Friday 13 July 2012

कवच राष्‍ट्रीय कृषि पीक विमा योजनेचे


शेतक-याने  शेतात  पेरलेल्‍या पिकांना विम्‍याचे  संरक्षण मिळावे  यासाठी  राष्‍ट्रीय  कृषि पीक विमा योजनेतर्फे  जिल्‍ह्यातील खरीप ज्‍वारी , सोयाबीन, तुर व कपाशी  या पिकांचा पीक विमा योजनेमध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे.शेतक-यांनी  शेतात पेरलेल्‍या पिकांना विम्‍याचे  संरक्षण मिळावे यासाठी  31 जुलै पर्यंत  या योजनेमध्‍ये सहभागी होणे आवश्‍यक आहे.
          वर्धा जिल्‍ह्यात राष्‍ट्रीय पीक विमा योजना  राबविण्‍यात येत असून  या योजनेमघ्‍ये वर्धा जिल्‍ह्याती ल  सुमारे  2 लक्ष 46 हजार 899 शेतक-यांनी    आतापर्यंत सहभाग घेतला आहे. पीक विमा योजनेसाठी  वर्धा जिल्‍ह्यातील शेतक-यांना विशेष सवलतीचा विमा हप्‍ता  असून यामध्‍ये  अल्‍प व अत्‍यल्‍प शेतक-यांना  कापूस पिकासाठी  75 टक्‍के तर इतर शेतक-यांना 50 टक्‍के विशेष सुट देण्‍यात आली आहे. तसेच इतर सर्व पिकांमध्‍येही  विमा हप्‍ता  निश्चित  करण्‍यात आला आहे.
            जिल्‍ह्यातील खरीप ज्‍वारी , सोयाबीन, तुर व कपाशी पिकाकरीता राष्‍ट्रीय कृषि पीक विमा योजना सर्व तालुक्‍यासाठी  असून  आर्वी, आष्‍टी  व कारंजा या तीन तालुक्‍यातील  तर भुईमुंग पिकासाठी  ही योजना आहे. आर्वी, वर्धा, सेलू, देवळी  ऊसपूर्व हंगामी व ऊसखोडवा तसेच  चार तालुक्‍यांमध्‍ये  ऊस पिकाचा समावेश करण्‍यात आला आहे.  तालुका कृषि अधिका-यांकडे कृषि पीक योजनेमध्‍ये समावेश असलेल्‍या पिकांची माहिती  उपलब्‍ध आहे.  खरीप हंगामात या योजनेत सहभागी होण्‍यासाठी  31 जुलै  ही अंतीम  तारीख आहे.
            ऊस पिकासाठी  लावणीपासून एक महिना किंवा  31 डिसेंबर 2012  तसेच ऊस खोडवा करीता 31 मे 2013  व सुरु ऊसाकरीता  31 मार्च 2013 पर्यंत सहभागी व्‍हायचे आहे.  मागील वर्षी या योजनेमध्‍ये  17 हजार 316 हेक्‍टर क्षेत्रावर 13 हजार 98 शेतकरी  सहभागी  झाले आहेत. पीक विमा योजनेमध्‍ये  खरीप ज्‍वारीसाठी  60 टक्‍के जोखीमस्‍तर (संरक्षण)  असून  7 हजार 300 रुपये  ही संरक्षीत रक्‍कम असून शेतक-यांना केवळ 183 रुपये विम्‍याचा हप्‍ता भरावा लागणार आहेत. वर्धा जिल्‍ह्यातील शेतक-यांना यामध्‍ये  50 ते 75 टक्‍के पर्यंत सवलत आहे.  सोयाबीन पिकासाठी  60 टक्‍के  जोखीम असून 11 हजार रुपये  विम्‍याचे  संरक्षण आहे. यासाठी  वर्धा जिल्‍ह्यातील अल्‍प व अत्‍यल्‍प शेतक-यांना 193 रुपये तर इतर शेतक-यांना 385 रुपये  हा सवलतीचा हप्‍ता  भरावा लागणार आहे.                                                                                                    पिकांना विम्‍याचे कवच 
पिकाचे नाव व जोखीम स्‍तर
विमा संरक्षीत रक्‍कम
शेतक-यांना पडणारा विमा हप्‍ता
वर्धा जिल्‍हयातील शेतक-यांसाठी
          सवलतीचा हप्‍ता
अल्‍प /अत्‍यल्‍प
इतर
ख.ज्‍वारी - 60 %
7300
183
92
183
तुर -60 %
14300
358
179
358
भुईमुंग-60 %
15600
546
273
546
सोयाबीन-60 %
11000
385
193
385
कापुस-80 %
20700
1149
287-75 %
575-50 %
ऊस पुर्व हंगामी -80 %
97000
6160
3080
6160
ऊस-सुरु -80 %
90500
6697
3349
6697
ऊस खोडवा -80 %
78100
6209
3105
6209

            कापूस पिकासाठी 80 टक्‍के  संरक्षण असून  20 हजार 700 रुपये विमा संरक्षीत रक्‍कम आहे. वर्धा जिल्‍ह्यासाठी अल्‍प व अत्‍यल्‍प  शेतक-यांना 75 टक्‍के म्‍हणजे  287 रुपये  विम्‍याचा हप्‍ता  असून इतर शेतक-यांना 50 टक्‍के  म्‍हणजे 575 रुपये  सवलतीचा विमा हप्‍ता  राहणार आहे.  याचप्रमाणे तूर, भुईमुंग, सोयाबीन, ऊस आदी पिकांनाही   पिक विमा योजनेचे कवच  मिळणार आहे.
            पिक विमा योजना पिक कापनी प्रयोगाच्‍या  उत्‍पन्‍नावर आधारीत असून हवामान आधारीत  पिक विमा योजनेचा या योजनेशी  संबधीत नाही. कर्जदार  व बिगर कर्जदार दोन्‍ही शेतकरी  कृषि  पिक विमा योजनेत सहभागी होऊ शकतात.  त्‍यामुळे  शेतक-यांच्‍या संरक्षणासाठी असलेल्‍या या योजनेचा लाभ  जिल्‍ह्यातील सर्व शेतक-यांना घेणे आवश्‍यक आहे.  कृषि विभागातर्फे  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाऊसाहेब ब-हाटे तसेच जिल्‍हा कृषि अधिकारी, व तालुका कृषि अधिकारी यांच्‍या कार्यालयामध्‍ये राष्‍ट्रीय कृषि पिक योजने बाबतीची संपूर्ण माहिती उपलब्‍ध आहे. शेतक-यांना पिकाच्‍या संरक्षणासाठी असलेल्‍या  या राष्‍ट्रीय पिक विमा योजनेत सहभागी होऊन शेतातील पिकांना विम्‍याचे कवच  मिळवून देणारी ही योजना शेतक-यांसाठी  निश्चितच उपयुक्‍त आहे.

-          अनिल गडेकर

                                                   000000000 

No comments:

Post a Comment