Wednesday 7 December 2016

प्र.प.क्र. 817                                                                     दिनांक 6 डिसेंबर, 2016

रोकड विरहित व्‍यवहारांसाठी जिल्‍हाधिकारी यांचे नागरिकांना आवाहन
     
वर्धा,दि 6 –प्रत्‍येक नागरिकांना रोकड विरहीत आर्थिक व्‍यवहार करणे शक्‍य व्‍हावे व या उपक्रमास चालना मिळावी म्‍हणून दिनांक 30 नोव्‍हेंबर, 2016 रोजी जिल्‍ह्यातील कृषि केंद्र मेडीकल स्‍टोअर्स, वाहतूकदार, किराणा दुकानदार. उद्योग असोसिएशनच्‍या पदाधिका-यांची जिल्‍हाधिकारी यांनी बैठक घेऊन नागरिकांसाठी रोकड विरहित व्‍यवहार कश्‍या प्रकारे शक्‍य आहे याबाबत बैठकीत सविस्‍तर सूचना केल्‍या. प्रत्‍येक नागरिकांना आपले किरकोळ व ठोक व्‍यवहार आधार सक्षम पेमेंट सिस्‍टीम (AEPS) च्‍या माध्‍यमाने व्‍हावे यासाठी आपला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक बँक खात्‍याशी संलग्‍न करुन घेऊन तुमचा आधार क्रमांक व आधार बायोमेट्रिक्‍ससाठी रेकॉर्ड केले गेलेले तुमचे फिंगरप्रिंट खरेदी विक्री व्‍यवहारात ग्राहय धरले जाते. याचे फायदे सांगतांना जिल्‍हाधिकारी म्‍हणाले की, तुमच्‍या खात्‍यात शिल्‍लक रक्‍कमेची चौकशी, रक्‍कम जमा करणे आणि भरणे, आधार कार्ड ते आधार कार्ड फंड ट्रान्‍सफर करणे सोपे असून यासाठी अधिकची नोंदणी करण्‍याचीही आवश्‍यकता नसून ग्रामीण भागात सुध्‍दा ही सुविधा उपयोगी असल्‍याचे सांगितले. या उपक्रमांची यशस्‍वी अंमलबजावणी करण्‍यासाठी व नागरिकांना ही सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी व नागरिकांच्‍या फायद्यासाठी आवश्‍यक ते सहकार्य करण्‍याचे व आपल्‍या सूचना सुध्‍दा करण्‍याचे आवाहन यावेळी जिल्‍हाधिकारी यांनी केले.

डिझीटल बँकींगचे पाच सोपे मार्ग
1. यूपीआयः या पध्‍दतीत आपला मोबाई क्रमांक बँक अथवा एटीमएममध्‍ये  नोंदवा, संबंधित अॅप डाऊनलोड करा. आपला आयडी तयार करा. आपला पिन नं. सेट करा यानंतर आपण कोठूनही आपली आर्थिक देवाण-घेवाण करुन शकता.
2. यूएसएसडीः आपला मोबाईल नं. बँक खात्‍याशी लिंक करा. आपल्‍या मोबाईलवरुन *99# डायल करा. आपल्‍या बँकेचे नाव भरा (फक्‍त पहिला तीन आध्‍याक्षरे) किंवा आयएफएससी कोडची पहिला चार अक्षरे. फंड ट्रान्‍सफर MMID हा ऑपशन निवडा ज्‍यांच्‍याशी व्‍यवहार करावयाचा आहे त्‍यांचा मोबाईल नंबर आणि MMID टाका. द्यावयाची रक्‍कम आणि MPIN         स्‍पेस आणि खाते नंबरचे शेवटचे चार अंक भरा यानंतर आपण आर्थिक देवाण-घेवाण करु शकता.
3. ई- वॅलेटः एसबीआय बडी प्रमाणे वॅलेट डाऊनलोड करा, आपला मोबाईल नंबर रजिस्‍टर करा, त्‍याला आपल्‍या डेबीट, क्रेडीट कार्ड किंवा नेट बँकींगशी लिंक करा, आत्‍ता तुमचा फोन हेच तुमचे वॅलेट अर्थात पैस्‍याचे पाकीट झाले आहे.
4. कार्डस /पीओएसः आपली आर्थिक देयके आपल्‍या प्रीपेड क्रडीट किंवा डेबीट कार्डद्वारे करा. आपले कार्ड स्‍वाईप करा. आपला पिन नंबर टाका, पावती घ्‍या.
5. आधार संलग्‍न पेमेंट पध्‍दती (AEPS) – आपले आधार कार्ड हे आपल्‍या बँक खात्‍याशी संलग्‍न करा. आपण आपली देवाण खात्‍यावरील शिल्‍लकेची चौकशी, पैसे जमा करणे, कांढणे एका खात्‍यातून दुस-या खात्‍यावर पैसे पाठविणे हे सर्व व्‍यवहार AEPS च्‍या माध्‍यमाने करुन शकता.  
00000
प्र.प.क्र. 818                                                                     दिनांक 6 डिसेंबर, 2016
वर्धा जिल्‍ह्यात कलम 37 (1) 3 जारी    
      वर्धा,दि 6 - जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबधित राहावी यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1) 3 जारी केले आहे. या कलमाचा अंमल दिनांक 15 डिसेंबर पर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल,असेही आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.
00000




 .प.क्र. 819                                                                     दिनांक 6 डिसेंबर, 2016
वर्धेत रंगणार जिल्‍हास्‍तर युवा महोत्‍सव   
      वर्धा,दि 6 – महाराष्‍ट्र शासनाच्‍या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्‍या विद्यमाने आणि जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा द्वारा जिल्‍ह्यातील 13 ते 35 वयोगटातील युवक व युवतींच्‍या सुप्‍त कलागुणांना वाव देण्‍यासाठी तसेच राष्‍ट्रीय एकात्‍मता, राज्‍याची संस्‍कृती व परंपरा जतन करण्‍यासाठी जिल्‍हा क्रीडा संकुल येथे दिनांक 7 ते 8 डिसेंबर, 2016 या कालावधीत जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात येत आहे.
युवा महोत्‍सवातील स्‍पर्धात्‍मक कार्यक्रमात लोकनृत्‍य, लोकगित, एकांकीका (इंग्रजी/हिंदी), शास्‍त्रीय गायन (हिंदुस्‍थान), शास्‍त्रीय नृत्‍य, सितार, बासरी, तबला, वीणा, मृदंग, हार्मोनियम (लाईट), गीटार, मणीपुरी, ओडिसी नृत्‍य, भरतनाटयम्, कथ्‍‍थक, कुचीपुडी नृत्‍य, वक्‍तृत्‍व या स्‍पर्धाची समावेश असणारे आहे. तर अस्‍पर्धात्‍मक कार्यक्रमात राज्‍याच्‍या किंवा जिल्‍ह्याच्‍या संस्‍कृतीचे दर्शन घडविणा-या कार्यक्रमांचा समावेश राहील. जिल्‍हास्‍तरावरील युवा महोत्‍सवातून उत्‍कृष्‍ट कलाकारांचा संघ किंवा कलाकार यांची निवड करुन विभागस्‍तर आणि विभागस्‍तरीय युवा महोत्‍सवातून राज्‍य आणि राज्‍यस्‍तरीय महोत्‍सवातून राष्‍ट्रीयस्‍तर युवा महोत्‍सवात निवड होणार आहे. जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सवात 13 ते 35 वर्ष वयोगटातील युवक-युवतींनी सहभाग घेण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून वर्धा जिल्‍ह्यातील शाळा, महाविद्यालयांनी आपले विद्यार्थी-विद्याथींनींना सहभागी होण्‍यासाठी प्रोत्‍साहीत करावे.
जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सवात सहभागी होणा-या कलाकारांची नावे, शाळा, महाविद्यालय, संस्‍था, कार्यालयाचे नाव, जन्‍मतारीख व संपर्क क्रमांक, ई मेल आयडी अशी सर्व माहिती जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रत्‍यक्ष सादर करावी व अधिक माहितीसाठी जिल्‍हा क्रीडा अधिकारी, वर्धा यांना प्रत्‍यक्ष भेटावे.
00000

No comments:

Post a Comment