Monday 2 July 2012

वर्धा जिल्‍हा कुपोषणमुक्‍त करा - पालकमंत्री राजेंद्र मुळक




·        कुपोषणमुक्‍त 77 गावातील लोकप्रतिनिधींचा गौरव
·        77 लाख 76 हजार बालके सर्वसाधारण श्रेणीत
·        बालकांना व मातांना पोषण आहार
·        शंभर नविन आंगणवाड्यांसाठी 1 कोटी अनुदान

वर्धा, दि. 2- माता व बालकांना पुरेशा पोषण आहार मिळत नसल्‍यामुळे बालके कुपोषणाच्‍या विळख्‍यात अडकतात. याला सामा‍जिक, आर्थिक व आरोग्‍य हे पूर्णपणे जबाबदार असून समाजात गंभिर समस्‍या निर्माण झाली आहे. कुपोषण मुक्‍त गाव अभियाना अंतर्गत 75 गावांना परीतोषिके देण्‍यात आली असून यापुढील लक्ष संपूर्ण वर्धा जिल्‍हा कुपोषणमुक्‍त करण्‍यासाठी लोकप्रतिनिधी सोबत शासकीय कर्मचा-यांनी आपल्‍या स्‍तरावर प्रयत्‍न करावे असे आवाहन वित्‍त व नियेाजन विभागाचे उराज्‍यमंत्री तथा वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले आहे.
     आज येथील विकास भवनात राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्‍त ग्राम अभियाना अंतर्गत 100 टक्‍के कुपोषणमुक्‍त 77 गावांच्‍या लोकप्रतिनिधी व आंगणवाडी सेविकांचा  पालकमंत्री मुळक यांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्‍छ देवून सन्‍मान पत्राचे वितरण करण्‍यता आले त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा,स्‍वच्‍छता विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे, जि.प. अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, मुख्‍य काय्रपालन अधिकारी शेखर चन्‍ने, महिला व बालकलयाण सभापती निर्मला बिजवे, शिक्षण व आरोग्‍य  सभापती उषाताई थुटे, समाज कल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
कुपोषणाची कारणे वेगवेगळी असली तरीपण अद्यापही जिल्‍ह्यामध्‍ये 9 हजार बालके कुपोषीत असल्‍याचे  सांगुन पालकमंत्री मुळक म्‍हणाले की कुपोषणमुक्‍त जिल्‍हा करण्‍यासाठी आवश्‍यक ती मदत करण्‍यात येईल. गेल्‍यावर्षी  3 कोटी 75 लक्ष रुपयाची तरतूद आंगणवाडीच्‍या इमारती बांधकामावर व तसेच बालक व माता यांच्‍यापोषण आहारावर खर्च करण्‍यात आला होता. जिल्‍हा कुपोषणमुक्‍त करण्‍यासाठी अतिरीक्‍त शंभर आंगणवाड्या सुरु करण्‍यतायेणार असूनयावषी्र जिल्‍हा नियेाजन विकास समितीने 1 कोटीचे अनुदानप्रस्‍तावित केले आहे. लोकप्रतिधिीच्‍या व कर्मचा-याच्‍या समन्‍वयाने वर्धा जिल्‍हा येत्‍या काळात कुपाषणमुक्‍त करु या असा आशावाद त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त  केला.
        याप्रसंगी बोलतांना राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की राज्‍यात कुपोष्‍ण मुक्‍त अभियान 2001
मध्‍ये सुरु झाले त्‍या अभियानाचे आयुक्‍त रमणी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती.
         औरंगाबाद विभागामध्‍ये त्‍यांनी  उत्‍कृष्‍टपणे  कार्य करुन अनेक गावे कुपोषणमुक्‍त केली होती. त्‍यावेळी कुपोषीत बालके  ग्रेड तीन व ग्रेड चार या श्रेणीमध्‍ये मध्‍ये विभागणी करण्‍यात आली होती. आता मात्र जागतिक आरोग्‍य  संघटनेच्‍या नव्‍या निकषानुसार या बालकांना आता कुपोषणामध्‍ये तिव्र कमी वजन तथा मध्‍यम कमी वजनअशी  वर्गवारी करण्‍यात आली आहे. कुपोषणासाठी सामाजिक बाबी जाबाबदार असून यामध्‍ये कमी वयामध्‍ये मुलींचा विवाह करणे, मातांना पोषक आहार न मिळणे तसेच  दोन मुलामध्‍ये अंतर ठेवणे,आदीं बाबींचा समावेश आहे..यासाठी शासनाने बालके कुपोषण होऊ नये यासाठी अनेक योजना राबवित येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
          यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, कुपोषण ही सामाजिक समस्‍या असून समाजाला कलंकीत करणारी बाब आहे.शासनाने राबविलेल्‍या योजनाचा पुरेपुर लाभ घेवून तसेच मार्गदर्शक तत्‍वे पाळून आपले गांव व संपूर्ण जिल्‍हा कुपोषण मुक्‍त करण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले.
यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी चन्‍ने यांनी राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्‍त ग्राम अभियानाची माहिती विषद  करुन ते म्‍हणाले की, जिल्‍हयात 0 ते 6 वर्षातील 78240 बालके असून वजन घेतलेली बालके 77 हजार 472 आहेत. साधारण बालके 68 हजार  109 असून मध्‍यम वजनाची बालके 8 हजार 097 एवढी बालके आहेत.यामध्‍ये 77 गावातील 86 आंगणवाड्या कुपोषण मुक्‍त झाल्‍या असून वेळोवेळी शासनाचे निर्देशानुसार  कुपोषीत माता व बालकांना पोषण आहार देण्‍यात येत असल्‍याचे ते म्‍हणाले.
        77 गावातील लोकप्रतिनिधी आंगणवाडी सेविकांचा पुष्‍पगुच्‍छ ,प्रमाणपत्र देवून गौरव करण्‍यात आला. यावेळी सरपंच,अंगणवाडी सेविका,वैद्यकीय अधिकारी,आरोग्‍य सेवक मोठया संखेने उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे संचालन अजय येते व अर्चना धानोरकर यांनी केले तर आभार राजेंद्र मुळक यांनी मानले.
                                           000000

No comments:

Post a Comment