Monday 2 July 2012

कृषि दिन मोठ्या उत्‍साहाने साजरा कृषी विकासाच्‍या योजना शेतक-यापर्यंत पोहचवा - जि.प.अध्‍यक्ष


      वर्धा दि.2- कृषि क्षेत्रामध्‍ये नवनविन तंत्रज्ञान येत असून या बाबतची संपूर्ण माहिती गावातील शेतक-यांना मिळत नाही. तसेच कृषी विभागाच्‍या नवनविन योजना बाबत शेतकरी अनभिज्ञ असतात यासाठी कृषि विभागाने गांव, शहर व जिल्‍हा पातळीवर मेळावे व कार्यशाळा घेवून कृषि विकासाच्‍या इतंभूत योजना शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यात याव्‍या असे आवाहन जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी केले.
     येथील विकास भवनात काल महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्‍म दिवस म्‍हणून कृषि दिन म्‍हणून कृषि विभागाकडून साजरा करण्‍यात आला त्‍याप्रसंगी उदृधाटक म्‍हणून ते बोलत होते.
     यावेळी मंचावर जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, जि.प.उपाध्‍यक्ष संजय कामनापूरे, सभापती प्रा. उषाकिरण थुटे, सभापती नंदश्‍किशोर कंगाली, सभापती निर्मलाताई बिजवे, वर्धा पं.स. सभापती धर्मशिल जगताप, उपसभापती संदेश किटे आदि मान्‍यवर उपस्थित होते.
     राज्‍यातील दुष्‍काळी परिस्थितीवर मात करण्‍यासाठी स्‍व. वसंतराव नाईक यांनी बहुमोलाचे कार्य करुन कृषि क्षेत्रामध्‍ये हरित क्रांती घउविली असल्‍याचे सांगून जि.प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की यंदा पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीसाठी उपयेागी पडणारे बि-बियाणे व रासायनिक खतेसुध्‍दा महाग झाली आहे. त्‍यामुळे शेतकरी अस्‍वस्‍थ झाला आहे. शेतकरी सुखी समृध्‍द व्‍हावा यासाठी शेतक-याच्‍या शेतीच्‍या उत्‍पादन खर्चाच्‍या आधारावर  भाव मिळावा अशी मागणी करुन ते म्‍हणाले की कृषी विभागाच्‍या येाजना अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी  प्रयत्‍न करावा असे  आवाहन  त्‍यांनी केले. 
     यावेळी बोलतांना उपाध्‍यक्ष  कामनापुरे म्‍हणाले की, वसंतराव नाईक यांना आजही हरितक्रांतीचे प्रणेते म्‍हणून संबोधिल्‍या जाते. त्‍यांनी केलेले कार्य शेतीसाठी नवि दिशादर्शक म्‍हणून समजण्‍यात येत असून, त्‍यांनी केलेल्‍या  कार्याची  प्रेरणा शेतक-यांनी अंगिकारावी अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.  
 याप्रसंगी बोलताना जि.प.चे मुख्‍य काय्रकारी अधिकारी शेखर चन्‍ने म्‍हणाले की आपला देश कृषि प्रधान असून, 50 टक्‍के पेक्षा अधिक सकल उत्‍पन्‍न हे कृषि क्षेत्रापासून येत होते. आता मात्र कृषि क्षेत्रावर अवलंबून असलेल्‍या लोकसंख्‍येचे प्रमाण कमी होत आहे. कृषीवर आधारीत सेवा क्षेत्र व उद्योगाच्‍या विस्‍तारीकणामुळे देशाची प्रगती साधली जात आहे. शेतीमध्‍ये सुधारणा करण्‍यास बराच वाव असून शेतक-यांनी शासनाने कार्यान्वित केलेल्‍या कृषी क्षेत्रासाठीच्‍या योजना स्विकारुन शेतक-यांनी आपले जिवनमान उंचावले पाहीजे. पावसाने दडी मारल्‍यामुळे शेतकरी विंवचनेत सापडला आहे. शेतीच्‍या सिंचनासाठी गेल्‍यावर्षी एक हजार पाचशे विहीरी मंजूर करण्‍यता आलेल्‍या होत्‍या. पुढील वर्षी सिंचनासाइी दुप्‍पट विहीरीचे नियेाजन प्रस्‍तावित आहे. या विहीरीमुळे शेतीची  सिंचन क्षमता वाढून अधिक उत्‍पन्‍न शेतक-यांना घेता येईल. शेततळे, शेताजवळील नाल्‍याचे खोलीकरण तसेच नदी व नाल्‍याचे पाणी अडवून जलसंधारणाचा कार्यक्रम तसेच पउीक जमीनीवर व बांधावर झाडे लावण्‍याचा व फळबागाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्‍यात येणार आहे. असेही ते म्‍हणाले.
      तत्‍पूर्वी महाराष्‍ट्रचे माजी मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण , वसंतराव नाईक व पंजाबराव देशमुख यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पन करुन अभिवादन केले तसेच मान्‍यवरांचया हस्‍ते दिप प्रजवलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्‍यात आले.
कार्यक्रमाचे संचलन कडू यांनी तर प्रास्‍ताविक भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन आर.के. गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला जि.प. सदस्‍य, पं.स.सदस्‍य व शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                             000000



No comments:

Post a Comment