Friday 6 July 2012

जिल्‍हयातील तिर्थस्‍थळाच्‍या विकासासाठी कटिबध्‍द -रणजित कांबळे



        वर्धा दि. 6 – जिल्‍हयात अनेक पौराणिक मंदीरे असून  त्‍यांचा संबध अनेक भाविकांशी जुळलेला आहे. ही मंदीरे त्‍यांचे श्रध्‍दास्‍थान म्‍हणून गणले गेले आहे. भाविकांना देण्‍यात येणा-या मूलभूत सोयीमध्‍ये वाढ करण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशिल असून जिल्‍ह्यातील तिर्थस्‍थळांच्‍या  विकासासाठी आपण कटिबध्‍द असल्‍याची भावना पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभाग व पर्यटन विकास विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी व्‍यक्‍त केल्‍या.
         काल तिर्थक्षेत्राच्‍या क वर्ग अंतर्गत देवळी तालूक्‍यातील श्रीक्षेत्र एकपाळ येथील हनुमान मंदीर देवस्‍थानच्‍या सभामंडपाचा लाकार्पन सोहळा  व शिलाण्‍यासाचे  उदघाटन  त्‍यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, पं.सं. देवळीचे सभापती दिनेश धांदे, उपसभपती मंगलाताई इंगळे,जि.प.सदस्‍य मोरेश्‍वर खोडके एकपाळा देवस्‍थानचे अध्‍यक्ष प्रकाश कादोरकर आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.  
        एकपाळा देवस्‍थानासोबत 20 ते 25 गावे जुळलेली असल्‍यामुळे या ठिकाणी शनिवारी व रविवारी मोठया संखेने भावीकांचे आगमण होत असल्‍याचे सांगून राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की भाविकांना उन,वारा व पाणी या ऋतूपासून संरक्षण मिळावे यासाठी आमदार निधीतून सभामंडपाचे  बांधकाम करण्‍यात आले. भाविकांना स्‍वयंपाकाच्‍या सोयीसाठी पुरकअनुदान मंजुर करण्‍यात येणार आहे.जिल्‍हा नियोजन समिती  विकासा अंतर्गत तिर्थक्षेत्राच्‍या विकासा अंतर्गत नांदोरा देवस्‍थानासाठी  15 लक्ष वायगांव येथील देवस्‍थानासाठी 10 लक्ष रुपये मंजुर करण्‍यात आले असून  हनुमान मंदिराच्‍या देवस्‍थानात भाविकांच्‍या सोयी सुविधेसाठी 40 लक्ष मंजुर करण्‍यात आले. कापसी देवस्‍थान येथील भाविकांच्‍या सोयी व सुविधेसाठी 10 लक्ष रुपये याआधी देण्‍यात आले असून आता 10 लक्ष रुपये मंजुर करण्‍यात येणार आहे. जिल्‍हयामध्‍ये हिंगणघाट तालूक्‍यातील आजणसरा येथील देवस्‍थानावर  मोठ्या प्रमाणावर श्रध्‍दा ठेवणारा वर्ग आहे. त्‍या ठिकाणी  हजारो भाविक येत असतात. या ठिकाणाला  शासनाने पर्यटन स्‍थळाचा दर्जा दिला असून भाविकांच्‍या सोयी व सुविधेत वाढ करण्‍यासाठी तीन कोटी रुपये मंजुर करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यातील  अनेक तिर्थक्षेत्र दुर्लक्षित राहणार नाही याकडे लक्ष देण्‍याची गरज असून विस्‍वस्‍त मंडळाने शासनाकडे विकासाबाबत प्रस्‍ताव दिल्‍यास त्‍यांना टप्‍या टप्‍याने अनुदान मंजुर करुन देण्‍यात  येईल. त्‍यामुळे भाविकांना  सोयी  सुविधा  पुरविल्‍या जातील. जिल्‍ह्यात पाऊस कमी झाल्‍याची चिंता व्‍यक्‍त करुन राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की, येत्‍या काही दिवसात पाऊसमाणात वाढ होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे हवालदिल झालेल्‍या शेतक-यांना दिलासा मिळेल. पावसावर पिकाचे नियोजन करणे हे शेतक-यासाठी आवश्‍यक असलेली बाब आहे. सिंचनाशिवाय शेती परवडण्‍यासारखी नसल्‍याचे नमूद करुन राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की, देवळी तालुक्‍यातील सिंचन प्रकल्‍प पूर्ण होण्‍यास 4 ते 5 वर्षाचा कालावधी                      लागणार आहे. येत्‍या वर्षापासून टप्‍या टप्‍याने 5 हजार हेक्‍टरवर सिंचनाची सोय निर्माण करण्‍यात येईल. असे त्‍यांनी सांगितले. वर्धा नदीवर  पुलगांव परिसरात बॅरेक्‍स बांधण्‍याच्‍या कामाला वेग आला असून खर्डा येथीही  बॅरेक्‍स बांधकाम होणार आहे.त्‍यामुळे पिण्‍याच्‍या पाण्‍यासोबत शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्‍ध होणार आहे.त्‍यामुळे येत्‍या दोन तीन वर्षात देवळी तालुक्‍याचे चित्र पालटणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
        जिल्‍हा परिषदचे अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, तिर्थस्‍थळाच्‍या विकासामुळे भाविकांमध्‍ये आनंदाचे वातावरण पसरले  असून भाविकांना मिळणा-या मुलभूत सोईमध्‍ये वाढ झाली असल्‍याचे ते म्‍हणाले.
        याप्रसंगी सभापती धांदे , गफ्फार शेख व प्रकाश कादोरकर, यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य मोरेश्‍वर खोडके यांनी केले. संचलन मनिष खोडके व आभार गुलाब डफरे यांनी मानले.यावेळी जिल्‍हा परिषद व पंचायत समितीचे सदस्‍य व परिसरातील ग्रामस्‍थ मोठया संखेने उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment