकांना दिले आहे.
                        उपजिल्‍हा रुग्‍णालयास भेट
            अतिसाराची लागन झालेल्‍या रुग्‍णांपैकी आठ रुग्‍ण उपजिल्‍हा रुग्‍णालयात भरती असून  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी  रुग्‍णांची  भेट घेऊन त्‍यांच्‍या प्रकृतीची चौकशी केली. 
            जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी विश्रामगृहात उपविभागीय अधिकारी सुनिल कोरडे, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद सोनुने ,जिल्‍हा  आरोग्‍य अधिकारी डॉ. दिलीप माने यांचेसह  वरिष्‍ठ अधिका-यांची  बैठक घेवून  अतिसाराची लागन झालेल्‍या  वस्‍त्‍यांची  तसेच दूषित पाणी , औषधोपचार आदी बाबत माहिती घेतली. महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाच्‍या जलशुध्‍दी  केन्‍द्रासही भेट देऊन पिण्‍याच्‍या पाण्‍याचे क्‍लोरीनेशन  बाबत प्रत्‍यक्ष पाहणी केली.  
         यावेळी त्‍यांच्‍या समवेत   उपविभागीय अधिकारी सुनिल कोरडे, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद सोनुने , जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दिलीप  माने, तालुका वैद्यकीय अ‍धिकारी डॉ. व्हि.आर. देवकाते, गटविकास अधिकारी डॉ. एस.डी. वानखेडे, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी श्री. सुर्यवंशी , डॉ. प्रविण ठाकरे, डॉ. सुशिल पानपुरे, जिवन प्राधिकरणाचे अभियंता सी.बी. खासबागे, तहसिलदार  अजय चरडे आदी उपस्थित होते.
                                                            0000000







No comments:

Post a Comment