Wednesday 7 December 2016

पदवीधर अशंकालीन उमेदवारांनी शपथपत्र सादर करावे
            वर्धा,दि.5- वर्धा जिल्‍ह्यातील पदविधर अशंकालीन उमदवरांनी पदविधर अशंकालीन म्‍हणून 3 वर्ष पुर्ण काम केल्‍याचे सक्षम प्राधिका-याने (तहसिलदार) दिलेले प्रमाणपत्र  प्राप्‍त केलेले आहे. अशा सर्व अशंकालीन उमेदवारांनी विहित नमुण्‍यात (विहित नमुना जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकिय ईमारत, तळ  मजला, वर्धा या कार्यालयात उपलब्‍ध आहे.) साध्‍या कागदावर शपथपत्र  व त्‍यावर उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचे अलिकडील छायाचित्र लावलेले मुळ शपथपत्र कार्यालयात स्‍वतःप्रत्‍यक्ष येऊन  सादर करावे.
         अशंकालीन उमेदवारांचे यादीमध्‍ये नांव असलेले परंतु यापुर्वी  ज्‍या  उमेदवारांनी शपथपत्र सादर केलेली नाहीत अश्‍याच उमेदवारांनी सादर करावयाची आहे. ज्‍या उमेदवारांनी यापूर्वी शपथपत्र सादर केलेली आहेत अश्‍या उमेदवारांनी  पुनश्‍चः देण्‍यात आवश्‍यकता नाही.
          शपथत्रासोबत पदविधर अशंकालिन म्‍हणून 3 वर्ष पूर्ण काम केल्‍याचे सक्षम  प्राधिका-याने दिलेले प्रमाणपत्राची छायाप्रत (तहसिलदाराचे प्रमाणप्रत), पदविधर अशंकालीन उमेदवार सद्यस्थितीस कोणतीही नोकरी  करीत नसल्‍यास व तो एखादा खाजगी व्‍यवसाय  करीत असल्‍यास (सध्‍याचे उदर निवार्हाचे साधन) असा अर्ज, उमेदवाराचे  नोंदणी कार्डाची छायाप्रत (ऑनलाईन असलेले).
          वरील सर्व  कागदपत्रे  ( शपथपत्र व कागदपत्रे) या कार्यालयास दिनांक  21 जानेवारी, 2017 पर्यंत जिल्‍हा  कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय ईमारत, तळ मजला, वर्धा या कार्यालयात सादर  करण्‍यात यावे, असे  सहायक संचालक जिल्‍हा कौशल्‍य  विकास, रोजगार  व उद्योजकता  मार्गदर्शन केद्र वर्धा यांनी कळविले आहे.   
                                                       0000000

    प्र.प.क्र- 816                                                                     5 डिसेंबर , 2016
दुध भेसळीच्‍या प्रकरणात आरोपीला सहा महिने शिक्षा व दंड
            वर्धा,दि.5-अन्‍न भेसळ प्रतिबंधीत कायदा 1954 अंतर्गत कारवाई होऊन भेसळयुक्‍त दुधाची विक्री केल्‍याप्रकरणी मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी  यांच्‍या न्‍यायालयाने  आरोपीला सहा महिने सश्रम कारावस व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्‍यात आलेली आहे दंड न भरल्‍यास आरोपीला आणखी एक महिना साध्‍या करावासाची शिक्षा प्रस्‍तावीत आहे.
          अन्‍न भेसळ  प्रतिबंधक कायदया अंतर्गत तत्‍कालीन अन्‍न निरीक्षक एस.पी नंदनवार यांनी मे.राजेंद्र दुध डेअरी, विठ्ठल मंदिर रोड, मालगुजारीपुरा या पेढीस भेट देऊन आरोपी राजेंद्र भुराजी अवथळे यांचेकडुन मे. पवन मिल्‍क अॅण्‍ड फुड प्रोडक्‍टस, तुमसर रोड भंडारा यांच्‍याद्वारे उत्‍पादित करण्‍यात आलेले ‘पाश्‍चराईज्‍ड होमोजीनाईज्‍ड टोन्‍ड दुध (पचन ब्रॅन्‍ड) या अन्‍नपदार्थाचा नमुना दिनांक 21 नोव्‍हेबर, 2009 रोजी भेसळीच्‍या संशयावरुन  विश्‍लेषणाकरीता घेण्‍यात आला होता. सदर नमुना विश्‍लेषाणाअंती कायदयाने ठरवून दिलेल्‍या टोन्‍ड दुध मानदापेक्षा कमी मानदाचे अर्थात अप्रमाणित घोषित  झाला होता. सदर दुधामध्‍ये मिल्‍क फॅट 3 टक्‍के  आवश्‍यक असतांना 2.7 टक्‍के आढळुन आले होते. तसेच एसएनएफ 8.5 आवश्‍यक असंताना विश्‍लेषणांअती 4.62 टक्‍के आढळुन आले होते. त्‍यामुळे सदर दुधाचा नमुना अप्रमाणित घोषित  करण्‍यात  आला होता. प्रकरणाचा संपुर्ण तपास व चौकशी तत्‍कालीन अन्‍न निरीक्षकाने करुन प्रकरण मे 2010 मध्‍ये मुख्‍य न्‍यायादंडाधिकारी, वर्धा  यांचे न्‍यायालयात न्‍यायप्रविष्‍ट केले होते. सदर प्रकरणी भेसळयुक्‍त दुधाचाही विक्री केल्‍यामुळे राजेद्र भुराजी अवथळे, मे. राजेद्र दुध डेअरी, मालगुजारीपुर, वर्धा  यांना आरोपी करण्‍यात आले होते.
          सदर खटल्‍यामध्‍ये तत्‍कालीन अन्‍न निरीक्षक एस. पी. नंदनवार  तसेच एस.बी. नारागुडे, तत्‍कालीन सहायक आयुक्‍त (अन्‍न), वर्धा  यांची साक्ष पुरावे नोंदविण्‍यात आले  होते. त्‍यानंतर आरोपीच्‍या वतीने व  शासनाच्‍या वतीने युक्‍तीवाद करण्‍यात आला व युक्‍तीवादानंतर उपरोक्‍त आरोपींनी भेसळ युक्‍त दुधाचे विक्री केल्‍याचे असल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍यामुळे जनहिताच्‍या व जनस्‍वस्‍थाचा विचार करुन तसेच अशा प्रवृत्‍तीला आळा घालण्‍याच्‍या दृष्‍टीने विद्यमान मुख्‍य न्‍यादंडाधिकारी, श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यानी आरोपी राजेंद्र भुराजी अवथळे याने भेसळ युक्‍त दुधाची विक्री केल्‍याप्रकरणी सहा महिने सश्रम करावासाची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्‍यास आणखी एक महिना साध्‍या कारावासाची शिक्षा ठोठावण्‍यात आली. आदेश दिनांक  30 नोंव्‍हेबर, 2016 खुल्‍या न्‍यायालयात पारित करण्‍यात आलेले आहे.
          शासनाच्‍या  वतीने सहायक सरकारी अभियोक्‍ता  एस. डी. स्‍थुल यांनी यशस्‍वी युक्‍तवाद करुन न्‍यायालयाला निष्‍कर्षापर्यंत पोहचण्‍यासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच सदर खटल्‍याचा यशस्‍वी पाठपुरावा अन्‍न व औषध प्रशासनाचे सद्याचे कार्यरत अन्‍न सुरक्षा अधिकारी रविराज भो. धाबर्डें व ल.प्र. सोयाम यांच्‍या मार्फत करण्‍यात आला. सदरची कारवाई अन्‍न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्‍त (अन्‍न) ज. रा. वाणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्‍यात आली.
          भेसळयुक्‍त दुधाचे उत्‍पादन साठवणुक व विक्री होत असल्‍याचे आढळल्‍यास यापुढेही अशीच कठोर करवाई करण्‍यात येईल असे, आवाहन नागपूर विभागाचे सह आयुक्‍त (अन्‍न ) केकरे यांनी  केले आहे.
                                                           000000
   





No comments:

Post a Comment