Tuesday 28 February 2012

हत्‍तीरोग दूरिकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्‍हा आरोग्‍य अधिका-यांचे हस्‍ते संपन्‍न


     वर्धा, दि. 28- हत्‍तीरोग दूरीकरण मोहीमेचा शुभारंभ आज सकाळी नालवाडी येथील आरोग्‍य उपकेंद्र येथे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड यांनी हत्‍ती रोगाची बाधा होऊ नये यासाठी डि.ई.बीच्‍या गोळ्या लाभार्थ्‍यांना देवून मोहिमेचा शुभारंभ केला.
    यावेळी नालवाडीच्‍या सरपंच संजिवनी उरकुडे, अतिरीक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सोमलकर, जिल्‍हा हिवताप अधिकारी मोनीका चारमोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.झोडे, डॉ. सुनितकरी व डॉ.पि.आर. धाकटे उपस्थित होते.
     याप्रसंगी बो्लताना डॉ. राठोड म्‍हणाले की हत्‍तीरोग हा आजार गंभिर स्‍वरुपाचा असून, त्‍यापासून शरिरावर विकृती निर्माण होऊ शकते. हा आजार होऊ नये यासाठी हत्‍तीरोग दूरीकरण मोहीम सुरु करण्‍यात आली असून, त्‍याचा लाभ सर्व ग्रामीण व शहरी जनतेनी करुन घ्‍यावा जेणेकरुन भविष्‍यात आरोग्‍य  अधिक सुदृढ राहील.
     यावेळी चारमोडे म्‍हणाल्‍या  की 2 वर्षाखालील मुले गर्भवती स्‍त्री व गंभीर आजार रुग्‍ण सोडून लाभार्थ्‍यांना घरोघरी गोळ्या खाऊ घालण्‍याकरीता आरोग्‍य कर्मचारी येतील, त्‍यांच्‍या समक्ष डि.ई.सीच्‍या गोळ्याचे सेवण करावे. ह्या मोहिमे अंतर्गत जिल्‍ह्यात 1642 कम्रचारी तसेच 400 पर्यवेक्षक कार्यरत आहेत. सदर मोहिमेत 34 लाख 67 हजार डी.ई.सी. गोळ्या जिल्‍हास्‍तरांपासून गांवपातळीस्‍तरावंर पोहचविण्‍यात आलेले आहेत. ह्या आजाराचा प्रसार डासापासून सुक्ष्‍मकृतीमुळे होतो. प्रथम अवस्‍थेतील हत्‍तीरोग या आजाराचे लक्षण विरहित असून जंतू आपल्‍या शरीरात राहू नये व भविष्‍यात कधीही हत्‍तीरोगाची बाधा होवू नये म्‍हणून प्रत्‍येकाने गोळ्या खाणे गरजेचे आहे. एकदा रोग बळावल्‍यावर उपाय नाहीच. परंतू हत्‍तीरोग होवू नये म्‍हणून डी.ई.सी.गोळ्यांची फक्‍त एकच मात्रा वर्षातून एकदा सतत 5 वर्ष घेतल्‍यास, हत्‍तीरोग होत नाही. डी.ई.सी.गोळ्या  सुरक्षित असून, गोळ्यांचे सेवन केल्‍यानंतर एखाद्या व्‍यक्‍तीला ताप किंवा पुरळ आल्‍यास त्‍यांच्‍या शरीरात मॉयक्रोफायलेरीयाचे जंतू आहेतच असे समजावे.असेही त्‍या म्‍हणाल्‍या
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व आभार डॉ. झोडे यांनी केले.
    कार्यक्रमाला मोठ्यासंख्‍येने परिसरातील लाभार्थी तसेच आरोग्‍य कर्मचारी उपस्थित होते.
                                    000000 

No comments:

Post a Comment