Tuesday 19 January 2016

गावांच्‍या सर्वांगीण विकासाचे
नेतृत्‍त्‍व  स्‍वीकारा
                                                                             -  आशुतोष सलिल
Ø माहिती अभियान कार्यशाळेचे थाटात उद् घाटन
Ø जिल्‍हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
Ø  उत्‍कृष्‍ट ग्रामपंचायतींच्‍या कार्याचा गौरव
Ø  वर्धा, सेलू तालुक्‍यातील सरपंच, ग्रामसेवकांची उपस्थिती
Ø
वर्धा,दि.19 – गावांचा सर्वांगीन विकास शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांच्‍या माध्‍यमातून होतो. सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांनी या योजनांचा लाभ जनतेला मिळवून देताना आपले गाव आदर्श करण्‍याचा संकल्‍प करा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सरपंच, ग्रामसेवकांना आज केले.
विकास भवन येथे जिल्‍हा माहिती कार्यालयाच्‍यावतीने ‘योजना आपल्‍या द्वारी’ माहिती अभियान कार्यशाळा 2016 च्‍या उद् घाटन कार्यक्रमप्रसंगी  उद् घाटक म्‍हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक शैलेश पांडे यांची उपस्थिती होती. मुख्‍य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यपालन अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्‍य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल म्‍हणाले, शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजना आहेत. माहिती अभियान कार्यशाळेच्‍या माध्‍यमातून अनेक लोककल्‍याणच्‍या योजना लोकांपर्यंत पोहोचण्‍यास मदत होते. विविध ग्रामपंचायती चांगले नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून गावांचा विकास करत आहेत. उमरी मेघे ग्रामपंचायतीने सातत्‍यपूर्णरित्‍या तीन वर्ष 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्‍यात यश मिळविलेले आहे. जिल्‍ह्यात अनेक ठिकाणी जलयुक्‍त शिवार अभियान राबविण्‍यात येत आहे. गावातील सरपंच, ग्रामसेवक गावाचा कायपालट करु शकतात.
जलसंवर्धनही गावाच्‍या विकासात मोलाची भर घालते. या अभियानाच्‍या माध्‍यमातून अनेक योजना सर्वाना माहिती होऊन त्‍यांच्‍या लाभातून विकास शक्‍य होतो. त्‍यामुळे माहिती अभियान जनतेपर्यंत योजना  पोहोचविण्‍याचे मोलाचे सशक्‍त माध्‍यम आहे. जलसंवर्धनाची महती सांगण्‍यासाठी दिनांक 30 जानेवारी रोजी जल परिषदेचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. यासाठी राजस्‍थानचे जलतज्ञ राजेंद्र सिंह, आदर्श ग्राम संकल्‍प प्रकल्‍प समितीचे कार्याध्‍यक्ष पोपटराव पवार जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. या अभियानाचा सर्वांनी लाभ घेऊन समाजाच्‍या शेवटच्‍या घटकापर्यंत शासनाच्‍या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही त्‍यांनी केले.
जेष्‍ठ पत्रकार तथा संपादक शैलेश पांडे म्‍हणाले, राज्‍यात जलयुक्‍त शिवार अभियानाचे अधिक प्रभावी आणि चांगले काम वर्धा आणि नागपूर जिल्‍ह्यात झालेले आहे. चांगले कार्य इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावरच होते. ते येथील प्रशासनाने त्‍यांच्‍या कार्यातील गती आणि दर्जातून दाखवून दिलेले आहे. त्‍याचबरोबर योजना लोकांपर्यंत पोहोचल्‍या; त्‍याची योग्‍यप्रकारे अंमलबजावणी झाली तर त्‍या योजना यशस्‍वी होतात. माहिती अभियान या योजना यशस्‍वी करण्‍याचे, ग्रामीण भागाला सक्षम करण्‍याचे विकासाचे चक्र आहे. या अभियानाच्‍या माध्‍यमातून लोकल्‍याणकारी शासनाच्‍या योजना जनतेपर्यंत पोहचविण्‍याचे कार्य सचोटीने, सातत्‍याने चालत राहावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करुन अभियानाला शुभेच्‍छा दिल्‍या.
जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल आणि मुख्‍य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनीही माहिती अभियान कार्यशाळा, कार्यशाळेचे महत्‍त्‍व याबाबत उपस्थितांना माहिती देऊन या उपक्रमाचे कौतूक केले. तसेच शासनाच्‍या योजना सामान्‍यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी लोकप्रतिनि‍धी, ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्‍याचे आवाहन केले.
जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी प्रास्‍ताविक केले. माहिती व जनसंपर्क विभागाच्‍या जिल्‍हा माहिती कार्यालयामार्फत मागील वर्षापासून राबविण्‍यात येत असलेल्‍या माहिती अभियानाची दखल माहिती व जनसंपर्क विभागाने घेऊन राज्‍यभरात जिल्‍हा माहिती कार्यालयाने हा उपक्रम राबविण्‍याच्‍या सूचना केल्‍या असल्‍याचे सांगून माहिती अभियानाचा उद्देश आणि महत्‍त्‍व विषद केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्‍यवरांच्‍याहस्‍ते दीप प्रज्‍वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनेश काकडे यांनी केले.
उत्‍कृष्‍ट कार्याचा गौरव
जलयुक्‍त शिवार अभियानात उत्‍कृष्‍ट कामगिरी, स्‍पर्धाक्षम कृषी विकास बाजारपेठ उपलब्‍ध करुन देणा-या आंजी मोठी ग्रामपंचायतचे सरपंच  जगदीश संचारिया यांचे, 24 तास गावाला पाणीपुरवठा करणा-या उमरी मेघे ग्रामपंचायतचे सरपंच सचिन खोसे, झडशी ग्रापंचायतचे सरपंच विवेक हळदे, वर्धा
गटविकास अधिकारी वाय. पी. सपकाळे तर जानकीदेवी ग्रामविकास संस्‍थेने संपूर्णतः वर्धा तालुक्‍यात इ-लर्निंग उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल संस्‍थेच्‍या प्रकल्‍प अधिकारी श्रीमती निलिमा बांगरे यांची उत्‍कृष्‍ट कार्य केल्‍याबद्दल मान्‍यवरांच्‍याहस्‍ते स्‍मृतीचिन्‍ह, पुष्‍पगुच्‍छ देऊन गौरव करण्‍यात आला.
000000



No comments:

Post a Comment