Thursday 1 March 2012

कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्‍पाच्‍या तळणी (भा) गावाला कृषी सहसंचालक यांची भेट


      वर्धा, दि. 1 – विभागीय कृषि सहसंचालक जे.सी.भुतडा व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी कोरडवाहू शाश्र्वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्‍या देवळी तालुक्‍यातील मौजा-तळणी (भा) गावाला भेट दिली.
     मान्‍यवरांनी भेटी दरम्‍यान प्रकल्‍पांतर्गत म्‍हशी खरेदी केलेल्‍या लाभार्थ्‍यांशी चर्चा केली. प्रकल्‍पाचे उद्दिष्‍ट, महत्‍व, फायदे व कोरडवाहू क्षेत्रामध्‍ये शाश्र्वत उत्‍पन्‍न घेण्‍यासाठी पारंपारीक पिका व्‍यतिरिक्‍त जोडधंदे जसे गाई, म्‍हशी, शेळ्या, मेंढ्या, कुक्‍कुटपालन इत्‍यादी व्‍यवसायाची जोड देणे अत्‍यंत आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. तसेच जे दुध उत्‍पादित होते त्‍या दुधापासुन इतर दुग्‍धजन्‍य पदार्थ जसे दी, तूप, लोणी, ताक, पनीर, खवा इ. पदार्थ केल्‍यास जास्‍तीचा पैसा मिळू शकतो. या व्‍यतिरिक्‍त शेडनेट हाऊस, विहिर पुर्नभरण, शेततळे, बांधबंदिस्‍ती इ. शेतामध्‍ये उपचार केल्‍यास पाणीसाठा वाढवून बागायती खाली क्षेत्र वाढविता येते. आतापर्यंत या गावामध्‍ये 40 शेतक-यांना 37 हेकटर क्षेत्राकरीता गतिमान कडधान्‍य उत्‍पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा बियाणे जॉकी वाण 80 किलो, रायझोबियम 1 किलो, बिव्‍हेरीया 3 किलो, पीएसबी 1 किलो, ट्रायकोडर्मा अर्धा किलो, झिंक सल्‍फेट 20 किलो, डीएपी 100 किलो, फेरस सल्‍फेट 10 किलो, एचएनपीव्‍ही 500 मि.ली., अॅझोडिरेक्‍टीन 1 लिटर, फेरोमन सापळे 15 नग, हेलिलुर्स 45 नग असा रुपये 5400 प्रती हेक्‍टर प्रती शेतकरी करीता लाभ दिलेला आहे.
     वैरण विकास कार्यक्रमांतर्गत 25 शेतक-यांना 7.20 हेक्‍टरसाठी चा-याचा मका, ज्‍वारीचा लाभ दिलेला आहे. आतापर्यंत 35 शेतक-यांनी शासकीय अनुदानावर म्‍हशीची खरेदी केलेली आहे व त्‍याचा व्‍यवसाय सुरु झालेला आहे.
     गावामध्‍ये पायाभूत सवर्हे करुन 100 शेतक-यांची निवड केलेली आहे. त्‍यांना गाई, म्‍हशी, शेळ्या व कृषि विभागाच्‍या इतर योजनांचा सुध्‍दा लाभ मिहणार आहे. यावेळी डॉ. भुतडा यांनी या सर्व उपक्रमाची पाहणी केली. व शेतक-यांशी चर्चा सुध्‍दा केली. व राबवित असलेल्‍या  प्रकल्‍पाबद्दल समाधान व्‍यक्‍त केले. सदर भेटीच्‍या वेळी उप विभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, देवळीचे तालुका कृषि अधिकारी सुभाष निगोट, मंडळ कृषि अधिकारी कऊटकर, कृषि सहाय्यक राठोड व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
                                00000     

No comments:

Post a Comment