Friday 13 July 2012

आरोग्‍य केन्‍द्रात लावणार मुलांच्‍या जन्‍माचा तपशिल मुलगी वाचवा अभियानाचा शुभारंभ


            वर्धा,दि.13 – मुलींच्‍या जन्‍माचे  स्‍वागत करतानाच  मुलगा व मुलगी  एकसमान  आहेत. मुलींच्‍या  संगोपनाकडे  पालकांनी  विशेष  लक्ष  वेधन्‍यासाठी मुलगी वाचवा  अभियानाचा  शुभारंभ   जि.प.चे अध्‍यक्ष  नानाभाऊ ढगे यांच्‍या  हस्‍ते झाला.
            यावेळी  जिल्‍ह्यातील  सर्व आरोग्‍य केन्‍द्रामध्‍ये  मुले व मुलींच्‍या  महिन्‍यात झालेल्‍या  जन्‍माची  माहिती दर्शविणारा लिंग गुणोत्‍तर  तक्‍ता   लावण्‍यात येणार असून  या  अभिनव उपक्रमाचे  उद् घाटन  मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांच्‍या हस्‍ते यावेळी  करण्‍यात आला.
            जागतिक लोकसंख्‍या  दिनानिमित्‍त  मुलगी वाचवा, मुलगा व मुलगी एकसमान या  घोषवाक्‍याचा प्रसार व्‍हावा  तसेच स्त्रिभृण हत्‍या हा अत्‍यंत  चिंतेचा व संवेदनशिल विषय असून  याबाबत  समाजामध्‍ये  जागृती  निर्माण करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी जनजागृती  रॅली काढली होती.
            यावेळी जि.प. अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक  डॉ. सोनाने, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. माने, आरोग्‍य सभापती  उषाकिरण थुटे, सदस्‍य  श्री. मंगेकर आदि उपस्थित होते.
             जिल्‍ह्यातील सर्व आरोग्‍य केन्‍द्रामध्‍ये आरोग्‍य केन्‍द्राच्‍या परिसरात एकूण झालेल्‍या  बालकांचे जन्‍म त्‍यापैकी  मुलींची  व मुलांची  स्‍वतंत्र माहिती  ठळकपणे प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे. समाजामध्‍ये  कमी होत असलेले मुलींचे प्रमाण  हे या बोर्डाच्‍या माध्‍यमातून  सर्वसामान्‍य जनतेपर्यंत पोहचावे तसेच  मुलगी वाचवा या अभियानामध्‍ये  सर्व जनतेचा सहभाग वाढावा  व मुलीच्‍या जन्‍माचे सर्वांनी स्‍वागत करावे हा संदेश जिल्‍ह्यातील प्रत्‍येक घरी पोहचावा अशी अपेक्षा या उपक्रमाची असल्‍याची  मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी सांगितले.
            यावेळी  आरोग्‍य सेवेसाठी  उत्‍कृष्‍ठ कार्याबद्दल  डॉ. आनंदीबाई पुरस्‍काराने प्राथमिक आरोग्‍य केन्‍द्र साहूर, कन्‍नमवार ग्राम , कानगाव तसेच उपकेन्‍द्र पाणवाडी , तारासावंगा, सालदरा व पुलगाव ग्रामीण रुग्‍णालयास गौरविण्‍यात आले.
            यावेळी उत्‍कृष्‍ट काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचाही मानचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात आले. एकाच मुलीच्‍या जन्‍मानंतर कुटूंब नियोजन  शस्‍त्रक्रिया करणा-या 10 पतीपत्‍नींचा  विशेष सत्‍कार करण्‍यात आला.
            कार्यक्रमाचे संचलन  श्री. चौधरी तर आभार प्रदर्शन डॉ. शयामसुंद निमगडे यांनी केले. डॉ. विलास आकरे, डॉ.संदीप नखाते, डॉ. नंदकिशोर कोल्‍हे आदी  यावेळी उपस्थित होते.
                                                     000000

No comments:

Post a Comment