Thursday 10 June 2021

 प.क्र- 425                                                                    दि.10.06.2021

दिव्यांग व्यक्तींच्या राज्य सल्लागार मंडळासाठी नियुक्ती करिता अर्ज आमंत्रित

         वर्धा दि, 10 :   महाराष्ट्र राज्य सल्लागार  मंडळाकरीता दिव्यांग व्यक्ती तथा संस्थाचे प्रतिनिधी यांची  नाम निर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करायची आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीने आपल्या माहितीचे व केलेल्या कामाचे  कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 19 जून 2021 पर्यंत द्विप्रतीत  समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, वर्धा येथे सादर करावे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

         राज्य सल्लागार मंडळासाठी दिव्यांगत्व व त्याचे पुनर्वसन या क्षेत्रामधील तज्ञ असतील अशा पाच व्यक्ती (सदस्य संख्या 05), राज्य शासनाने विहीत केलेल्या रोटेशन पध्दतीने जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी नामनिर्देशित करावयाचे असे पाच प्रतिनिधी / व्यक्ती (जिल्हा प्रशासनाकडून शिफारस केली नसल्यास नाम निर्देशन करता येणार नाही) (सदस्य संख्या 05), दिव्यांगत्वाशी संबंधीत असणाऱ्या अशासकीय संस्था किंवा दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या संस्थांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी, शक्य असेल इतके दहा दिव्यांग व्यक्ती. या उपखंडाखाली सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या 10 व्यक्तींपैकी कमीत कमी 5 व्यक्ती महिला आणि कमीत कमी 1 व्यक्ती अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीपैकी असावी अशी तरतुद आहे.( सदस्य संख्या 10),

           तीन पेक्षा जास्त नसतील असे राज्य स्तरावरील वाणिज्य व उद्योग संघाचे प्रतिनिधी संदस्य संख्या 3,  दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील उपकलम 2 (2) अन्वये दिव्यांगत्वावर संशेाधन करण्याकरीता गठीत करावयाच्या संशोधन समितीवर नियुक्ती करीता नाव निर्देशित सदस्यांची माहिती. महाराष्ट्र शासनाने नामनिर्देशनाने वैज्ञानिक / संशोधन यामधून नियुक्त केलेले तीन सदस्य (परंतु सदरचे वैज्ञानिक / संशोधन त्यांचे संशोधनास केंद्र किंवा राज्य शासनाच्या कायद्यान्वये स्थापिक नामांकित (अधिकृत) संस्थेने मान्यता दिलेली असणे आवश्यक आहे. सदस्य संख्या 3, अधिनियमांतर्गत निर्दिष्ट केलेल्या दिव्यांग प्रकारातील तज्ञ व्यक्ती चार सदस्य (परंतु अधिनियमांतर्गत निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही दिव्यांगत्वाच्या प्रकारातील वैज्ञानिक अथवा तज्ञ व्यक्ती असलेल्या अशा व्यक्तीस शासन नामनिर्देशित करेल.) (परंतु असे की. जी वैज्ञानिक / तज्ञ व्यक्ती असेल व अधिनियमांतर्गत निर्दिष्ट केलेल्या दिव्यांगत्वाच्या प्रकारातील दिव्यांगत्व धारण करीत असेल अशा व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.) सदस्य संख्या 4, अर्ज करणाऱ्या व्यक्तीने आपल्या माहितीचे व केलेल्या कार्याचे पुष्ठयार्थ कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 19 जून 2021 पर्यंत द्विप्रतीत फाईलसह समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, वर्धा येथे सादर करावे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

                               

No comments:

Post a Comment