Sunday 14 February 2016


प्र.प.क्र.113                                                                                                दिनांक –  13 फेब्रुवारी 2016
शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी
पोलिस वाहतूक नियंत्रण शाखा
          वर्धा : शहरातील विस्कळीत वाहतुकीवर नियंत्रणासाठी तसेच शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची पोलिस वाहतूक नियंत्रण शाखा कामगिरी पार पाडत असते. हा स्वतंत्र असा विभाग कार्यरत असून शहरातील अंतर्गत वाहतुकीवर या शाखेमार्फत नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी दिली आहे.
           शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता स्वतंत्र विभाग कार्यरत आहे.  शहरातील अंतर्गत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिस वाहतूक नियंत्रण शाखा पार पाडत असते, असेही त्यांनी सांगून उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हिंग लायसन्स, नवीन वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, ना वापर, वाहनांचा कर भरणा, वाहन परवाना, वाहनांवरील खटला इत्यादी परिवहन विभागाशी संबंधित सर्व कार्य कार्यालयामार्फत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.  

                                                     0000

No comments:

Post a Comment