Monday 28 March 2016

पाण्याच्या बचतीसाठी महिलांचा सहभाग आवश्यकप्रमोद पवार
Ø  जागतिक जल दिनाचे आयोजन
Ø  टाळळी (चना) येथे महिला मेळावा
Ø  गावक-यांनी केला जलबचतीचा संकल्प
Ø  शाळा इमारतीचे भूमिपूजन
          वर्धा, दिनांक 23 – अनियमित अपु-या पडणा-या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रत्येक गावात निर्माण होत आहे. टंचाई परिस्थितीवर प्रभावीपणे मात करावयाची असल्यास गावाच्या शिवारात पडणा-या पावसाचा संचय करणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याच्या बचतीसाठी काटकसरीने वापरासाठी महिलांचा सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार यांनी केले आहे.
            जागतिक जलदिनानिमित्त टाकळी चना येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जलजागृती निमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी टाकळी (चना) येथील नवीन शाळा वर्ग खोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी यशोदा नदीच्या पाण्याचे जलपूजन करून पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला.   
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी धनराज तेलंग होते. यावेळी देवळी पंचायत समितीचे सभापती भगवान भरणे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे समन्वयक विनेश काकडे, सप्तखंजेरीवादक भाऊसाहेब थुटे, संस्थेच्या प्रकल्प अधिकारी निलिमा बांगरे, उपसरपंच श्रीमती सावित्री पडघाम आदी उपस्थित होते.
              पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार सारख्या उपक्रमात ग्रामस्थ महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करताना श्री प्रमोद पवार म्हणाले की प्रत्येक गावात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी उमरी मेघे गावाने राबविलेला 24 बाय 7 चा उपक्रम टाकळी चना येथेही राबवावा. स्वचछ पाणी उपलब्ध झाल्यास ग्रामीण आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत, जलसंधारणामुळे उपलब्ध झालेले पाणी शेतीला सिंचनासाठी वापरता येईल. त्यामुळे जानकीदेवी बजाज संस्थेने नाला सरळीकरण पाणी अडविण्याच्या उपक्रमाचे कौतूक केले.
सभापती भगवान भरणे यांनी जलसंधारणासोबतच ग्राम स्वचछता तसेच शैक्षणिक विकासासाठी -लर्निंग सारखे उपक्रम शाळेत राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करताना गावांना लागणा-या पाण्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे, ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी जानकीदेवी बजाज संस्था पुढाकार घेत असतानाच या शाळाही माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग घेऊन चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा उपक्रम राबवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
         माजी विद्यार्थ्यांकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक प्राथमिक शाळांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          गिरोली या गावापासून सुरू होणा-या पाच किलोमीटर नाल्याचे खोलीकरण तसेच गॅब्लिअन पद्धतीने 19 दगडीबांध बांधण्यात आले आहेत. नाल्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यात आल्यामुळे चार गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पिण्याचे पाणी तसेच शेतीला सिंचनाचा लाभ होत आहे. टाकळी चना येथील उच्च प्राथमिक शाळेत मुली मुलांसाठी स्वच्छता गृहे विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शाळा खोलीचे बांधकाम करण्यात येत असून शेतक-यांना तुषार सिंचन, गोठ्यांचे बांधकाम, विहिरींची दुरूस्ती, पुनर्भरणासाठी 26 लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार प्रमाणे प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करण्यात आले.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आणि श्री. थुटे यांनी मार्गदर्शन केले.
        प्रारंभी संस्थेचे जिल्हा समन्वयक विनेश काकडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात जागतिक जल दिनानिमित्त आयोजित महिला मेळावा तसेच शाळा खोलीबांधकाम आदी उपक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय इंगोले यांनी केले. कवडू थूल यांनी आभार मानले. यावेळी केंद्र प्रमुख्श्री. राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दामोदर मंगाम, ग्रामपंचायत सदस्य संगिता भीवगडे, ज्योती उगेमुगे, रवी इंगोले, वासुदेव चौधरी, शेतकरी, ग्रामस्थ महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment