Friday 27 July 2012

खरीप पिकासाठी 304 कोटी 72 लाख रुपयाचे कर्ज वाटप - शेखर चन्‍ने


       वर्धा,दि.27 – शेतक-यांना  खरीप हंगामासाठी  जिल्‍ह्यातील विविध बँकातर्फे 304 कोटी  72 लाख रुपयाचा कर्ज पुरवठा करण्‍यात आला असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी आज दिली.
जिल्‍ह्यासाठी  खरीप  हंगामासाठी  449.13 कोटी रुपयाचा पत आराखडा तयार करण्‍यात आला होता. जिल्‍ह्यात 21 जुलै अखेर 45 हजार 973 शेतक-यांना  304 कोटी  72 लक्ष रुपयाचे पीक कर्जाचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्‍ह्याच्‍या पत आराखड्यानुसार 67.4 टक्‍के  पीक कर्जाचे  वाटप  पूर्ण झाले असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी यावेळी दिली.
राष्‍ट्रीयकृत  व जिल्‍हा बँकाना  खरीप हंगामासाठी  452 कोटी 87 लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्‍ट  ठरवून देण्‍यात आले होते. तसेच रब्‍बी हंगामासाठी  35 कोटी  32 लक्ष रुपयाचे  पीक कर्ज वाटपाचे लक्ष निर्धारीत करण्‍यात आले आहे.
राष्‍ट्रीयकृत बँकानी 34 हजार  384 शेतक-यांना 247 कोटी  75 लाख रुपयाचे  खरीप पीक कर्जाचे वाटप पूर्ण केले आहे.यामध्‍ये  सर्वाधिक बँक ऑफ  इंडियाने 13 हजार 523  शेतक-यांना 79 कोटी 19 लाख रुपयाचे खरीप पिक कर्जाचे वाटप पूर्ण केले आहे.  बँक ऑफ महाराष्‍ट्र  या बँकेतर्फे 5 हजार 263 शेतक-यांना 14 कोटी 4 लक्ष रुपये , स्‍टेट बँकेतर्फे  9 हजार 531 शेतक-यांना 70 कोटी 55 लाख रुपये, सेंट्रल बँके तर्फे 1 हजार 548 शेतक-यांना 9 कोटी रुपये , बँक ऑफ बरोडा तर्फे 437 शेतक-यांना 21 कोटी 23 लाख रुपये , पंजाब नॅशनल बँकेतर्फे 2 हजार 488 शेतक-यांना 14 कोटी 97 लाख रुपये , युनियन बँकेतर्फे 447 शेतक-यांना 3 कोटी 28 लाख रुपये ,  आयडीबीआय बँकेतर्फे 201  शेतक-यांना 1 कोटी 67 लाख रुपये,  कॅनरा बँकेतर्फे 186 शेतक-यांना 64 लाख रुपये , सिंदीकेट बँकेतर्फे 100 शेतक-यांना  57 लाख रुपये  तर युको बँकेतर्फे 45 शेतक-यांना  32 लाख रुपये  व आंध्र बँकेतर्फे 27 शेतक-यांना 20 लाख रुपये वाटप पूर्ण झाले आहे.
       जिल्‍ह्यातील इतर वाणीजय  बँकेतर्फे 110 शेतक-यांना 1 कोटी 45 लाख रुपये  असे सर्व  वाणिज्‍य व राष्‍ट्रीयकृत बँकातर्फे 34 हजार 494 शेतक-यांना 249 कोटी  20 लाख रुपयाचे  कर्ज वाटप पूर्ण झाले आहे.                                       
         वर्धा जिल्‍हा बँकेतर्फे  50 कोटी 67 लाख रुपयाचे कर्ज वाटप
        वर्धा जिल्‍हा मध्‍यवर्ती  सहकारी बँकेतर्फे 10 हजार 739 शेतक-यांना 50 कोटी 67 लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यातील इतर सहकारी बँकातर्फे 740 शेतक-यांना 4 कोटी 85 लाख  रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे.
       खरीप  हंगामासाठी   जिल्‍ह्यातील  शेतकरी खातेदारांना पीककर्जाचे वाटप सुरु असून शेतक-यांनी  राष्‍ट्रीयकृत  तसेच सहकारी बँकेशी  संपर्क करुन  आवश्‍यकतेनुसार  कर्जाची मागणी करावी असे जिल्‍हा उपनिबंधक  सहकारी संस्‍था  जे.के. ठाकुर तसेच  जिल्‍हा अग्रणी बँकेचे  जिल्‍हा प्रबंधक  मोहन मशानकर  यांनी  आवाहन केले आहे.
                                  0000000

No comments:

Post a Comment