Wednesday 7 December 2016

प्र.प.क्र. 820                                                                     दिनांक 7 डिसेंबर, 2016
रस्‍ता सुरक्षा विषयक कार्य करणा-या
संस्‍थांनी माहिती सादर करावी

वर्धा,दि 7 – परिवहन आयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांच्‍या कडुन वर्धा जिल्‍ह्यामध्‍ये रस्‍ता सुरक्षा विषयक कार्य करणा-या व्‍यक्‍ती/संस्‍था यांची खालील मुद्दानुसार माहिती मागविण्‍यात आलेली आहे. तरी रस्‍ता सुरक्षा संदर्भात काम करणा-या व्‍यक्‍ती/संस्‍था यांनी माहिती प्रसिध्‍द झाल्‍यापासून दोन दिवसाच्‍या आत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, प्रशाकिय इमारात, वर्धा येथे सादर करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.
पॉवर पॉइन्‍ट सादरीकरण साधारण खालील मुद्यानुसार असावी
संस्‍थेचे/व्‍यक्‍तीचे नांव, कार्यक्षेत्र, नोंदणी तपशिल, संस्‍थेचे संचालक/संचालक मंडळ, व संपर्क तपशील, संस्‍थेचा उद्देश व मागील 5 वर्षात रस्‍ता सुरक्षा विषयक केलेला कामाचा गोषवारा, मागील 5 वर्षात केलेल्‍या कामाचा वर्षनिहाय तपशिल (कामाचे स्‍वरुप कालावधी, उद्दीष्‍टे व परिपुर्तीची आकडेवारी), केलेल्‍या कामाबाबत शासकिय विभागाने प्रशस्‍ती पत्र/प्रमाणपत्र जारी केले असल्‍यास त्‍याचा तपशिल, सन 2016-17 करिता हाती घेण्‍यासाठी प्रस्‍तावित प्रकल्‍पाचा तपशिल (प्रकल्‍पाचे नांव, प्रस्‍तावित कालावधी, अपेक्षित उद्दिष्‍टे, प्रकल्‍प अंमलबजावणीचा आराखडा) सादर करावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
00000






प्र.प.क्र. 821                                                                     दिनांक 7 डिसेंबर, 2016
दिनांक 7 व 8 डिसेंबरला आकोली येथे
आदर्श ग्राम निर्माण महायंज्ञ 
      वर्धा,दि 7 – ग्रामगीता मिशन परिवार व जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने सर्व संत स्‍मृती महोत्‍सव निमित्‍त दिनांक 7 व 8 डिसेंबर, 2016 रोजी सेलु तालुक्‍यातील आकोली येथे आदर्श ग्राम निर्माण महायज्ञाचे आयोजन करण्‍यात आले असुन या कार्यक्रमाला सांसद आदर्श ग्राम योजना भारत सरकारचे सदस्‍य भास्‍करराव पेरे पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
          संत गाडगेबाबा व राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आधीच स्‍वच्‍छतेचे महत्‍व जनमाणसांना सांगीतले आहे. मात्र या महापूरषांचे विचार अद्यापही जनमानसात रुजले नाही म्‍हणून संताचे हे विचार ऐकण्‍याच्‍या आणि सांगण्‍याच्‍या पलीकडे जाऊन हे विचार जगता येणे महत्‍वाचे आहे. यासाठी विचाराचा जागर होण्‍याच्‍या उद्देशाने प्रस्‍तूत कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन ग्रामगीतेचे विचार आपले गावात पूर्णपणे उतरवून गाव आदर्श करीत देशाचे लक्ष आकर्षीत करणारे आदर्श गाव पाटोदा जि. औरंगाबाद आणि सांसद आदर्श ग्राम योजना भारत सरकारचे सदस्‍य भास्‍करराव पेरे पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राहणार आहे.
सेलु तालुक्‍यातील आकोली येथे दिनांक 7 व 8 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 7 रोजी उद् घाटनिय कार्यक्रमाला मा. रामदासजी तडस, खासदार वर्धा लोकसभा, मा. पंकजभाऊ भोयर, आमदार, वर्धा विधानसभा, मा. सौ. चित्राताई रणनवरे, अध्‍यक्षा जिल्‍हा परिषद, वर्धा, मा. मंजुषाताई दुधबडे, सभापती, पंचायत समिती, सेलू, विरेंद्र नणनवरे, सदस्‍य जिल्‍हा परिषद, वर्धा, शेखरभाऊ शेंडे, सचिव महाराष्‍ट्र प्रदेश कॉग्रेस, सुरेशभाऊ देशमुख, माजी आमदार उपस्थित राहणार आहेत.
दिनांक 8 रोजी सकाळी सामुहिक ध्‍यान, रामधुन, रोग निदान शिबीर, पुश रोग निदान शिबीर तसेच महिला व युवक संस्‍मेलन होणार आहे. या कार्यक्रमास शैलेश नवाल, जिल्‍हाधिकारी, वर्धा, नयना गुंडे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, वर्धा, मंजुषाताई दुधबडे, सभापती, पंचायत समिती, सेलू, कृष्‍णाजी पाहुणे, संप्‍त खंजेरी वादक भाऊसाहेब थुटे उपस्थित राहणार आहेत. दिनांक 8 ला सकाळी 6 ते 10 दरम्‍यान आदर्श ग्राम मार्गदर्शन सभेचे आयोजन राहणार आहेत. यासाठी भास्‍करराव पेरे पाटील हे मार्गदर्शन करणार असुन रविदास मानव गुरुकुंज संचालक गुरुकुंज आश्रम मोझरी हे प्रमुख उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात शालीक मेश्राम, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी, वर्धा इत्‍यादी मान्‍यवर उपस्थित राहणार असुन रोजी 9 ते 10 या वेळात श्री. संदिपपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचा जनतेचे लाभ घ्‍यावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.
0000

प्र.प.क्र. 822                                                                     दिनांक 7 डिसेंबर, 2016
10 व 11 डिसेंबर रोजी गवळाऊ जनावरांची प्रदर्शनी 

वर्धा,दि 7 – जैव विविधता जतन मोहिमे अंतर्गत पशुसंवर्धन विभाग, जिल्‍हा परिषद, वर्धा यांचे वतीने गवळावु प्रजातीच्‍या जनावरांचे जतन व संवर्धनाच्‍या कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असुन दरवर्षी विभागामार्फत विलुप्‍त होत चाललेल्‍या गवळावु गो-वंश प्रजातीच्‍या संवर्धनात समाजाचा सहभाग राहण्‍याच्‍या दृष्‍टीने विदर्भस्‍तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात येत आहे.
यावर्षी सदर प्रदर्शनी वर्धा येथे लोक महाविद्यालयाचे पटांगणावर दिनांक 10 ते 11 डिसेंबर, 2016 ला दोन दिवसांची विदर्भस्‍तरीय गवळाऊ जनावरांची प्रदर्शन आयोजित करण्‍यात येत आहे. सदर प्रदर्शनामध्‍ये 300 पेक्षा जास्‍त जनावरे प्रदर्शित केली जाण्‍याचा अंदाज आहे. तसेच या कार्यक्रमास वर्धा जिल्‍ह्यातील व जिल्‍ह्याबाहेरील गवळावुप्रेमी गोपालक मोठ्या भाग घेणार आहे.
तरी जिल्‍हातील सर्व शेतक-यांनी प्रदर्शनिचा लाभ घ्‍यावा, असे जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्‍हा परिषद, वर्धा यांनी कळवीले आहे.
00000


No comments:

Post a Comment