Tuesday 10 July 2012

अनुसूचित जाती व नवबौध्‍द युवक युवतींना सैन्‍य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण


       वर्धा, दि.10- सामाजिक न्‍याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्‍द युवक , युवतींना सैन्‍य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र श्री. हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळ, अनुमान व्‍यायाम नगर, अमरावती येथे आयोजित केलेले आहे. सैन्‍य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण वर्गातील दुसरी बॅच दि. 1 ऑगस्‍ट 2012 पासुन सुरु करण्‍यता येत आहे.याकरीता विहीत नमुण्‍यात अर्ज मागविण्‍यता येत आहे.
     सदर प्रशिक्षणाचाकालावधी हा तीन महिन्‍याचा असून, सदर प्रशिक्षण हे निवासी स्‍वरुपाचे राहणार आहे. संबंधीत संस्‍थेमध्‍ये प्रशिक्षणार्थ्‍यास  स्‍वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. त्‍यासाठी कोणतही प्रवास भत्‍ता देण्‍यात येणार नाही.
     सदर प्रशिक्षणाकरीता शेक्षणिक पात्रता व शारीरिक क्षमता पुढील प्रमाणे असावी.  शैक्षणिक पात्रता सैन्‍य भरतीसाठी  10 वी पास, शारीरिक क्षमता, उंची 168 से.मी. च्‍या पुढे, छाती 79.84 से.मी., वजन 50 किलो, वयोमर्यादा 18-23 वर्ष, पोलिस भरतीसाठी  शैक्षणिक पात्रता 12 वी पास, उंची 165 से.मी. च्‍यापुढे, छाती 79.84 से.मी., वजन 50 किलो आणि वयोमर्यादा 18-23 वर्ष असेल.
     सदर प्रशिक्षण पूर्ण करण्‍याबाबतचे व प्रशिक्षण अर्धवट सोडल्‍यास त्‍याच्‍यावर खर्च करण्‍यात  आलेली रक्‍कम वसुल करण्‍यात  येईल अशा खर्चाचे हमीपत्रक रु. 100 च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर लिहून घेण्‍यात येईल. अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकातील सैन्‍य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता इच्‍छुक  युवक युवतींनी आपले अर्ज सहायक आयुक्‍त, समाज कल्‍याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, सेवाग्राम रेल्‍वे सटेशन रोड, वर्धा येथे दिनांक 27 जुलै 2012 पर्यंत सादर करावेत. असे सहाय्यक आयुक्‍त समाज कल्‍याण, वर्धा कळवितात.
                                                              00000

No comments:

Post a Comment