Friday 24 March 2017



       पाणी बचतीचे महत्‍व प्रत्‍येक नागरिकांपर्यंत पोहचवावे
                                                                     -शैलेश नवाल
     वर्धा दि 22- पाणी बचत ही काळाची गरज असून भावीपिढीला समृध्‍द करण्‍यासाठी आजपासुन पाणी बचतीचे महत्‍व प्रत्‍येक नागरिकांपर्यंत पाहोचवावे असे मत जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी जलजनजागृती सप्‍ताहाचे  समारोपीय कार्यक्रमप्रसंगी व्‍यक्‍त केले. 
            विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर व निम्‍न वर्धा प्रकल्‍प यांच्‍या वतीने 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले होते. या सप्‍ताहाचे समारोपीय कार्यक्रम प्रसंगी शैलेश नवाल बोलत होते. यावेळी अध्‍यक्षस्‍थानी नागपूर पांटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत गवळी होते. तर नगराध्‍यक्ष अतुल तराळे, समाजसेवक पंडित शंकरप्रसाद अग्‍नीहोत्री, शेती तंज्ञ विजय जावंधिया, समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, एमगीरीचे प्रफुल्‍ल काळे, निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे कार्यकारी अभियंता शंकरराव मंडवार, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती, कार्यकारी अभियंता दत्‍तात्रय रब्‍बेवार, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित मेश्राम यांची प्रमुख उपस्थितीती होती.
            जिल्‍हाधिकारी पुढे बोलतांना म्‍हणाले महात्‍मा गांधीचे स्‍वप्‍न होते. गावाकडे चला त्‍यांचे हे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍यासाठी खेडी समृध्‍द झाली तर नागरिक समृध्‍द होईल. याकरिता शेतक-यांना समृध्‍द करण्‍यासाठी त्‍यांच्‍या शेतीला सिंचन सुविधा देणे महत्‍वाचे आहे. सिंचनासाठी पाणी बचतीचे महत्‍व पटवून काटकसर करणे तेवढेच महत्‍वाचे आहे. जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत जास्‍तीत जास्‍त कामे नाला खोलीकरणाचे घेण्‍यात येत आहे. यामुळे शेतक-यांना जास्‍त प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्‍ध होणार आहे.
            पाणी वापर सहकारी संस्‍थानी केवळ संस्‍था नोंदणी न करता शेतक-यांना पाणी बचतीचे महत्‍व पटवून देण्‍याचे कार्य करावे. शेतक-यांनी नगदी पिकाची शेती करावी. तसेच नागरिकांनी सांडपाण्‍यावर प्रक्रिया करुन पाणी वापरण्‍यासाठी नियोजन करणे महत्‍वाचे आहे. जिल्‍हयात 48 टक्‍के क्षेत्र सिंचनाखाली आहे. ते क्षेत्र आज वाढविण्‍याची गरज असल्‍याचे यावेळी जयंत गवळी म्‍हणाले. सुक्ष्‍मसिंचन योजनेसाठी शेतक-यांना अनुदानावर शेती साहित्‍य देण्‍यात येणार आहे. यासाठी शेतक-यांनी सुक्ष्‍मसिंचन शेती करावी असेही आवाहन यावेळी श्री. गवळी यांनी केले.
            पंडित शंकरप्रसाद अग्‍नीहोत्री म्‍हणाले आपण दैनंदिन जिवनात वापरत असलेले 75 टक्‍के पाणी हे वाहून जातात. व 25 टक्‍केच पाणी वापरले जाते. यासाठी पाण्‍याचे महत्‍व जाणण्‍यासाठी चिंतन करण्‍याची आज गरज आहे. पाणी हेच जिवन आहे. ज्‍याप्रमाणे शरीराला पाच लिटर महत्‍वाचे आहे. यासाठी पाण्‍याचे महत्‍व ओळखले पाहिजे. भूमी, पर्यावरण व पाण्‍याला वाचविण्‍यासाठी सर्वानी एकत्र येण्‍याची गरज आहे. यासाठी आपले विचार बदलण्‍याची गरज आहे. प्रत्‍येकांनी विचार बदलल्‍यास समाजाचा विकास होण्‍यास मदत होईल.
            यावेळी विजय जावंधिया, मुरलीधर बेलखोडे व मोहन अग्रवाल, अतुल तराळे यांनी सुध्‍दा आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
            प्रास्‍ताविकात बोलतांना श्री. रब्‍बेवार म्‍हणाले, पाण्‍याचा वापर काटकसकर करुन बचत करावी. आपल्‍याला उपलब्‍ध असलेल्‍या पाण्‍याचा 80 टक्‍के वापर सिंचनासाठी करण्‍यात येतो. शेतक-यांनी कमीतकमी पाणी वापरुन जास्‍तीत जास्‍त सिंचन  करावे. आर्वी तालुक्‍यात साडे आठ हजार हेक्‍टर सुक्ष्‍म सिंचन प्रकल्‍प प्रायोजिक तत्‍वावर सुरु करण्‍यात येणार आहे. मातीच्‍या कालव्‍यातून पाणी वाहून जात असतात. यासाठी शेतक-यांनी लक्ष देऊन काळजी घेण्‍याचे आवाहन यावेळी त्‍यांनी केले.  
            यावेळी जलजागृती सप्‍ताहानिमित्‍त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी  आयेाजित करण्‍यात आलेल्‍या चित्रकला स्‍पर्धेचे बक्षिस वितरण करण्‍यात आले.
            कार्यक्रमाला सुहास पाटील, संदीप हासे, इरफान शेख क्रिष्‍णा भादे, इमरान राही, राजेश धोपटे, राकेश राणा, विजय डेहनकर, साहेबराव गोडे, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकरी मोठया संख्‍येने  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment