Wednesday 20 January 2016

   प्र.प.क्र.  48                                                                  दिनांक - 20 जानेवारी 2016
आर्वीमध्ये आज माहिती अभियान कार्यशाळा
                                ग्रामस्तरावर शासनाच्या योजनांचा प्रसार
        वर्धा, दिनांक 20 – शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट ग्रामस्तरावर पोहचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सरपंच ग्रामसेवकांसाठी माहिती अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. पंचायत समिती कार्यालय, आर्वी येथे उद्या गुरूवार, दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
       ग्रामीण भागात प्रशासनातर्फे सामुहिक वैयक्तिक लाभाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविताना सरपंच ग्रामसेवकांना येणा-या अडचणी, त्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व विभागप्रमुख या कार्यशाळेत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्या महत्त्वांकांक्षी जलयुक्त शिवार या अभियानांतर्गत आपणच करा आपल्या गावाचे जलनियोजन या विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.  ग्रामविकासात माझी भूमिका, नैराश्यातील शेतक-यांना योजनांचा लाभ या विषयावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.   शेतक-यांना सावकारी कर्जातून कर्जमाफी पीककर्ज योजना, शेतक-यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवठा, महिला बालविकास तसेच सामाजिक न्यायाच्या विविध योजनांबाबत महिला विकास आदी विषयांवरही कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहेत.
कार्यशाळेला आर्वी आणि आष्टी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच जिल्हा परिषदेचे तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
0000




प्र..क्र.49                                                                                       दिनांक 20 जानेवारी 2016

                        शेतकरी आत्‍महत्‍यांची 16 प्रकरणे मदतीस पात्र
                                   जिल्‍हास्‍तरीय समितीच्‍या बैठकीत निर्णय
       वर्धा,दि.20- शेतक-यांना नैराश्‍यातून बाहेर काढून त्‍यांच्‍यात आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍याचे आवाहन जिल्‍हास्‍तरीय समितीच्‍या बैठकीत करण्‍यात आले. या बैठकीत एकूण 19 प्रकरणे समोर ठेवण्‍यात आली. त्‍यातील 16 प्रकरणे मदतीसाठी पात्र तर 4 प्रकरणे अपात्र ठरविण्‍यात आली.
              जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणांसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस जिल्‍हा पत्रकार संघाचे अध्‍यक्ष तथा निमंत्रित सदस्‍य अनिल मेघे, शेतकरी प्रतिनिधी नंदकिशोर तोटे, पंचायत समितींचे सभापती, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपवनसंरक्षक दिगांबरराव पगार, केम प्रकल्पाचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.
           शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणांसंदर्भातील प्रकरणे अत्‍यंत संवेदनशीलपणे  हाताळावेत. फेरचौकशीच्‍या  प्रकरणांमध्‍येही  महसुल, पोलिस तसेच कृषी विभागाच्‍या अधिका-यांनी वस्‍तूस्थिती समितीकडे त्‍वरीत सादर करावीत. नैराश्‍यामुळे आत्‍महत्‍या केलेल्‍या कुटुंबांना त्‍वरीत मदत मिळावी यासाठी अशी प्रकरणे प्राधान्‍याने पाठवावीत,असेही बैठकीत निर्णय घेण्‍यात आला.


                                 
           वाहतूक नियमांबाबत जिल्ह्यात जनजागृतीपर उपक्रम
Ø रस्‍ता सुरक्षा अभियानांतर्गत 125 वाहनचालकांची नेत्रतपासणी
       वर्धा,दि.20  -  रस्‍ता सुरक्षा अभियान 2016 अतंर्गत उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 10 ते 24 या कालावधीत रस्‍ता सुरक्षा अभियान राबविण्‍यात येत आहे. या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात आलेले आहेत. या अभियानांतर्गत नेत्र 
          दिनांक 14 जानेवारी रोजी सेवाग्राम येथील कस्‍तुरबा हेल्‍थ सोसायटीच्या  सहकार्याने वाहन चालकांचे नेत्र तपासणी शिबिर घेण्‍यात आले.  शिबिरामध्‍ये डॉ. धाबर्डे, डॉ. अनशुल सिंग, डॉ. सजनसिंग, श्री. करडेकर, सचिन ताकसांडे यांनी सहभाग घेऊन 125 वाहन चालकांची नेत्र तपासणी केली. त्‍यापैकी चार वाहन चालकांना प्रथम अवस्‍थेत मोतीबिंदू असल्‍याचे निदर्शनास आणून त्‍यांना योग्‍य ते मागदर्शन करण्‍यात आले. तसेच 8 वाहन चालकांना वाहन चालविताना चष्‍मा वापरणे आवश्‍यक असल्‍याचे सूचविले. या कार्याक्रमाला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार,  सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी.बी झाडे,  पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे आदींची उपस्थिती होती.
शाळांमध्‍ये जनजागृती
निळकंठ मुरार विद्यालयात रस्‍ता सुरक्षा विषयी नियमांची माहिती देण्‍याक‍रीता विद्यार्थ्‍यांचा जनजागृती मेळावा आयोजित करण्‍यात आला. मेळाव्‍यामध्‍ये वाहतुकीच्‍या नियमांचे पालन केल्‍यास रस्‍त्‍यावर होणारे अपघात निश्चितपणे कमी होईल. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी मेळाव्‍यामध्‍ये मार्गदर्शन केले. मेळाव्‍यात सुमारे 500 विद्यार्थांचा सहभाग होता. सोबतच चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आलेले होते. शाळेच्‍या आवारातील सर्व विद्यार्थ्‍यांच्‍या सायकलींना रेड रिफ्लेक्‍टर टेप लावण्‍यात आले. मेळाव्‍याला शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक वृंद शाळेचे मुख्‍यध्‍यापक श्री. सातपुते यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. मेळाव्‍यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी.बी झाडे, मोटार वाहन निरीक्षक  जी.डी. चव्‍हाण उपस्थित होते.

वर्धा शहरात पथनाटय
कारंजा (घा.) निर्मल उज्ज्वल बहुउद्देशीय शिक्षण व सामाजिक संस्‍था यांच्‍या सहकार्याने शहरातील मोक्‍याच्‍या चौकामध्‍ये मद्यपान करुन वाहन चालविणे. वाहन चालविताना मोबाईलवर संवाद साधने, वाहतुकीचे नियम व पाळता वाहन चालविणे याचे वाहन चालकावर तसेच त्‍याच्‍या कुटुंबांवर अपघातामुळे काय परिणाम होतात याबाबतचे पथनाट्याद्वारे चौका-चौकात जनजागृती करण्‍यात आली.
मद्यपान करुन वाहन चालविणे, मोबार्इलवर संवाद साधने, वाहतुकीचे नियम न पाळणे, या विषयावर हेमंत कालभूत, अश्विनी जुमडे व त्‍यांचा चमू यांनी वर्धा शहरात बजाज चौक, बस स्‍टँन्‍ड, रेल्‍वे स्‍टेशन, आर्वी नाका, इतवारा चौक इत्‍यादी ठिकाणी चौक सभा घेऊन पथनाट्य पाहण्‍यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होती. मोटार वाहन निरीक्षक ए.टी मेश्राम, सहायक मोटार वाहन निरीक्षक जी.डी चव्‍हाण व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. 
प्रथमोपचाराविषयी माहिती
जिल्‍ह्यातील ऑटोरिक्षा संघटना, स्‍कूल बस संघटना यांच्‍या प्रतिनिधींना तसेच वाहतूक पोलिस कर्मचा-यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या ‘अपघातग्रस्‍त व्‍यक्‍तींचा वाचवणे सर्वात प्राथम्‍याचे आहे. त्‍यासाठी वैघकीय व्‍यावसायिक यांचेबरोबर वाहतूक पोलिस आणि सामान्‍य नागरिक यांनी अपघाताची घटना निदर्शनास येताच प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे’ या आदेशाचा प्रसार व प्रचार करण्‍याकरीता अपघातग्रस्‍तांना तातडीची मदत करण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून वाहतूक पोलिसांना, ऑटोरिक्षा संघटनांना, स्‍कुल बस संघटना यांच्‍या प्रतिनिधींना प्रथमोपचाराविषयी जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाचे डॉ. श्रीकांत इंदुलकर यांनी मार्गदर्शन केले. अपघाताची घटना निदर्शनास येताच अपघातग्रस्‍तांना पहिल्‍याच तासामध्‍ये वैद्यकीय प्रथमोपचाराबाबत महत्त्वाच्‍या सूचना दिल्‍या. अपघात झाल्‍यानंतर ‘पहिला तास’ (Golden Hour) याबाबतचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाला विनोद जिचकार उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. बी. झाडे, पोलिस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
00000




प्र.प.क्र.51                                           दिनांक- 20 जानेवारी 2016                              
                                  सोमवारी राष्‍ट्रीय मतदार दिवस
      वर्धा,दि.20 – भारत निवडणूक आयोग व मुख्‍य निवडणूक अधिकारी  यांनी दिनांक 25 जानेवारी  रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवस म्‍हणून साजरा करण्‍याचे निर्देश दिलेले आहेत. दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता वर्धा येथे विकास भवनमध्ये जिल्‍हाधिकारी यांच्या अध्‍यक्षतेखाली राष्‍ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
दिनांक 1 जानेवारी 2016 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव्‍याने मतदार नोंदणी झालेल्‍या मतदारांना त्‍यांचे छायाचित्रे ओळखपत्र व जिल्‍हा वाटप करण्‍यात येणार असल्याचेही  उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
प्र.प.क्र.52               वर्धा जिल्‍ह्यात कलम 37 (1) 3 जारी
      वर्धा,दि. 20 - जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) 3 जारी केले आहे. या कलमाचा अंमल दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल,असेही आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.
                                             000000








No comments:

Post a Comment