Monday 22 August 2016

                  दिपालीला मिळाली उपजिल्‍हाधिकारी होण्‍याची प्रेरणा
Ø एक दिवस प्रशासनासोबत
Ø जिल्‍हाधिकारी यांचा नविन उपक्रम
Ø स्‍पर्धा परिक्षार्थीसाठी प्रेरणा प्रकल्‍प
वर्धा, दि.22 :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा परिक्षेची तयारी करण्‍यासाठी योग्‍य दिशा मिळावी यासाठी जिल्‍हा ग्रंथालय मध्‍ये येणा-या विद्यार्थ्‍यांसाठी महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्‍यात येत आहे. याचेच पुढचे पाऊल म्‍हणुन या शिबिरात येणा-या विद्याथ्‍यांमधुन  एका विद्यार्थ्‍याला तिस-या शनिवारी प्रशासनासोबत एक दिवस घालविण्‍याची संधी मिळणार आहे. दिपाली जयस्‍वाल ही अशी संधी मिळणारी पहिली विद्यार्थींनी ठरली असून यामुळे उपजिल्‍हाधिकारी होण्‍याची नवी प्रेरणा मिळाल्‍याचे मत दिपालीने व्‍यक्‍त केले.
आज प्रत्‍येक क्षेत्रात नोकरी  मिळण्‍यासाठी प्रंचड स्‍पर्धेचा सामना करावा लागतो. मोठया शहरांमध्‍ये स्‍पर्धा परिक्षेचे अनेक क्‍लसेस चालतात. मात्र ग्रामीण भागातील बेरोजगारांना शहरातील मुलांसारखी अशी क्‍लासेसची सुविधा उपलब्‍ध होत नाही. आहे त्‍या अपु-या सुविधांमधुनच ग्रामीण तरुण स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतात. अशा अभावग्रस्‍ततेच्‍या तयारी वरच एमपीएससी व युपएससी सारख्‍या परिक्षांना सामोरा जातेा. ग्रामीण भागातील अशा  नाहीरेंच्‍यासाठी  जिल्‍हाधिकारी यांच्‍या पुढाकारातून जिल्‍हा  प्रशासन आणि जिल्‍हा ग्रंथालयाच्‍या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोज‍न करण्‍यात येत आहे.
मागील दोन महिन्‍यापासून प्रत्‍येक महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी सामाजिक न्‍याय भवन येथे दुपारी 2.30 ते 4.30 हे दोन तास विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करण्‍यात येते. आतापर्यंत जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधिक्षक अंकित गोयल. , बॅक प्रोबेशनरी ऑफीसर वैभव गांवडे परिविक्षाधिन उपजिल्‍हाधिकारी स्‍वप्‍नील तांगडे यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले आहे.
स्‍पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांना प्रशासनाची तोंडओळख व्‍हावी आणि अधिका-यांच्‍या प्रत्‍यक्ष भेटीने त्‍यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्‍हाधिकारी यांनी विद्यार्थ्‍यांना एक दिवस प्रशासना सोबत घालवण्‍याची सुवर्ण संधी उपलब्‍ध करुन दिली आहे. महिन्‍याच्‍या तिस-या शनिवारी एका विद्यार्थ्‍याला ही संधी मिळणार आहे. दिपाली जयस्‍वाल ही या प्रेरणा प्रकल्‍पातील पहिली विद्यार्थीनी ठरली असून शनिवारी जिल्‍हाधिकारी यांनी तीच्‍याशी प्रत्‍यक्ष संवाद साधला. ग्रंथालयामध्‍ये येणा-या अडचणी तसेच मार्गदशन कार्यशाळेत कोणकोणत्‍या विषयाचे मार्गदर्शन करण्‍याची गरज आहे, यावर चर्चा केली. महसूल अधिका-यांच्‍या बैठकीत सहभागी होण्‍याची संधीही तीला मिळाली. अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय दैने यांनी प्रश्‍नांचा भडीमार करुन दिपालीला मुलाखतीच्‍या वातारवरणाची जाणीव करुन दिली.

सामान्‍य माणसाला मोठया अधिकां-शी  बोलायची भिती वाटते तिथे आज मला जिल्‍हाधिका-याशी थेट संवाद साधायला मिळाला ही गोष्‍ट माझ्यासाठी  कल्‍पनेपलिकडची आहे. यामुळे प्रशानाबद्दलची माझी भिती दूर झाली  असून प्रशासकीय अधिका-यांकडे असलेले अधिकार आणि कर्त्‍यव्‍य याची जाणिव झाली आहे. यातून मला नविन उर्जा मिळाली असून उपजिल्‍हाधिकारी होण्‍यासाठी मी आता खूप अभ्‍यास करणार असल्‍याचे दिपालीने सांगितले यासाठी तीने जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे आभार मानुन सर्व तरुणांना अशी संधी मिळाल्‍यास ग्रामीण भागातील तरुण मोठया प्रमाणात प्रशासनात येतील असा आशावाद तिने व्‍यक्‍त केला.
                                                                             दिपाली जयस्‍वाल



No comments:

Post a Comment