Monday 29 August 2011

जिल्ह्यातील जलाशये लबालब


                     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.29 ऑगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------------
                       
वर्धा,दि.29-वर्धा पाटबंधारे विभाग यांनी पाठविलेल्या अहवालानुसार आज दिनांक 29 ऑगस्ट 2011 रोजी जलाशयातील पाण्याच्या पातळीच्या स्थितीत सुधारणा झाली असून,जलाशये लबालब झाली आहे.
     धाम प्रकल्प महाकालीच्या जलाशयातील पूर्ण संचय पातळी 328.60 मिटर असून, पाण्याचा उपयुक्त साठा 62.51 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 52.51 द.ल.घमी. असून, उपयुक्त साठ्याची वास्तविक टक्केवारी 84.01 आहे. पोथरा प्रकल्प धरणाची पूर्ण संचय पातळी 229.40 मिटर असून, पाण्याचा उपयुक्त साठा 34.72 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 34.72 द.ल.घ.मीटर असून, उपयुक्त साठ्याची वास्तविक टक्केवारी 100 टक्के आहे.सांडव्यावरुन 24 सेमी 47.25 क्सुसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.बोर प्रकल्प जलाशयातील पूर्ण संचय पातळी 330.40 मीटर असून, पाण्याचा उपयुक्त साठा 127.42 द.ल.घ. मिटर आहे. जलाशयातील साठा   119.74 द.ल.घ.मीटर असून, उपयुक्त साठ्याची वास्तविक साठयाची टक्केवारी 94.2 आहे.
डोंगरगाव प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 297.95 मीटर असून, उपयुक्त साठा 4.44 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 4.44 द.ल.घ.मीटर असून, वास्तविक साठ्याची टक्केवारी 100 टक्के आहे. सांडव्यावरुन 3 सें.मी.ने 0.80 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पंचधारा प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 305.50 मीटर असून, उपयुक्त साठा 8.75 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयाचा साठा 8.75 द.ल.घ.मीटर असून, वास्तविक साठ्याची टक्केवारी 100 टक्के आहे. सांडव्यामध्ये  5 से.मी. ने 2.44 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.मदन प्रकल्प पूर्ण संचय पातळी 329.90 मीटर असून उपयुक्त साठा 10.56 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 8.29 द.ल.घ.मीटर असून,वास्तविक साठ्याची टक्केवारी 78.59 टक्के आहे. मदन उन्नई धरणाची पूर्ण संचय पातळी 273.65 मीटर असून,उपयुक्त साठा 2.70 द.ल.घ.मीटर आहे.जलाशयातील साठा 2.70 द.ल.घ.मिटर असून, साठ्याच्या वास्तविक टक्केवारी 100 टक्के आहे. सांडव्यावरुन 5 सें.मी.ने 3.11 से.मी. क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. लाल नाला प्रकल्प संचय पातळी 234.15 मिटर असून, उपयुक्त साठा 27.613 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 24.49 द.ल.घ.मीटर असून, टक्केवारी 88.71 आहे. नांद प्रकल्पातील साठा 247 मीटर असून, उपयुक्त साठा 53.18 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 24.63 द.ल.घ.मीटर असून, साठ्याची टक्केवारी 46.32 आहे.
वडगाव प्रकल्पातील संचय पातळी 255.10 मीटर असून, उपयुक्त साठा 136 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 127.20 द.ल.घ. मीटर असून, जलाशयाची साठ्याची टक्केवारी 93.53 आहे. उर्ध्व वर्धा धरणाची संचय पातळी 342.50 मीटर असून, उपयुक्त साठा 548.14 द.ल.घ.मीटर आहे. धरणात 540.11 द.ल.घ.मीटर साठा असून, साठ्याची टक्केवारी 95.79 टक्के आहे. 11 दारे 71 से.मी. उघडली असून 1257 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. वर्धा कार नदी प्रकल्पात पूर्ण संचय पातळी 432.65 मीटर असून, उपयुक्त साठा 21.063 आहे. जलाशयाचा साठा 21.06 द.ल.घ.मीटर असून, साठ्याची टक्केवारी 100 आहे. सांडव्यावरुन 35 सें.मी. ने 77.28 क्युसेस पाणी विसर्ग होत आहे.  निम्न वर्धा प्रकल्पाची संचय पातळी 283.60 मीटर असून उपयुक्त साठा 216.87 द.ल.घ. मीटर आहे. जलाशयातील साठा 769 द.ल.घ.मीटर असून, टक्केवारी 7.44 आहे. या धरणातून 900  क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत असून, धरणाचे 30 दरवाजे 70 सेंमी.ने उघडले आहे. बेंबाळा प्रकल्पात संचय 269.50 मीटर असून, उपयुक्त साठा 302.67 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 118.62 द.ल.घ.मीटर असून, साठ्याची टक्केवारी 39.19 आहे. पाण्याचा विसर्ग 288 क्युसेस ने होत असून 6 (सहा) गेट 50 से.मी.ने उघडले आहे.सुकळी लघू प्रकल्‍पात संचय पातळी 286.15 मीटर असून, उपयुक्त साठा 10.27 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयाचा साठा 10.27 द.ल.घ.मीटर असून, त्यांची टक्केवारी 100 आहे. सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग 5 से.मी.ने 4.32 क्सुसेस होत आहे. अशी माहिती वर्धा पाटबंधारे सिंचन विभागाच्या अहवालात नमूद आहे.
                   000000

No comments:

Post a Comment