Thursday 26 July 2012

विकास योजनांची अंमलबजावनी प्रभावीपणे करा जे.पी.डांगे


विविध विकास योजनांचा आढावा
वर्धा, दि. 26- जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणा-या विविध विकास योजना अधिक जलद गतीने  व प्रभावीपणे  राबविण्‍यासाठी  येणा-या अडचणी   तसेच निधीच्‍या उपलब्‍धतेबाबत  सुचना   विभाग प्रमुखांनी  सादर कराव्‍यात अश्‍या सुचना महाराष्‍ट्र राज्‍य चवथ्‍या वित्‍त आयोगाचे अध्‍यक्ष  जे.पी.डांगे यांनी आज दिल्‍यात .
      जिल्‍हाधिकारी  कार्यालयातील सभागृहात  जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणा-या विविध विकास योजनांची  माहिती  तसेच अंमलबजावनी  यंत्रणांना योजनेच्‍या  प्रभावीपणे राबविण्‍यासाठी  येणा-या  अडचणींचा आढावा श्री. जे.पी.डांगे यांनी  घेतला. त्‍याप्रसंगी  ते  मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने , अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत , तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
         चवथ्‍या वित्‍त आयोगातर्फे  जिल्‍हास्‍तरावर  विविध विभागातर्फे राबविण्‍यात येणा-या  योजना संदर्भातील  सुचना  तसेच  विकास योजनांच्‍या अंमलबजावनी संदर्भात सुचना स्विकारण्‍यात येणार असून त्‍यानुसार  वित्‍त आयोगातर्फे अहवाल तयार करण्‍यात येणार असल्‍याचे  सांगताना  चवथ्‍या वित्‍त आयोगाचे अध्‍यक्ष जे.पी.डांगे म्‍हणाले की, जिल्‍हा‍स्‍तरावर  सर्व विभाग प्रमुखांनी  केलेल्‍या  सुचनांचा समावेश अहवालामध्‍ये  करण्‍यात येईल. यावेळी  विविध विभागांच्‍या  अडचणींची  तसेच योजनांच्‍या  अंमलबजावनीची माहिती  त्‍यांनी  आढावा बैठकीत घेतली.
जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी स्‍वागत करुन  वर्धा जिल्‍ह्यात  राबविण्‍यात येणा-या  विविध योजना, जिल्‍हा नियोजन मंडळ तसेच  विभागांना उपलब्‍ध होणारा निधी व विकासकामांचे नियेाजन  या संदर्भात माहिती दिली.
     महसूल विभागा संदर्भात जनतेला अधिक जलद गतीने सेवा पुरविण्‍याबाबत  विविध उपक्रम राबविण्‍यात येत असून  या योजनांचा लाभ   सामान्‍य जनतेपर्यंत पोहचावा यासाठी  प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्‍यात येत असल्‍याची  माहिती  अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांनी दिली.
                                                                ...2..


 विकास योजनांची  अंमलबजावनी...      ...2..
      वर्धा जिल्‍ह्यातील वन क्षेत्राच्‍या विकासाबराबरच  जंगली जनावरामुळे  शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी प्रायोगीक तत्‍वावर  सोलर कुंपन बसविण्‍यात येत आहे. सध्‍या 10 किलोमीटरचे कुंपन पूर्ण झाले असून, ढगा व तारणपूर  येथे पर्यटन विकास तसेच बोरधरण परिसरात इकोटुरीझम  सुरु असल्‍याची माहितीही  जिल्‍हा उपवनसंरक्षक प्रदीप चव्‍हाण  यांनी दिली.
जिल्‍ह्यात कायद व सुव्‍यवस्‍थेची  परिस्‍थीती  नियंत्रणात असून जिल्‍हा स्‍तरावर तसेच ग्रामीण स्‍तरापर्यंत पोलीस बंदोबस्‍त  तसेच  पेालीस स्‍टेशनच्‍या इमारती , निवासी संकुल आदी बाबतही  यावेळी  अप्‍पर जिल्‍हा पोलीस अधिक्षक यांनी माहिती दिली.
आरोग्‍य, पशुसंवर्धन, मत्‍स्‍यव्‍यवसाय, सहाकार, कृषि , विद्यूत, सार्वजनिक बांधकाम, मत्‍स संवर्धन, सामाजिक वनीकरण, पर्यटन, क्रिडा आदी  विभागप्रमुखांनी जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची  माहिती तसेच  योजनेच्‍या अंमलबजावनी  करताना सुचना व येणा-या अडचणी याबाबतही बैठकीत माहिती दिली.
जिल्‍ह्यातील विविध योजनांची अंमलबजावनी बाबतच्‍या सुचना चवथ्‍या वित्‍त आयोगाकडे  जिल्‍हाधिकारी यांचे मार्फत सादर कराव्‍यात असेही  यावेळी  आयोगाचे अध्‍यक्ष्‍य  जे.पी. डांगे  यांनी यावेळी सांगितले.
जिल्‍हा नियेाजन मंडळातर्फे  जिल्‍ह्याच्‍या  विकासा संदर्भात तयार करण्‍यात आलेल्‍या  जिल्‍हा वार्षिक योजनेची तरतूद तसेच यामध्‍ये  सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी  क्षेत्रबाह्य  उपाययोजनांच्‍या निधी बाबतची माहिती यावेळी  त्‍यांनी   दिली.   
या बैठकीस जिल्‍ह्यातील  सर्व अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्‍हा परिषदेच्‍या येाजनांचा आढावा
          जिल्‍हा परिषदे तर्फे राबविण्‍यात येणा-या विविध योजना त्‍यांची अंमलबजावनी व अडचणी बाबतचा चवथ्‍या वित्‍त आयोगाचे अध्‍यक्ष जे.पी.डांगे यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात आयोजीत पदाधिकारी व अधिका-यांच्‍या बैठकीत घेतला.
    यावेळी मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, सभापती गोपाल पांडुरंगजी कालोकर, नंदकिशोर कंगाले, श्रीमती उषाताई थुटे, निर्मलाताई बिजवे, अतिरीक्‍त मुख्‍य कार्यपालन अधिकारी बी.एन. मोहन व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

                           00000000

No comments:

Post a Comment