प.क्र-
434
दि.11.06.2021
बेरोजगार युवकांसाठी 16 ते 18 पर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे
आयोजन
वर्धा, दि.11(जिमाका) : जिल्हयातील बेरोजगार युवकांना
नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे वतीने 16 ते 18 जुन पर्यंत ऑन लाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https:/rojgar.mahaswyam.gov.in या
संकेतस्थळावर त्यांच्या सेवायोजन
कार्डच्या प्रोफाइल वरुन संबधित कंपनीचे नाव शोधून ऑनलाईन अर्ज करुन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे
यांनी केलेआहे.
मेळाव्यात 10 वी पास व नापास, 12 वी व पदवीधर
बेरोजगार उमेदवारांसाठी रिक्त असलेली
पदे https:/rojgar.mahaswyam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन देण्यात आलेली आहे. सदर मेळाव्यात मे. गिमाटेक्स इंडस्ट्रीज वणी, हिंगणघाट, एमडीएसएचजी मार्केटींग कंपनी व जयभवानी फार्मकिंग ॲग्रो इंडस्ट्रिज वर्धा या कंपन्या सहभागी होणार आहे. मेळाव्यात सहभागी झालेल्या
उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्स
अथवा टेलीफोन व्दारे ऑनलाईन
घेण्यात येईल.
याबाबत काही अडचणी आल्यास
कार्यालयाच्या 07152-242756 या दूरध्वनी
क्रमांकावर किंवा wardharojgar@gmail.com ईमेल आयडीवर संपर्क
साधावा असे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment