Sunday 21 February 2016

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये सुधारणा
सूचविण्याकरीता शनिवारी क्रीडा कार्यालयात बैठक
           वर्धा, दिनांक 18 – शिवछत्रपती  राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सद्यस्थितीत प्रचलित शासन निर्णयानुसार नियमांमध्ये सुधारणा सूचविण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील क्रीडा संघटक, मार्गदर्शक, एकविध क्रीडा संघटना, क्रीडा संस्था, मंडळे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती क्रीडा, अर्जुन पुरस्कारार्थी, क्रीडा पत्रकार, क्रीडा प्रेमी, नागरिक यांची शनिवार, दिनांक 20 फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर यांनी कळविले आहे.
              यापूर्वीही याबाबत अभिप्राय, सल्ला आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. मात्र  डिसेंबर अखेरपर्यंत एकही अभिप्राय या कार्यालयाला प्राप्त झाला नाही, असेही श्री. रेवतकर यांनी कळविले आहे. तरी जिल्ह्यातील क्रीडा संघटक , मार्गदर्शक, एकविध क्रीडा संघटना, क्रीडा संस्था, मंडळे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती क्रीडा, अर्जुन पुरस्कारार्थी, क्रीडा पत्रकार, क्रीडा प्रेमी, नागरिक यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

00000
श्रमिक संघटनांनी वार्षिक अहवाल सादर करण्‍याचे आवाहन
वर्धा, दि. 18 – श्रमिक संघ अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत श्रमिक संघटनांनी अधिनियमाच्‍या  कलमानुसार त्‍यांच्‍या संघटनेचा दिनांक 31 डिसेंबर, 2015 अखेरचा वार्षिक अहवाल नमुना आय’’ दिनांक 30 एप्रिलपर्यंत उपनिबंधक, श्रमिक संघ, नागपूर अपर कामगार आयुक्‍त यांचे कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत क्र. 2, 4 था माळा, ए’’ विंग, सिव्‍हील लाईन, जिल्‍हा परिषद जवळ, नागपूर 440001, यांना सादर करणे बंधनकारक आहे. विहित कालावधीत ज्‍या संघटनांचे वार्षिक विवरणपत्र, उपनिबंधक, श्रमिक संघ, नागपूर यांना प्राप्‍त न झाल्‍यास सदरहू संघटने विरुध्‍द श्रमिक संघ अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्‍यात येईल याचीही संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन उपनिबंधक अ.श. धारकर यांनी केले आहे.
            याबाबत काही अडचण भासल्‍यास संबंधितांनी उपनिबंधक, श्रमिक संघ, द्वारा अपर कामगार आयुक्‍त यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत क्र.2, 4 था माळा, ए’’ विंग, सिव्‍हील लाईन, जिल्‍हा परिषद जवळ, नागपूर 440001 यांच्‍याशी प्रत्‍यक्ष अथवा दूरध्‍वनी क्रमांक 0712- 2980273, 2980275, 2980276 व फॅक्‍स क्र. 2980277 द्वारे संपर्क साधावा, असेही कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment