Wednesday 7 December 2016

एचआयव्‍ही आजारासाठी आपल्‍याला घाबरण्‍याची गजर नाही
                                                                                                  - जिल्‍हाधिकारी
वर्धा,दि.5 – महाराष्‍ट्र राज्‍य एड्स नियंत्रण संस्‍था व सामान्‍य रुग्‍णालय वर्धा यांच्‍या संयुक्‍त विदयमाने जागतिक दिन 1 डिसेंबरच्‍या दिनाचे औचित्‍य साधुन सामान्‍य रुग्‍णालय वर्धा येथे एचआयव्‍ही/एड्सबद्दल जनजागृती व्‍हावी याकरिता महाविद्यालयिन विद्यार्थ्‍यांची एड्स संदेश रॅली सकाळी 8.30 वाजता जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी, डॉ. दुर्योधन चव्‍हान, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, डॉ. अजय डवले, जिल्‍हा क्षयरोग अधिकारी व अभ्‍युदय मेघे यांच्‍या हस्‍ते रॅलिला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्‍यात आली.
रॅलिचा समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मा. जिल्‍हाधिकारी शैलेश नावल तसेच प्रमुख अतिथी मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्‍या प्रमुख उपस्थिती मध्‍ये घेण्‍यात आला. याप्रसंगी मा. जिल्‍हाधिकारी यांनी इतर आजाराप्रमाणे एचआयव्‍हीचा आजार झाला आहे. इतर बरेचसे आजार आहेत ज्‍यावर अजुनही औषोधोचार नाही. त्‍यामुळे आपल्‍याला घाबरण्‍याची गजर नाही. ‘होऊया सारे एकसंघ, करुया एचआयव्‍हीचा प्रतिबंध’, रोगप्रतिबंधक उपचार, हिंसा नाही, शून्‍य कलंक व भेदभाव, हानी कमी करणे, एचआयव्‍हीसाठी औषधौपचार. या वर्षीच्‍या घोषवाक्‍याने रॅलिची सुरुवात सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथुन निघुन बस स्‍टॉप ते बजाज चौक ते सौशालिस्‍ट चौक ते इंगोले चौक ते इतवारा बाजार परीसरात रॅलीद्वारे एचआयव्‍ही/एड्स प्रतिबंधाचा संदेश देवून गर्दिच्‍या ठिकाणी पॉम्‍पलेट्स वाटण्‍यात आले. तसेच विद्यार्थांनी स्‍लोगनच्‍या माध्‍यमातून एचआयव्‍ही प्रतिबंधात्‍मक संदेश दिला. रॅलिला शहरातील विविध शैक्षणिक संस्‍थातील 1000 महाविद्यालयिन विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी रुग्‍णालयीन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. शिवा देवगडे, जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी, रंजन हूमने जिल्‍हा पर्यवेक्षक, उत्‍कर्ष जनकल्‍याण शिक्षण संस्‍था, नोबल शिक्षण संस्‍था, डॉ. पाठक तसेच विहान संस्‍था, महाराष्‍ट्र नर्सिंग स्‍कूल, शासकिय नर्सिग स्‍कुल, कासाबाई नर्सिग स्‍कुल, एकविरा नर्सिंग स्‍कुल, शालोकम नर्सिंग स्‍कुल, सातवा नर्सिंग स्‍कुल, राधास्‍वामी नर्सिंग स्‍कुल, राधिकाबाई मेघे नर्सिग कॉलेज सावगी मेघे, नंदाताई लहवे नर्सिंग स्‍कुल, महात्‍मा गांधी महाविद्यालय व शहरातील विविध शैक्षणिक संस्‍थानी या एड्स संदेश रॅलिमध्‍ये सहभाग घेतला. तसेच रुग्‍णालयिन अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्‍ये सहभाग घेतला यामध्‍ये आयसीटीसी विभाग, एआरटी विभाग, रक्‍तपेढी विभाग, एनआरएचएम विभाग यांनी सहभाग घेतला.
00000
प्र.प.क्र- 813                                                                 4 डिसेंबर , 2016
डिजीटल फायनांन्‍स लिट्रसी कार्यक्रम
वर्धा,दि.3– आता आपले सरकार केंद्रा मार्फत गावातील व्‍यक्‍तींना पैस्‍या विना व्‍यवहार करणे शक्‍य आहे याचे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. ही योजना प्रत्‍यक्षात अंमलता आल्‍यावर डेबीट, क्रेडीड कार्डची आवश्‍यकता संपण्‍याची शक्‍यता आहे. पैसे पाठविणे, मिळविणे, खरेदी करणे, बील भरणे इत्‍यादी कामे कॅशलेस इकॉनामी प्रणालीने व आधार क्रमांकाच्‍या माध्‍यमातून अधिक सुकर होणार आहे. गाव पातळीवरील आपले सरकार केंद्र चालक हे स्‍थानिक लोकांना मोबाईलद्वारे व आधार सक्षम प्रणालीद्वारे रोकड विरहित आर्थिक व्‍यवहार कसे करावे याबाबतचा प्रशिक्षण कार्यक्रम वर्धा जिल्‍ह्यातील 354 आपले सरकार केंद्रामार्फत ग्रामपंचायतस्‍तरावर आयोजित करण्‍यात येत आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ लोकांनी उपस्थित राहून घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
00000
    प्र.प.क्र- 814                                                                     5 डिसेंबर , 2016
आयोगातर्फे सन- 2017 मध्‍ये आयोजि स्‍पर्धा
परीक्षांच्‍या अंदाजित वेळापत्र जाहिर
वर्धा,दि.5 – महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्‍यात येणा-या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्‍यात आले असून सदर वेळापत्रक आयोगाच्‍या www.mpsc.gov.in या संकेतस्‍थाळावर (वेबसाईटवर) प्रसिध्‍द करण्‍यात आले आहे.
शासनाच्‍या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्‍यात येते, त्‍यानुसार सन 2017 मध्‍ये घेण्‍यात येणा-या विविध परीक्षांचे दिनांक प्रस्‍ताविक परिक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे.  संघ लोकसेवा आयोग, इतर लोकसेवा आयोग, कर्मचारी चयन आयोग, विविध विद्यापिठे, परिक्षा घेणा-या इतर संस्‍था इत्‍यादिंकडून आयोजित करण्‍यात येणा-या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्‍या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्‍यात येते. जेणेकरुन, आयोगाच्‍या व संबंधीत संस्‍थांच्‍या परिक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळाची अनेकवेळा चर्चा झाली असून त्‍यावेळी विधीमंडळात देण्‍यात आलेल्‍या आश्‍वासनानुसार कोणत्‍याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्‍यानुसार सर्व संबंधित संस्‍थांनाच्‍या प्रस्‍तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्‍याची विनंती करण्‍यात आली आहे. वेळापत्रकास व्‍यापक प्रसिध्‍दी देणे गरजेचे असल्‍यामुळे प्रस्‍तुत वेळापत्रक/कार्यक्रम कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात येत आहे.
सदर वेळापत्रक आयोगाच्‍या www.mpsc.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे, असे अपर सचिव, महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

000000

No comments:

Post a Comment