ग्रंथोत्‍सव











ग्रंथोत्‍सवाचा समारोपीय कार्यक्रम थाटात संपन्‍न

        वर्धा, दि.16- ग्रंथोत्‍सवाचा समारोपीय कार्यक्रम मोठ्या थाटात येथील न्‍यु इंग्‍लीश हायस्‍कुलच्‍या प्रांगणात (दि.14 रोजी) नुकताच संपन्‍न झाला. याप्रसंगी अध्‍यक्षस्‍थानी विदर्भ साहित्‍य संघ वर्धा जिल्‍ह्याचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रा. हाशम शेख, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर व ग्रंथपाल सुरज मडावी मंचावर उपस्थित होते.


      तीन दिवशीय ग्रंथोत्‍सवाला मोठ्या प्रमाणावर वर्धेकरांनी प्रतिसाद दिला असल्‍याचे सांगून संजय इंगळे तिगावकर म्‍हणाले की, बाल मनावर वाचन साहित्‍य रुजविणे ही काळाची गरजेचे आहे. साहित्‍य ते कोणत्‍याही स्‍वरुपाचे असो त्‍यापासून समाजाने दूर राहू नये. साहित्‍यामुळे प्रत्‍येकाच्‍या ज्ञानामोलाची भर पडते, साहित्‍यातूनच चांगला माणूस घडत असतो असेही त्‍यांनी सांगितले.

      प्रास्‍ताविक करताना जिल्‍हा माहिती अधिकारी दैठणकर म्‍हणाले की ग्रंथोत्‍सवामुळे प्रत्‍येकांना ग्रंथ प्रदर्शनीला भेट देता आले. तसेच नवनविन साहित्‍यीकांचे ग्रंथ तसेच दूर्मिळ पुस्‍तकांची खरेदी करता आली. वाचन संस्‍कृती टिकावी हा गंथोत्‍सवामागील हेतू होता. या निमित्‍ताने झालेले कवि संमेलन, कथाकथन, बाल साहित्‍य संमेलन निश्चित ज्ञानात भर पाडणारी होती असेही ते म्‍हणाले.

       या कार्यक्रमाचे संचलन पंकज वंजारे यांनी तर आभार प्रदर्शन मनिष जगताप यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने श्रोते उपस्थित होते.

ग्रंथोत्‍सवातून बाल साहित्‍याचा कला अविष्‍कार
वर्धा,दि.16- न्‍यु इंग्‍लीश शाळेच्‍या प्रांगणात (दि. 14 रोजी) नुकताच ग्रंथोत्‍सव अंतर्गत बाल साहित्‍याच्‍या कला अविष्‍कारांनी चालणा मिळाली. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्‍यांनी बाल साहित्‍य कार्यक्रमात सहभागी होऊन एक आगळा वेगळा ठसा उमटविला. राजकारण, समाजकारण, अर्थ व सांस्‍कृतिक कलेला जोड देवून अनेक विद्यार्थ्‍यांनी आपण उद्याचे उदयन्‍मुख साहित्‍यीक आहोत याचा परिचय मोठ्या धैर्याने करुन त्‍यांनी कविता, नाटीका, कथा व गझलचे श्रोत्‍यांपुढे सादरीकरण केले.


यावेळी सुशिलचंद्र आलेख, प्रभाकर पाटील, संजय इंगळे तिगांवकर व शेख हाशम, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, ग्रंथपाल सुरज मडावी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी सुशील हिंम्‍मतसिंगका माध्‍यमिक विद्यालयातील विद्यार्थी शोभवी उदय, इंद्रायणी गावंडे, अपूर्वा औझोकर, आदिती फाये, संघमित्रा पवार, प्रेरणा ढाले, वृषाली अवचट, मोनिका खिल्‍लारे, चैताली ठाकरे ,आकांक्षा राखुंडे, चेतन महंतारे, किशोर तमगिरे, व्‍यंकटेश टेकाडे, शंतनू घुमडे व मुकूल नगराळे . राष्‍ट्र संत तुकडोजी महाराज विद्यालयातील विद्यार्थी सुयोग अवचित, हर्षल कावळे, हर्षल बुरंगी, नेहाल चामटकर, सम्‍यक लोहकरे, मयुर सोनटक्‍के व आकाश उजवणे. साने गुरुजी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पूर्वा गव्‍हाने व अबोली निर्मल, वनश्री कात्रोजवार व जानवी साबळे . स्‍व. जिजामाता सबाने पूर्व माध्‍यमिक विद्यालयाचे अश्‍वीती नाखले, प्रणाली हलगे व प्रतिक कुरवटकर यांचा समावेश होता.
युवा साहित्‍य संमेलनामध्‍ये मंगेश शेंडे, रेखा जुगनाके, संदिप चिचाटे, चेतन परळीकर, संजय भगत यांनी सामाजिक आशयावर कथा व कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्‍ध केले.
या कार्यक्रमाचे संचलन पंकज वंजारे व आभार प्रदर्शन मनाष जगताप यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

                                                          000000



भाषेच्‍या बदलत्‍या प्रवाहात माय मराठी टिकून राहील - डॉ. खंडारे
      वर्धा,दि.14- माय मराठीचा उगम हा 6 व्‍या शतकापासून प्रारंभ झाला असून, ती भाषा विकसीत होत होत आज साडेसत्‍तावन टक्‍के लोकांची बोली भाषा झाली आहे. सुलभ सोयीने बोलणारी मराठी भाषा ही शहरापासून ते ग्रामीण लोकांपर्यंत बोली भाषा ठरली आहे. या भाषेवर किती आक्रमण व संक्रमण झाले असले तरी मराठी भाषेच्‍या बदलत्‍या प्रवाहात आपली माय मराठी भाषा टिकूण राहणार असल्‍याचे परखड मत डॉ. सुभाष खंडारे यांनी व्‍यक्‍त केले.

ग्रंथोत्‍सवाच्‍या कार्यक्रमात काल मराठी भाषेचे बदलते स्‍वरुप, वर्तमान व भविष्‍य या परिसंवादामध्‍ये ते अध्‍यक्ष पदावरुन बोलत होते. या प्रसंगी प्रा. शेख हासम , प्रा. राजेंद्र मुंडे ,डॉ. सतिश पावडे, डॉ. वंदना पळसापुरे, डॉ. किरण नाकतोडे, डॉ. दिपक पुनसे, प्रा. सरोज देशपांडे, प्रा. दिगंबर साबळे, प्रा. सचिन सावरकर प्रामुख्‍याने मंचावर उपस्थित होते.
वर्तमान व भविष्‍य काळात मराठी भाषा लूप्‍त होईल अशी भिती व चिंता करण्‍याचे कारण नाही असे सांगून प्रा. खंडारे म्‍हणाले की, मराठी ही बोली भाषा असल्‍यामुळे ती ग्रामीण भागात सर्वाधिक बोलल्‍या जाते. या भाषेचे जतन व संवर्धन मोठ्या प्रमाणावर पूर्ण क्षमतेने समतेने ग्रामीण क्षेत्रात होत असते. ग्रामीण क्षेत्राच्‍या घडामोडी व व्‍यवहार याच भाषेतून होत असल्‍यामुळे ती भाषा जग असेपर्यंत जीवंत राहणार आहे. शहरात मात्र या मराठी भाषेत संक्रमण होत असून, त्‍यासाठी चिंता करण्‍याचे कारण नाही. मराठी मानसाकडे ही बोलीभाषा प्रकर्षाने बोलली जाते. सांस्‍कृतीक भाषा ही विशिष्‍ट लोकापुरती मर्यादित होती व आजही ती आहे. सामान्‍य लोकांची ती बोलीभाषा ठरलेली नसल्‍यामुळे अनेकांना ती अवगत झाली नाही. त्‍यामुळे याभाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज ठरते. देशात अनेक भाषा आहेत त्‍याचे दाखले देवून डॉ.खंडारे म्‍हणाले की, आजही अनेक प्रांतातातील आपआपल्‍या माय बोलीतून बोलून ती व्‍यक्‍ती स्‍वाभीमानाने व्‍यवहार करीत असते. मराठी भाषेला उदंड इतिहास असून, ही भाषा अधिक व्‍यापक व प्रगल्‍भ होण्‍यासाठी शिक्षक व प्राध्‍यापकांनी संशोधनात पुढाकार घेवून मराठी भाषेचे स्‍थान अधिक बळकट नव्‍हे तर विद्यार्थ्‍यांमध्‍ये रुजविण्‍यासाठी प्रयत्‍नीशिल असावे असेही ते म्‍हणाले.
या परिसंवादात सर्व वक्‍त्‍यांचा हाच सुर दिसून आला की मराठी भाषा प्रगल्‍भ होऊन त्‍याची व्‍याप्‍ती वाढविण्‍यासाठी प्रत्‍येकांनी मोलाचा वाटा उचलावा. मराठी साहित्‍याला वाचक वर्ग मिळवून देण्‍यासाठी मराठी मानसाने योगदान द्यावे. शैक्षणिक क्षेत्रात अनेक आमुलाग्र बदल होत असून, जागतिकीकरणामध्‍ये तसेच संगणकीय युगामध्‍ये मराठी साहित्‍याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब सर्वांच्‍या चिंतनाची असली तरी संगणक युगात मराठीचे नवनवे संशोधन करुन मराठी भाषेला व्‍यापकता मिळवून देण्‍याची गरज आहे. शासनाचे उपक्रम मराठी भाषेतच राबविले जातात. ते अधिक लोकाभिमुख झाले पाहीजे. शासनाचे लोकराज्‍य मासिक नवनविन उपक्रम घेऊन वाचकांच्‍या ज्ञानात भर पाडते त्‍यांचे ते उपक्रम योजना मराठी माणसाला दिशादर्शक ठरतात. मराठी भाषेला अधिकाधिक प्रोत्‍साहन मिळावे यासाठी शासन स्‍तरावर प्रयत्‍न झाले पाहीजे असा अभिप्राय अनेक मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केला. यामध्‍ये प्रा.शेख हासम, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. सतीश पावडे, डॉ. वंदना पळसापूरे, डॉ. किरण नाकतोडे, डॉ. दिपक पुनसे , प्रा. राजेश देशपांडे, प्रा. दिगांबर साबळे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. सचिन सावरकर यांनी वक्‍त्‍यांच्‍या भाषणातून आषय काढून उपस्थितांसमोर त्‍याची बाजू ठेवली. यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, ग्रंथपाल सुरज मडावी व विदर्भ साहित्‍य संघ वर्धा शाखेचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रदिप दाते, मुरलीधर बेलखोडे व साहित्‍यप्रेमी उपस्थित होते.
तत्‍पूर्वी नवनित देशमुख यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम संपन्‍न झाला. यावेळी श्रोतेवर्ग उपस्थित होते.

ग्रंथोत्‍सवाचे थाटात उदघाटन साहित्‍य वाचनातून अमृतानुभव घ्यावा- डॉ. किशोर सानप
वर्धा,दि.13- साहित्‍य वाचन अलिकडील काळात लोप पावत चालली असून, या वाचन संस्‍कृतीला नवसंजिवन देणे आवश्‍यक आहे. साहित्‍य हे समाजातील सर्व घटकांना उपयुक्‍त असेच आहे. ग्रंथोत्सवामुळे साहित्‍याच्‍या अभिरुचीत वाढ होण्‍यासाठी येथे साहित्‍याचे दालन उपलब्‍ध केले असून, साहित्‍य वाचनातून अमृतानुभव घ्यावा असे आवाहन ज्‍येष्‍ठ साहित्‍यीक व लेखक किशोर सानप यांनी केले.

न्‍यु इंग्लिश हायस्‍कूलच्‍या प्रांगणात ग्रंथोत्‍सवाचे उदघाटन त्‍यांचे हस्‍ते संपन्‍न झाले त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्‍यक्ष प्रा. शेख हाशम होते तर मंचावर जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, विदर्भ साहित्‍य संघाचे वर्धेचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रदिप दाते व जिल्‍हा ग्रंथपाल सुरज मडावी उपस्थित होते.
मराठी भाषेच्‍या साहित्‍याच्‍या परंपरेत ज्ञानोबा, विठोबा, एकनाथ, नामदेव यांचे स्‍थान मोठे असून, योगदानही लक्षणीय असल्‍याचे सांगून सानप म्‍हणाले की, मराठी साहित्‍याला जात व धर्म नसतो. अभिसंतानी बहूजनांवर लादलेले साहित्‍य दिर्घकाळ टिकत नाही. मराठी भाषा हे जगातील दहाव्‍या क्रमांकाची भाषा आहे त्‍यामुळे त्‍याची व्‍यापकता अधिकाधिक दिसून येते.
मराठी भाषेच्‍या ज्ञानाच्‍या कक्षा वृध्‍दांवत असून, मराठी भाषा लोप पावेल ही सर्व साधारण लोकांना वाटणारी भिती निश्चितच चिंता करणारी नाही. काळानुरुप मराठी भाषेत संक्रमत झाले तरीपण जी भाषा सहजतेने बोलता व समजता येते तीच आपली माय बोली संपर्क भाषा म्‍हणून असते. समाजाच्‍या संस्‍कृतीन्‍वये भाषा बोलल्‍या जातात. मात्र त्‍या भाषेतही मराठी भाषा प्रामुख्‍याने असते. भाषेचे ज्ञान प्राप्‍त करण्‍यासाठी अलिकडील युगात तंत्रज्ञानाचा सुध्‍दा वापर होत असतो परंतू बालपणावर कोरलेली मराठी भाषा प्रदिर्घ काळ टिकून राहत असते हे तेवढेच सत्‍य आहे.
वाचनाची संस्‍कृती वाढविण्‍यासाठी प्रत्‍येकांनी आपल्‍या उत्‍पन्‍नाचा 1 टक्‍का रक्‍कम पुस्‍तके खरेदीसाठी करण्‍यात यावा.मराठी साहित्‍याचे पुस्‍तके व ग्रंथ कपाटात अनेक वर्ष बंदीस्‍त असली तरी हे साहित्‍य सर्वकाळ जिवंत व टिकून राहते. मराठी भाषेची चिंता करण्‍याचे अजिबात कारण नसून, मराठी भाषेला व्‍यापकाता, सृजनशिलता मिळवून देण्‍यासाठी शासनाने घेतलेला उपक्रम निश्चितच गौरवपूर्ण आहे असेही ते म्‍हणाले.
अध्‍यक्ष पदावरुन बोलतांना प्रा. हासम म्‍हणाले की, मराठी भाषा संक्रमण अवस्‍थेतून जात आहे. पूर्वी अभिजनांनी बहूजनांवर थोपलेले भाषा दिर्घकाळ टिकाव धरु शकली नाही याकडे लक्ष वेधून मराठी भाषेची व्‍यापक संवर्धन, प्रचार व प्रसार करण्‍यासाठी शासनाने घेतलेले उपक्रम अभिनंदनीय असल्‍याचे ते म्‍हणाले.
प्रास्‍ताविक करताना दैठणकर यांनी तीन दिवशीय कार्यक्रमाची माहिती विषद करुन ग्रंथोत्‍सवाच्‍या आयोजनाची भूमिका सांगितली.
ग्रंथोत्‍सवाचे उदघाटन दिप प्रज्‍वलाने झाले. तसेच साहित्‍य प्रदर्शन, बचतगट व खाद्य पदार्थाचे स्‍टॉलचे उदघाटन मान्‍यवरांचे हस्‍ते करण्‍यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्‍योती भगत व प्रा.अजय येते यांनी संयुक्‍तपणे केले. यावेळी मोठ्या संख्‍येने साहित्‍य प्रेमी व नागरीक उपस्थित होते.
ग्रंथोत्‍सवात रंगले कविसंम्‍मेलन
वर्धा,दि.13-मराठी भाषा अधिक साहित्‍य समृध्‍द होण्‍यासाठी ग्रंथोत्‍सवात काल सायंकाळी कविसंम्‍मेलन संपन्‍न झाले. या कवी सम्‍मेलनात ज्‍येष्‍ठ कवियत्री पासून महाविद्यालयीन तरुण कवी सहभागी झाले होते. त्‍यांनी आपले कविमत यावेळी मोकळे केले. या कविसम्‍मेलनाचे अध्‍यक्ष प्रख्‍यात कवी अशोक बुरबुरे हे होते तर सुत्र संचालन संजय इंगळे तिगांवकर यांनी केले.
यावेळी मुकुंद देशपांडे यांनी संसारीक जीवनावर, जयश्री कोटगिरवार यांनी सैतानी सुनामी, संजय ओरके यांनी रोहणी महत्‍व व आपण, दिपक विरखेडे यांनी मुडद्याला कट मारतांना, शोभा कदम यांनी शेतकरी आत्‍महत्‍या, गंगाधर पाटील यांनी भेटीत शतभराची गझल, संजय भगत यांनी वाटेतून चालतांना छंद अगळा, प्रा. राजेश डंभारे यांनी मातृत्‍व, गार्गी गायधनी यांनी निसर्ग कविता, माधव तेलरांधे यांनी गाणे तूझीचे गाणे, अशोक बुरबुरे यांनी बाजारवेध, डॉ. पुरुषोत्‍तम माळोदे यांनी शोध, प्रशांत ढोले यांनी जेथे, दिलीप गायकवाड यांनी पुन्‍हा एकदा, प्रशांत झिलपे यांनी भयभित, नंदा कुलकर्णी यांनी आपली बाग, प्रशांत दैठणकर यांनी चिमणी, यशवंत भवरे यांनी नुतन वर्ष , भुषण रामटेके यांनी तुटलेल्‍या लोकांची कविता व संजय इंगळे तिगांवकर यांनी दान या शिर्षकाच्‍या कविता सादर करुन उपस्थित कविप्रेमींना मंत्रमुग्‍ध केले.
यावेळी सर्व कवींचे स्‍मृतीचिन्‍ह देवून सत्‍कार करण्‍यात आला.
या कार्यक्रमाला साहित्‍य प्रेमी उपस्थित होते

वर्धेत ग्रंथोत्‍सव 12 ते 14 जानेवारी रोजी



वर्धा,दि.11– माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य व संस्‍कृती मंडळ आणि जिल्‍हा शासकिय ग्रंथालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 12, 13 आणि 14 जानेवारी 2012 रोजी न्‍यू. इंग्लिश हायस्‍कूलच्‍या प्रांगणात ग्रंथोत्‍सवाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला आहे. अशी माहिती जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्‍हा शासकिय ग्रंथालयाच्‍या सभागृहात पत्रकार परिषद घेण्‍यात आली. त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रंथपाल सुरज मडावी, विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर उपस्थित होते.
ग्रंथोत्‍सवाबाबत अधिक माहिती देतांना प्रशांत दैठणकर म्‍हणाले की, दिनांक 12 जानेवारी 2012 रोजी दुपारी 3 वाजता ग्रंथदिंडी शासकिय ग्रंथालय वर्धा येथून काढण्‍यात येणार असून, ही दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरुन जाईल. ग्रंथोत्‍सवाचे उदघाटन दुपारी 3 वाजता डॉ. किशोर सानप यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी नागपूर-अमरावती विभाग नागपूरचे संचालक भि.म.कौसल राहणार असून, प्रमुख अतिथी जिल्‍हाधिकारी जयश्री भोज असतील.
सायंकाळी 7 वाजता दीपमाला कुबडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्‍यात आले असून, या कविसंमेलनात जिल्‍ह्यातील नामांकित कवि अशोक बुरबुरे, दीपक रंगारी, डॉ. पुरुषोत्‍तम माळोदे, गंगाधर मुटे, मीना कारंजेकर, दिलीप विरखेडे, डॉ. मनोहर नरांजे, डॉ. भूषण रामटेके, अरविंद पाटील, नवीन इंदूरकर, संजय ओरके,राजेश डंभारे,साधना तेलरांधे सुरकार, अनंत नांदूरकर, मंजुषा ठाकरे चौगावकर, दिलीपकुमार जिंदे, मुकुंद देशपांडे, विद्यानंद हाडके, प्रशांत झिलपे, सम्‍यक अश्‍वघोष, प्रशांत ढोले, विद्या नरेंद्र खरे, नरेंद्र डेबे,संजयकुमार भगत, स्‍कर्मिश खडसे, गंगाधर पाटील, शांता पावडे, जयश्री कोटगीरवार, ज्‍योती भगत, सुषमा पाखरे, नरेंद्र लोणकर, अविनाश पोईनकर, गार्गी गायधनी, कोमल चाफले व शोभा कदम सहभागी होणार असून, कविसंमेलनाचे सूत्र संचालन संजय इंगळे तिगांवकर करणार आहेत.
दिनांक 13 जानेवारी 2012 शुक्रवारला दुपारी 4 वाजता कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित असून, या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष प्रा. नवनीत देशमुख राहणार आहे.
या कार्यक्रमात आशा निंभोरकर, प्रभाकर पाटील, मीनल रोहणकर, प्रा.किशोर वानखेडे व सुरेश राहाटे राहणार असून, सुत्रसंचालन प्रा. नरेंद्र डेबे करतील.
सायंकाळी 6 वाजता मराठी भाषेचे बदलते स्‍वरुप वर्तमान व भविष्‍य या विषयावर परिसंवाद होणार असून, या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष डॉ. सुभाष खंडारे राहणार आहे. यामध्‍ये प्रा. शेख हाशम, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. सतीश पावडे, डॉ. वंदना पळसापुरे, डॉ. किरण नाकतोडे, डॉ. दीपक पुनसे, प्रा. राजेश देशपांडे व प्रा. दिगांबर साबळे सहभागी होतील. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन सावरकर करतील.
दिनांक 14 जानेवारी 2012 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत बालसाहित्‍य संमेलन व दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत युवा कवि संम्‍मेलन आयोजीत असून, या कार्यक्रमाचे संयोजन सुशीलचंद्र भालेराव, प्रभाकर पाटील, पंकज वंजारे व मनीष जगताप करतील.
दुपारी 2 वाजता ग्रंथोत्‍सवाचा समारोपीय कार्यक्रमाचे अध्‍यक्ष श्री.बी.मोहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प.वर्धा व प्रमुख उपस्थिती राजेश खवले निवासी उपजिल्‍हाधिकारी, वर्धा असतील. यावेळी ज्‍येष्‍ठ साहित्‍यीकांचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता सत्‍यनारायण बजाज सार्वजनिक जिल्‍हा ग्रंथालय बॅचलर रोड,वर्धा येथे विदर्भ साहित्‍य संघाचा साहित्‍य पुरस्‍कार वितरण समारोहाचा कार्यक्रम होणार आहे.
ग्रंथ दिंडीचे संयोजक प्राचार्य पदमाकर बावीस्‍कर, प्रदीप दाते, डॉ. उमाजी नाल्‍हे ,डॉ.शोभा बेलखोडे व बा.द.हांडे राहणार असून, शालेय चित्र प्रदर्शनीचे संयोजन मुरलीधर बेलखोडे, प्रा. मोहन गुजरकर व प्रा. चितावर असतील. अक्षर कहानी वर्ध्‍याची कार्यक्रमाचे संयोजक सुशिलचंद्र भालेराव व प्रविण धोपटे हे असतील.
ग्रंत्‍थोत्‍सवा निमित्‍त पुस्‍तके प्रदर्शनी व विक्रीचे व बचत गटाने उत्‍पादीत केलेल्‍या वस्‍तूचे स्‍टॉल ग्रंत्‍थोत्‍सव प्रेमींसाठी खाद्य पदार्थाचे सुध्‍दा स्‍टॉल उपलब्‍ध असतील. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्‍यात आली.
या ग्रंथोत्‍सवाच्‍या पत्रकार परिषदेला ग्रंथोत्‍सव समितीचे सदस्‍य प्रदीप दाते, प्रा.पद्माकर बावीस्‍कर, प्रा. शेख हासम, प्रा. नवनीत देशमुख व प्रा. स्मिता वानखेडे उपस्थित होते.