Wednesday 7 December 2016

           कृषि निविष्‍ठांची खरेदीची रक्‍कम ऑनलाईन पध्‍दतीने अदा
वर्धा,दि.3–बियाणे, खते व किटकनाशके या कृषि निविष्‍ठांची खरेदी शेतक-याकडून केली जाते. या कृषि निविष्‍ठांची बहुतांशी खरेदी रोखीने केली जाते. सध्‍याच्‍या रोख चलन टंचाईमुळे अशा खरेदीवर अडचणी येऊ नयेत म्‍हणून शेतक-यांनी ऑनलाईन पध्‍दतीने खरेदीची रक्‍कम अदा करण्‍याची पध्‍दत अवलंबवावी असे आवाहन कृषि आयुक्‍तांनी केले आहे.
ज्‍या बँकेत शेतक-यांचे खाते आहे त्‍या बँकेतून NFFT (National Electronic Fund Transfer) द्वारे निविष्‍ठा विक्री केंद्र धारकाच्‍या खात्‍यावर निविष्‍ठा खरेदी बिलाची रक्‍कम जमा करु शकतात. त्‍यासाठी शेतक-याने ज्‍या दुकानातून कृषि निविष्‍ठा घ्‍यावयाच्‍या आहेत त्‍या दुकानदाराकडून घ्‍यावयाच्‍या निविष्‍ठांची रक्‍कम निश्चित करुन घ्‍यावी व दुकानदाराकडून त्‍याची कच्‍ची पावती व दुकानदाराचे बँक खाते क्र. व बँकेसंदर्भातील तपशिल जसे आय.एफ.एस.सी. कोड लिहुन घ्‍यावे. सदर तपशिल शेतक-याचे ज्‍या बँकेत खाते आहे त्‍या बँकेकडे देऊन घ्‍यावयाच्‍या निविष्‍ठांच्‍या रकमे एवढी स्‍लीप बँकेस भरुन द्यावी. यानंतर बँकेद्वारे शेतक-याच्‍या खात्‍यावरुन परस्‍पर दुकानदाराच्‍या खात्‍यावर निविष्‍ठाची रक्‍कम जमा होईल. बँक शेतक-याला पोहोच म्‍हणून युनिक विशेष व्‍यवहार संदर्भ क्रमांक UTR देईल. बँकेद्वारे प्राप्‍त झालेली विशेष व्‍यवहार संदर्भ क्रमांक UTR शेतक-यांने दुकानदाराला द्यावे व त्‍या आधारे दुकानदार शेतक-याला कृषि निविष्‍ठा देईल. त्‍यामुळे शेतक-यांना कृषि निविष्‍ठा खरेदी कॅशलेस करता येईल.   


प्र.प.क्र- 810                                                                 3 डिसेंबर , 2016
जिल्‍ह्यातील उद्योग घटकांची नोंदणी मोहिम
वर्धा,दि.3– जिल्‍ह्यातील चालू उद्योग घटकांची नोंद करण्‍याची मोहिम जिल्‍हा उद्योग केंद्रा मार्फत 1 डिसेंबर, 2016 पासून घेण्‍यात येत आहे. वर्धा मार्फत जिल्‍ह्यातील चालू केंद्र सरकारच्‍या सुक्ष्‍म, लघु मध्‍यम उपक्रम विभागाच्‍या www.msmedatabank.in या संकेतस्‍थळावर करण्‍यात यावी. या संकेतस्‍थळावर निर्मिती व सेवा उद्योग घटकांची नोंद घेण्‍यात येत असल्‍याची माहिती जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक यांनी दिली.
जिल्‍ह्यातील उद्योजकांना त्‍याच्‍या उद्योग घटकांची नोंद www.udyogaadhaar.gov.in  या शासनाच्‍या संकेतस्‍थळावर नोंद केलेली आहे. त्‍याच उद्योग घटकांची नोंद केंद्र सरकारच्‍या www.msmedatabank.in या संकेस्‍थळावर होत आहे. उद्योग घटकांची नोंद केल्‍यावर संकेस्‍थळावर नोंद झाले बाबतचे प्रमाणपत्र आपल्‍या e-mail वर तात्‍काळ उपलब्‍ध होते. सदर उद्योग घटकांच्‍या नोंदणीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅक पासबुक, उद्योग विषयी सविस्‍तर माहिती असणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा उद्योग केंद्र, येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाव्‍यवस्‍थापक,सचिन पाटील जिल्‍हा उद्योग केंद्राचे यांनी केले आहे.
0000
                                     






प्र.प.क्र- 811                                                                 3 डिसेंबर , 2016
सन 2016 या वर्षाकरिता वर्धा जिल्‍ह्यातील लघु उद्योजकांसाठी जिल्‍हा पुरस्‍कार योजना
वर्धा,दि.3– महाराष्‍ट्र राज्‍य उद्योग संचालनालयामार्फत लद्यु उद्योजकांसाठी जिल्‍हा स्‍तरावर जिल्‍हा पुरस्‍कार योजना दर वर्षी राबविण्‍यात येते. सन 2016 या वर्षात वर्धा जिल्‍ह्यात उल्‍लेखनीय कामगिरी करणा-या उत्‍कृष्‍ट लद्यु उद्योजकांकरिता ही योजना राबविण्‍यात येत आहे.यासाठी लघु उद्योजकांनी 15 डिसेंबर, 2016 पर्यंत विहीत नमुन्‍यात अर्ज करावा, असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक सचिन पाटील यांनी केले आहे.
नवीन लघु उद्योजकांना प्रेरणा व उत्‍साह निर्माण करुन उद्योजकाच्‍या आवश्‍यक गुणाचा विकास करणे हा या योजनेचा मुख्‍य उद्देश आहे. या योजने अंतर्गत जिल्‍हा स्‍तरावर दोन पात्र उद्योजकांची निवड करण्‍यात येईल. प्रथम पुरस्‍कर रु. 15 हजार रुपये रोख व मानचिन्‍ह, द्वितीय पुरस्‍कार रु. 10 हजार रुपये रोख व मानचिन्‍ह असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. ज्‍या उद्योजकांना स्‍थायी लघु उद्योग नोंदणी दिनांक 31 डिसेंबर, 2012 ला किंवा त्‍यापुर्वी मिळाली आहे व ज्‍याचे उत्‍पादन सतत दोन वर्षापासून चालू आहे, अशांनाच या योजनेचा लाभ देता येईल.
ज्‍या लद्यु उद्योजकांना यापुर्वी जिल्‍हा, राज्‍य व राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळालेला आहे अशाच उद्योजकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जदार लद्यु उद्योजक कोणत्‍याही बँकेचा थकबाकीदार नसावा. लघु उद्योजकांनी विहीत नमुन्‍यात दिनांक 15 डिसेंबर, 2016 पर्यंत अर्ज करावा. अर्जाच्‍या नमुन्‍यासाठी जिल्‍हा उद्योग केंद्राशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्र, महाव्‍यवस्‍थापक यांनी केले आहे.
000000





No comments:

Post a Comment