Tuesday 31 October 2017



शेतक-यांनी तुती लागवड करुन महारेशिम अभियानाचा लाभ घ्यावा
Ø मनरेगा मधुन मिळते अनुदान
 वर्धा, दि 31 (जिमाका) जिल्हयातील शेतक-यांना रेशीम शेतीपासुन मिळणा-या उत्पादनाचे परीपुर्ण माहिती नसल्याने या शेती उद्योगाकडे शेतकरी वळलेले दिसून येत नाही.  तुती रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढवा, शेतक-यांच्या बांधावर तुती वृक्षाची लागवड करुन पर्यावरणाचे संतुलन राखणे व त्यांच्या उत्पादनात वाढ करणे, नाविन्यपुर्ण रेशीम तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहाचविणे याकरीता जिल्हयात 30 नोव्हेंबर पर्यंत महारेशमी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा लाभ घेऊन शेतक-यांनी तुती लागवडी करीता नाव नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.
            सदर अभियान राज्यातील एकुण 4 तुती समुहामध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये वर्धा  जिल्हयाचा समावेश आहे.
            जिल्हयात सध्या 400 एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली असून मागील वर्षी 68.75 मे.टन कोष उत्पादन झाले आहे. तुती लागवड केलेल्या शेतक-यांना एक एकर क्षेत्रावर दुस-या वर्षापासुन 4 ते 5 वेळा कोष उत्पादनाचे पिक घेऊन 1 लक्ष20 हजार   प्रति एकर निव्वळ उत्पन्न मिळते. 2 एकर ते 2 ते अडीच एकर तुतीची लागवड केल्यास पगारव्यक्ती प्रमाणे दर महा उत्पन्न घेता येते. मनरेगा अंतर्गत प्रति एकर  2 लाख 90 हजार 675 रुपये तिन वर्षासाठी तुती लागवडीकरीता व किटक संगोपन गृह बांधकामाकरिता मजूरी समुग्रीकरीता अनुदान देण्यात येत आहे.  
            महा रेशीम अभियान 2018 करीता तुती लागवडीसाठी 500 शेतक-यांचे सर्वेक्षण करुन नोंदणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच  जिल्हयामध्ये 1 हजार कुंटुंबापर्यंत लाभार्थी वाढ  करण्याचे नियोजन आहे. सदर अभियानाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी यांचे हस्ते तुती लागवड नोंदणी करुन  करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment