Thursday 27 May 2021

 

.क्र-382                                                                     दि.27.05.2021

केसरी शिधापत्रिका धारकांना जुन महिन्याचे राशन मिळणार सवलतीच्या दरात

वर्धा, ,दि.27 (जिमाका):-कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावास प्रतिबंध व्हावा याकरीता राज्यासह जिल्हयात  टाळेबंदी लागू करण्यात आलेली आहे.  जिल्हयामधील  शासकीय गोदामामध्ये तसेच  रास्तभाव  दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्न धान्याचे (गहु व तांदुळ )  सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे.  सदर अन्न धाप्न्याचे वाटप  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत  समाविष्ठ    झालेल्या  ए.पी.एल.  केशरी शिधापत्रिका धारकांना माहे जुन करीता  गहू 8 रुपये दराने प्रति किलो तर  तांदूळ 12 रुपये दराने  प्रति किलो वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी  रमेश बेंडे यांनी केले आहे. 

          जिल्हयात एकुण 857 रास्तभाव दुकाने असुन  रास्तभाव दुकानदारांना  धान्याची पोहोच करण्याचे काम सुरु असून   प्रथम मागणी  करणा-यास धान्य देणे या तत्वावर  प्रति सदस्य 1 किलो गहू व 1 किला तांदूळ याप्रमाणे जुन महिन्याचे धान्याचे सवलतीच्या दरात म्यनुअल पध्दतीने वितरण करण्यात येणार आहे. असे  जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                00000

No comments:

Post a Comment