Saturday 3 March 2012

महात्‍मा गांधी आयुर्विज्ञान संस्‍थेमध्‍ये दोन दिवशीय कार्यशाळा


     वर्धा, दि. 3- आजच्‍या या धकाधकीच्‍या युगात आणि वेगवान वाहनांच्‍या काळात अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. अपघात झालेल्‍या  व्‍यक्तिला वेळेवर वैद्यकिय उपचार व  मदत मिळणे क्रमप्राप्‍त असून (सोनेरी तास) मधे योग्‍य वैद्यकीय मदत मिळाल्‍यास अशा व्‍यक्तिचे प्राण वाचविले जावु शकतात. ही बाब डोळ्यासमोर ठेवून बेसीक ट्रामा केअर या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन अस्थिव्‍यंगोपचार शास्‍त्र विभाग, महात्‍मा गांधी आयुर्विज्ञान संस्‍था, सेवाग्राम तर्फे करण्‍यात येणार आहे.
       10 व 11 मार्च 2012 ला होणा-या या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी, खाजगी डॉक्‍टर व पदवी प्राप्‍त  करणा-या डॉक्‍टरांना याबाबत अनमोल मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. अपघाती व्‍यक्‍तीला अपघातस्‍थळी कशी मदत करावी, दवाखान्‍यात आलेलया रुग्‍णांना कोणत्‍या आजाराला प्राधान्‍य देण्‍यात यावे व त्‍याच्‍या शरीराच्‍या वेगवेगळ्या अवयवांच्‍या ईजांचे तात्‍काळ निदान करुन औषधोपचार करुन त्‍याचे प्राण वाचविता येईल याविषयी मान्‍यवर मार्गदर्शन करतील.
     या कार्यशाळेसाठी विविध विषयातील सुमारे 25 तज्ञ डॉक्‍टर सहभागी होणार असून मोलाचे मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेसाठी जवळपास 300 डॉक्‍टर विविध भागातून सहभागी होतील. या कार्यशाळेच्‍या आयोजनाकरीता संथेचे अध्‍यक्ष धिरुभाई मेहता, सचिव डॉ. प्रतिभा नारंग, अधिष्‍ठाता डॉ.बी.एस.गर्ग, एम.एस. डॉ. एस.पी.कलंत्री हे विशेष सहकार्य करतील.
     या कार्यशाळेचा जास्‍तीत जास्‍त डॉक्‍टरांनी लाभ घेऊन रुग्‍णांचे प्राण वाचविण्‍याचा प्रयत्‍न करावा असे आवाहन आर्थोविभाग प्रमुख व सत्‍यसाई ट्रामा सेंटर प्रमुख डॉ.सी.एम.बडोले व सर्जरी विभाग प्रमुख डॉ. आर.नारंग आणि डॉ.किरण वांदिले यांनी केलेले आहे.
                             000000

No comments:

Post a Comment