Friday 26 August 2016

                         कार्यक्षम  अधिकां-यापासून प्रेरणा घ्‍यावी
                                                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.26 :- शासकिय कामे करतांना एकमेकांचे सहकार्य घेऊन कामे केल्‍यास प्रशासकिय कामात गतीमान येऊन नागरिकाची कामे चांगल्‍या प्रकारे करता यईल यासाठी चांगल्‍या अधिकां-यापासून कामाची प्रेरणा घ्‍यावी असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकास भवन येथे निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांची चंद्रपूर येथे बदली झाल्‍यामुळे त्‍यांना प्रशासनाच्‍या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमाला अपर जिल्‍हाधिकारी संजय दैने , निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्‍हाधिकारी श्री.लोणकर,यांची प्रमुख उप‍स्थिती होती.
यावेळी  निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांची नुकतीच चंद्रपूर येथे बदली झाली  असल्‍यामुळे त्‍यांच्‍या जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे हस्‍ते शाल श्रीफळ व भेट वस्‍तू देऊन सत्‍कार करण्‍यात आला तर त्‍यांच्‍या जागे बदलून आलेले मंगेश जोशी यांचाही यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. तसेच नव्‍याने रुजु झालेले उपजिल्‍हाधिकारी  श्री. लोणकर  यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
शासकिय कर्तव्‍य बजावतांना नागरिकांचे समाधान हीच आपल्‍या कामाच्‍या यशाची पावती आहे. शासकिय कामाचे  वैभव नावडकर मध्‍ये सर्व गुण होते त्‍यामुळे त्‍यांना नुकतेच नागपूर विभागाच्‍या वतीने उत्‍कृष्‍ट अधिकारी म्‍हणुन गौरविण्‍यात आले होते. हिच त्‍यांच्‍या यशाची पावती होती. यासाठी आपण सर्वानी अशा अधिकांपासुन प्रेरणा घ्‍यावी असेही ते म्‍हणाले.
वैभव नावडकर म्‍हणाले  सर्व कर्मचा-यांचे सहकार्य मिळाल्‍यामुळेच काम करण्‍यास उत्‍साह वाढला कारण शासकिय कामे करतांना एकटयाने कामे कधी च होत नसून सर्वानी मिळून एकजूटीने कामे केल्‍यामुळे  कामामध्‍ये पारदर्शकता आणता आली .
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक महसूल संघटनेचे अध्‍यक्ष श्री. लोखंडे यांनी केले. यावेळी  जिल्‍हा नियोजन अधिकारी टेंभुणे, लेखाधिकारी प्रतापराज मासाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, तालुक्‍यातील सर्व तहसिलदार, महसूल विभागाचे कर्मचारी मोठया संख्‍यने उपस्थित होते.
                                                0000

                            बचत गटानी उत्‍कृष्‍ट उद्योजक बनावे
                                                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.26 :-बचत गटानी बाजापेठेतील उत्‍पादकाशी स्‍पर्धा करुन लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्‍कृष्‍ठ उद्योजक बनावे. यासाठी त्‍यांनी तयार केलेल्‍या उत्‍पादनाला शासनाच्‍या वतीने बाजार पेठ मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येईल  तसेच उद्योगाकरिता निधी सुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात येईल असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज विकास भवन येथे महाराष्‍ट्र ग्रामीण जिवनोन्‍न्‍ती अभियानांतर्गत उमेद,  माविम व कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प यांच्‍या वतीने आयोजित वस्‍त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेत  केले.
          या वस्‍त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेच्‍या कार्यक्रमाला कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प (केम) चे प्रकल्‍प संचालक गणेश चौधरी, जिल्‍हा परिषदचे उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्‍हा अग्रणी बँकेचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक जांगडा, नाबार्ड च्‍या व्‍यवस्‍थापक श्रीमती बन्‍सोड, रितेश ताजने, माविमच्‍या जिल्‍हा व्‍यवस्‍थापक दारोडकर, देवकुमार कांबळे, कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍पाचे जिल्‍हा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक  निलेश वावरे, प्रविण जयस्‍वाल व मिलींद भगत यांची प्रमुख उपस्थित होती.
पुढे बोलतांना शैलेश नवाल म्‍हणाले बचत गटानी आपला  कायमस्‍वरुपी उदरनिर्वाह चालविण्‍यासाठी शेती, दाल मिल, घरगुती कापड उद्योग यासारखे उद्योग सुरु करुन रोजगार  निर्मिती करुन कुशल उद्योग सुरु करावे. यासाठी शासनाच्‍या योजनांचा लाभ घेऊन  आपला उद्योग सुरु करावा व बाजारपेठेत आपल्‍या बचत गटाची ओळख निर्माण करावी. बचत गटानी उत्‍पादीत केलेल्‍या मालाला  शहरातील मध्‍यभागी दुकाणे सुरु करुन कमीशनवर विकण्‍यास प्रयत्‍न करण्‍यात येईल. गटानी शेतीवर आधारित आधुनिक उपकरणे खरेदी करुन शेतक-यांना भाडे तत्‍वार दयावी. या उपकरणामुळे शेतक-यांना आधुनिक शेती करण्‍यास मदत होईल बचत गटांना आर्थिक लाभ होऊन बचत गट सक्षम होण्‍यास मदत होईल.  तसेच बाजारपेठेतील उत्‍पादनांशी स्‍पर्धा करुन या स्‍पर्धेत उतरायला पाहिजे. असेही ते म्‍हणाले.
प्रमोद पवार म्‍हणाले बचत गटानी बाजारपेठेमध्‍ये ज्‍या वस्‍तुची जास्‍त मागणी असेल त्‍याच वस्‍तुचे उत्‍पादन करावे. जेणेकरुन गटाच्‍या उत्‍पादित मालाला  भाव मिळून  गटाचे आर्थिक उत्‍पन्‍न वाढेल पर्यायाने गट सक्षम होईल. तसेच कंपनी च्‍या मालाशी स्‍पर्धा करुन कमी दरात मालाची विक्री केल्‍यास जास्‍त प्रमाणात बाजारपेठ मिळण्‍यास मदत होईल.
यावेळी कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प (केम) च्‍या वतिने प्रकाशित यशोगाथा या पुस्तिकेचे मान्‍यवरांचे हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.
यावेळी केमचे प्रकल्‍प संचालक गणेश चौधरी व इतर मान्‍यवरांनी उपस्थित बचत गटाच्‍या महिलांना उद्योग सुरु करण्‍याविषयी मार्गदर्शन केले.





                                           


















No comments:

Post a Comment