Thursday 27 May 2021

 

..क्र-384                                                                     दि.27.05.2021

शेतक-यांनी घरपोच बिण्याण्याकरीता शेतकरी गटाकडे नोंदणी करावी

वर्धा, ,दि.27 (जिमाका):-कोरोना 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हयात कडक लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे. खरीप हंगाम लवकरच  सुरु होत असून शेतक-यांना  कृषि निविष्ठा  खरेदी कराव्या लागणार आहे. परंतु कृषि केंद्रावर  शेतक-यांची गर्दी होऊ नये यासाठी शेतक-यांना कृषि विभागामार्फत घरपोच बांधावर  खत पुरवठा  ही मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी शेतक-यांनी  त्यांच्या भागात आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गटाकडे बियाणे व खताची मागणी नोंदवावी असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

          शेतक-यांनी  त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या गटांकडे आपली नोंदणी करावी नोंदणी करतांना आत्मा अंतर्गत  ज्या गटाची नोंदणी झालेली आहे, त्याच गटांकडे नोंदणी होईल असे करावे,  यामुळे  100 टक्के  शेतक-यांची नोंदणी कोणत्या ना  कोणत्या गटाकडे  करणे शक्य होईल. 

          खते व बियाण्याची नोंदणी करतांना  शेतक-यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर, गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक (आधार कार्डशी लिंक असणारा) ज्या कृषि सेवा केंद्रामधुन  खत खरेदी  करावयाचे आहे,  त्यांच्या नावासह  रासायनिक खतांची व बियाण्याची मागणी गटाकडे करावी.  गटप्रमुखाने  रासायनिक खते व वाहतुक खर्चाकरीता लागणारी रक्कम सर्व सदस्याकडुन प्राप्त करुन  घ्यावी व कृषि  विभागाच्या संबधित कृषि सहाय्यकाकडे संपर्क साधावा.

          रासायनिक खताची मागणी गटांकडे प्राप्त झाल्यांनतर  गटप्रमुखानेच रासायनिक खते खरेदी करावी.  जेणेकरुन  सर्व शेतक-यांना  विक्री केंद्रावर जावे लागणार नाही.  केंद्रशासनाच्या पत्रानुसार  शेती पिकासाठी  एका शेतक-याला  त्याच्या आधार क्रमांकावर  प्रत्येक महिन्याला  50 गोण्या खत  व फळपिकासाठी  1 हजार 200 गोण्या खत खरेदी करता येते  त्यामुळे गटप्रमुखाने गटातील  शेतक-यांच्या नावे  स्वतंत्र पावती तयार करुन खताची खरेदी कावी.  शक्य असल्यास विक्रेत्यांनी मोबाईल ॲप  तयार करुन  शेतक-याची मागणी नोंदवून  घ्यावी व मोठया प्रमाणात मागणी असल्यास  मागणीप्रमाणे रासायनिक खते शेतक-यांच्या शेतापर्यंत  पोहोचवावे. कृषि सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतूकीकरीता कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी समन्वयक म्हणुन काम करावे. बियाणे व वाहतुकीचा खर्च सबंधीत  शेतक-यांना करावा लागेल.

        मंडळ कृषि अधिकारी , कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक किंवा तालुका तंत्रज्ञान सहाय्यक आत्मा यांनी  व्हिडिओ कॉलव्दारे  शेतकरी आणि  कृषि निविष्ठा विक्रेता यांचा समन्वय घडवून  रासायनिक  खते खरेदी व्यवहारामध्ये  पारदर्शकता  ठेवून  शेतक-यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.  तसेच जे शेतकरी वैयक्तिकरित्या  रासायनिक खते व बियाणे खरेदी करु इच्छितात अशा शेतक-यांनी आपल्या पसंतीच्या  कृषि केंद्र चालकाकडे भ्रमनध्वनी व्दारे किंवा व्हाट्सॲप व्दारे  मागणी नोंदवावी.  याबाबत काही अडचण असल्यास  सबंधित पंचायत समितीच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा. असे कृषि विभागाने कळविले आहे.

                                                0000

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment