Wednesday 18 July 2012

चवथी व सातव्‍या वर्गाचे शिष्‍यवृत्‍ती परिक्षेचे फार्म ऑन लाईन भरावे


       वर्धा, दि. 18 –पुर्व माध्‍यमिक व माध्‍यमिक शाळा  शिष्‍यवृत्‍ती परीक्षा 2013 दिनांक 17 मार्च 2013 ला होत असल्‍यामुळे महाराष्‍ट्र  राज्‍य परीक्षा परीष्‍द पुणे कडून परीक्षेचे साहीत्‍य प्रापत झाले असून, पंचायत समितीच्‍या  सर्व गट शिक्षणाधिका-यांना वितरीत केले आहेत. या वर्षी प्रथमतः इयत्‍ता 4 थी व 7 वी ची शिष्‍यवृत्‍ती  परिक्षेचे आवेदन पत्र ऑनलाईन भरायचे आहेत.
     सर्व अंक इंग्रजी मध्‍येच भरावयाचे असून, आवेदन पत्र महाराष्‍ट्र राज्‍य परिषदेच्‍या wwwmscepune.in  या संकेत स्‍थळांवर उपलब्‍ध  असून, आवेदन पात्रता शाळेचा अचूक संकेतांक नमुद केलयानंतरच पूर्ण आवेदन पत्र भरता येईल. आवेदन पत्र ऑनलाईन प्रिंट करुन घेऊन त्‍यावर मुख्‍याध्‍यापकाच्‍या स्‍वाक्षरीनिशी पंचायत समिती स्‍तरावर सादर करावे.
      आवेदन पत्र शुल्‍क सर्व विद्यार्थ्‍यांसाठी 10 रुपये असून परीक्षा शुल्‍क इयत्‍ता 4 थी साठी 22 रु. व इयत्‍ता 7 वी साठी 33 रु. आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांना  फक्‍त परीक्षा शुल्‍क माफ आहे. इयत्‍ता 4 थीसाठी  वयोमर्यादा 1 जूलै 12 रोजी 12 वर्षे पूर्ण नसावे. इयत्‍ता 7 वी साठी 1 जूलै 12 रोजी 15 वर्षे पूर्ण नसावे.
            आवेदन पत्र भरण्‍याची अंतीम दिनांक 31 जुलै 12 असून, विलंब शिुल्‍कासह आवेदन पत्र भरण्‍याची दिनांक 16 ऑगस्‍ट 12 आहे. एका परीक्षाकेंद्रावर 300 पेक्षा जास्‍त विद्यार्थी राहणार नाहीत तसेच गतवर्षी परीक्षा केंद्र असलेल्‍या  या वर्षी नव्‍याने परीक्षा केंद्र अस्‍तीत्‍वात येत असलेल्‍या शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकांनी दिनांक 17 मार्च 2013 ला शाळा कोणत्‍याही कार्यक्रमास देण्‍यात येऊ नये. सादर परीक्षेला जास्‍तीत जासत विद्यार्थी प्रविष्‍ठ करावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक)चे हरिदास बांबोडे यांनी केले आहे.
                                                            0000000

No comments:

Post a Comment