Wednesday 18 July 2012

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी - डॉ. सोनोने


         वर्धा, दि. 18- गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमा अंतर्गत जिल्‍ह्यात खाजगी रुगणालयात सोनोग्राफी केंद्र  कार्यरत असून या रुग्‍णालयामध्‍ये  या कायद्याचा भंग होऊ नये यासाठी  प्रभावीपणे अंमलबजावणी  करण्‍याचा  मनोदय जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलिंद सोनोने यांनी व्‍यक्‍त केला.
येथील सामान्‍य  रुग्‍णालयातील जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकाच्‍या कक्षेमध्‍ये सल्‍लागार समितीची बैठक काल संपन्‍न झाली त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. धामट, डॉ.जे.एल.शर्मा, सल्‍लगार समितीचे सदस्‍य हेमलता मेघे, प्रविण हिवरे, बि.ना.साबळे, आशाताई लोहे, अॅड. कांचन बडवाने आदी मान्‍यवर उपस्थित होते.
गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 2003 च्‍या आढावा बैठकीत सोनोग्राफी केंद्रातील तपासणी दरम्‍यान तया केंद्रातीलउनिवा व अडचणीवर चर्चा करुन जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ.सोनोने म्‍हणाले की गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमा अंतर्गत सोनोग्राफी केंद्राच्‍या शुल्‍कात केंद्र सरकारने भरिव वाढ केलेली आहे. खाजगी रुगणालयांनी सोनोग्राफीच्‍या नवीन केंद्रासाइी यापूर्वी दरवर्षी तीन हजार रुपये शुल्‍क आकारण्‍यात येत होते. आता मात्र 25 हजार रुपये शुल्‍क आकारण्‍यात येणार आहे. तसेच  त्‍या केंद्राच्‍या नुतनिकरणासाठी साडे बारा हजार रुपये शुल्‍क आकरण्‍यात येईल. तसेच खाजगी मेडीकल कॉलेज  नवीन केंद्रांना यापुर्वी 4 हजार रुपये शुल्‍क आकारण्‍यात येत होते ती रक्‍कम वाढवून आता पस्‍तीस हजार रुपये शुल्‍क आकारण्‍यात  येणार आहे. नुतनीकरणासाठी त्‍या  शुल्‍काची अर्धी रक्‍कम भरावी लागेल. मुलाच्‍या तुलनेत मुलीची संख्‍या दर हजारी कमी होत असल्‍याची खंत व्‍यक्‍त करुन डॉ. सोनाने म्‍हणाले की या समितीतील सदस्‍यांनी गर्भ लिंग तपासणी व निदान करणारी एकतरी संशयीत प्रकरण उघडकीस आणावे. त्‍या रुग्‍णाला शासनाच्‍या नियमानुसार मानधन देण्‍यात येईल तसेच  जेने करुन त्‍या खाजगी रुग्‍णालयावर पि.सी.पी.एन.डी.टी. अंतर्गत कार्यवाही करता येईल. त्‍यामुळे समाजात होणा-या स्‍त्री भ्रृण हत्‍येला आळा बसू शकेल.
      यावेळी बोलातंना प्रविण हिवरे म्‍हणाले की    स्त्रिभृण   हत्‍येला आळा घालण्‍यासाठी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्‍यक असून जागृतीचा एक भाग म्‍हणून शहरात काही  महत्‍वाच्‍या जागेवर होर्डींग लावण्‍याची अनुभमती प्रदान करण्‍याचे आवाहन त्‍यांनी समितीला केले असता ती मान्‍य करण्‍यात आली.
          गेल्‍या बैठकीमध्‍ये जिल्‍ह्यातील पाच सोनोग्राफी केंद्रांना पी.सी.पि.एन.डी.सी. अधिनियमाअंतर्गत तपासणीत उणीवा आढळल्‍यामुळे  कारणे  दाखवा नोटीस बजावण्‍यात आलया होत्‍या . आता त्‍या  सोनोग्राफी केंद्रानी अधिनियमाचे पालन केल्‍यामुळे त्‍यांना केंद्र सुरु करण्‍यची अनुमती प्रदान करण्‍याचा ठराव  पारीत करण्‍यात  आला. यामध्‍ये हिंगणघाट येथील 3, वर्धा येथील एका केंद्राचा समावेश आहे. मात्र ज्‍या सोनेाग्राफी केंद्राने अधिनियमाचे उल्‍लंघन केले आहे. ज्‍यांना सोनोग्राफी केंद्र सुरु करण्‍याची अनुमती नाकारण्‍यात आली यामध्‍ये पुलगांव येथील एका केंद्राचा समावेश आहे. डॉ. जयश्री गाठे यांनी रुगणालयातून राजीनामा दिला असल्‍यामुळे त्‍यांच्‍या जागी अध्‍यक्ष म्‍हणून डॉ. शिल्‍पा पांडे यांच्‍या नियुक्‍तीला  सर्व सदस्‍यांना मान्‍यता दिली.
यावेळी स्त्रि भ्रृण हत्‍या होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करावे असे आवाहन जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक मिलिंद सोनाने यांनी केले.
            या बैठकीला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                            00000000

No comments:

Post a Comment