Tuesday 28 February 2012

सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान 17 मार्च रोजी


          वर्धा,दि.28- महाराष्‍ट्र सुवर्ण महोतसवी वर्षानिमित्‍य राज्‍यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून सुवर्ण जयंती राज्‍स्‍व अभियान या नावाने राबविण्‍याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. जिल्‍ह्यातील सर्व तालुकयात 17 मार्च रोजी सुवर्ण जयंती राजस्‍व अभियानाला प्रारंभ होईल.
      जिल्‍ह्याने याआधी समाधान योजनेची अंमगलबजावणी केलेली असून त्‍यास मोठे यश देखील प्राप्‍त झालेले आहे. त्‍याच धर्तीवर या अभियाना अंतर्गत आतापावेतो जिल्‍ह्यामध्‍ये विविध प्रमाणपत्राचे वाटप करणे, प्रलंबित फेरफार, प्रलंबित महसुल प्रकरणे निकाली काढणे अशी कामे हाती घेण्‍यात आलेली आहेत. आता या अभियाना अंतर्गत जिल्‍ह्यात प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये दिनांक 17 मार्च 2012 रेाजी मेगा कॅम्‍प घेण्‍याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
     तालुकास्‍तरीय कॅम्‍पमध्‍ये खालील प्रमाणे कार्यवाही करुन प्रकरणे निकाली काढल्‍या  जाणार आहेत व जनतेला विविध दाखले कॅम्‍पचे ठिकाणी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.
     तलाठी दप्‍तर  अद्यावत करणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, सात बारा वाटप करणे, महसुल अभिलेखातील नकला देणे, विविध प्रमाणपत्राचे वितरण (जात,उत्‍पन्‍न,वारसान,रहिवासी, हैसियत व इतर प्रमाणपत्रे), जमिन मोजणी प्रकरणे, इंदिरा आवास योजने अंतर्गत भुखंड वाटप, शिधा पत्रिकेसाठी अर्ज, शिधा जिन्‍नस मिळत नसल्‍याबाबत तक्रारी, राज्‍य व केंद्र शासनाच्‍या सहाय्य योजनेतील लाभ, आम आदमी विमा योजना, गावठान विसतार योजने अंतर्गत भुखंड वाटप, जलपुर्ती सिंचन विहिरीसाठी अनुदान वाटप करणे, कृषी विषयक योजनेचे विविध लाभ देण्‍याचे योजना, नविन विज जोडणी,आदिवासी विभागाच्‍या विविध योजनेचे लाभ व समाज कल्‍याण  विभागाच्‍या योजनेचे विविध लाभ देण्‍यात येईल.
     जिल्‍ह्याच्‍या आठही तालुक्‍याच्‍या कार्यालयात दिनांक 12 मार्च रोजी अर्ज करण्‍याचा अंतीम दिनांक असून वर्धासाठी उपविभागीय अधिकारी वर्धा , सेलूसाठी जिल्‍हा नियेाजन अधिकारी,वर्धा, देवळीसाठी जिल्‍हा पुरवठा अधिकारी वर्धा, आर्वीसाठी उपविभागीय अधिकारी आर्वी, आष्‍टीसाठी खजांची विशेष भुसंपादन अधिकारी, कारंजासाठी मेश्राम, विशेष भुसंपादन अधिकारी, हिंगणघाटसाठी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट व समुद्रपूरसाठी संगितराव उपविभागीय अधिकारी यांच्‍या नेमणूका प्रभारी अधिकारी म्‍हणून करण्‍यात आल्‍या आहेत.
     जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी त्‍यांच्‍या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेच्‍या शिबीराचा पुरेपूर लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                               00000
                                               

No comments:

Post a Comment