Monday 18 January 2016

प्र.प.क्र. 42                                                                                               दिनांक-18 जानेवारी 2016
महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून
संरक्षणासाठी तत्काळ समिती गठीत करा
   . एन. त्रिपाठी
         वर्धा, दिनांक 18 – महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असावे, तसेच लैंगिक छळापासून संरक्षणासाठी महिला कार्यरत असलेल्या सर्वच ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती गठित करा, अशा सूचना महिला बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव तथा राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव .एन. त्रिपाठी यांनी आज येथे दिल्यात.
           शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांच्या प्रमुखांची बैठक . एन. त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा कुरसंगे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा पोलिस उपअधीक्षक आर.जी किल्लेकर, श्रीमती सुनिता शेंडे, श्रीमती संगीता धनाढ्य, श्रीमती सारिका डेहणकर, श्रीमती अलका गुगुल आदी महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
             जिल्हास्तरावर महिलांच्या लैगिंक अत्याचारासंबंधी समिती गठित झाली असली तरी शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये अशा समित्या गठीत झाल्या नाहीत. खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांसाठी अशा समित्या तत्काळ गठित करण्याच्या सूचना करताना बाल हक्क महिला आयोगाचे सचिव  त्रिपाठी म्हणाले, की पॉक्सो कायद्यांतर्गत बालकांसंदर्भातील गुन्ह्यांसंदर्भात तत्काळ चोविस तासात एफआयर दाखल होणे आवश्यक असून मनौधैर्य योजनेंतर्गत योजनांचा लाभ देण्यासाठी पोलिस गुन्हा नोंदीसंदर्भाची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांना देण्यात यावी.
                महिलांचे लैंगिक छळांपासून अधिनियमांतर्गत महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व आस्थापनांनी पुढाकार घेऊन कायद्याच्या तरतुदीचे पालन करणे बंधनकारक आहे. ज्याठिकाणी या तरतुदीचे पालन होणार नाही, अशा आस्थापनाविरूद्ध 50 हजार रूपयांपर्यंत दंडात्मक कार्यवाही करण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना देताना श्री त्रिपाठी म्हणाले, विभागामार्फत समिती गठित होणार नाही, यासंदर्भात प्राप्त होणा-या तक्रारी समिती समोर ठेऊन यासंदर्भात जिल्हा महिला बालविकास अधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शाह यांच्याकडे अहवाल पाठवावा.     प्रारंभी जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा कुरसुंगे यांनी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमांतर्गत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल बैठकीत सांगितला.  

00000

माहिती अभियान कार्यशाळेचा आज शुभारंभ
                  ग्रामस्तरावर शासनाच्या योजनांचा प्रसार
        वर्धा, दिनांक 18 – शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट ग्रामस्तरावर पोहचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सरपंच व ग्रामसेवकांसाठी माहिती अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन उद्या मंगळवार, दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता विकास भवन येथे होणार आहे.
      जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा हे या कार्यशाळेत प्रामुख्याने उपस्थित राहून सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्तरावरील लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यशाळेस ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
      ग्रामीण भागात प्रशासनातर्फे सामुहिक व वैयक्तिक लाभाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविताना सरपंच व ग्रामसेवकांना येणा-या अडचणी, त्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व विभागप्रमुख या कार्यशाळेत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्या महत्त्वांकांक्षी जलयुक्त शिवार या अभियानांतर्गत आपणच करा आपल्या गावाचे जलनियोजन या विषयावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, एस.एस. खळीकर, वरीष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन  हे मार्गदर्शन करणार आहेत.
       ग्रामविकासात माझी भूमिका या विषयावर अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी एस. एस. मेसरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू. नैराश्यातील शेतक-यांना योजनांचा या विषयावर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सतीश नेमाडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. देशपांडे, आत्माचे दीपक पटेल, केम प्रकल्पाचे निलेश वावरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
         शेतक-यांना सावकारी कर्जातून कर्जमाफी पीककर्ज योजना, शेतक-यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवठा, महिला व बालविकास तसेच सामाजिक न्यायाच्या विविध योजनांबाबत महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसंगे, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, अग्रणी बँकेचे विजय जांगडा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेला वर्धा आणि सेलू तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच जिल्हा परिषदेचे तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
0000

प्र.प्र.क्र.43                                                            दिनांक-  18 जानेवारी 2016
राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य
योजनेअंतर्गत आज आरोग्‍य शिबिर
        वर्धा,दि.18- राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजनेंर्गत दिनांक 19 जानेवारी शिबिरामध्‍ये -हयरोग श्‍वसनरोग, बालरोग, स्‍त्रीरोग, अस्थिव्‍यंग, किडनी, पोटाचे आजार, मधुमेह व रक्‍तदाब या आजारावर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा, कस्‍तूरबा हॉस्पिटल, सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्‍णालय, सावंगी (मेघे) येथील तज्ञ चमूद्वारे मोफत तपासणी व उपचार करण्‍यात येणार आहेत.
            मंगळवार, दिनांक 19 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत देवळी येथील ग्रामीण रुग्‍णालय येथे आयोजि‍त करण्‍यात आले आहे. या शिबिराचा गरजूंनी जास्‍तीत जास्‍त लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलि‍ल, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पी. डी. मडावी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण यांनी केली आहे.
0000000000000
प्र.प्र.क्र.44                                                            दिनांक-  18 जानेवारी 2016
नवोदय विद्यालयात आता नववी साठीही प्रवेश
 वर्धा,दि.18- जवाहर नवोदय विद्यालय, सेलू काटे, येथे वर्ग 9 वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. एकूण 04 जागा असून त्‍या सर्वसामान्‍य 02 जागा, अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 01 (03 मुलांसाठी 01 मुलीसाठी) राखीव आहे. जागा भरण्‍यासाठीची परीक्षा 24 एप्रिल 2016 रोजी होणार आहे. आवेदन पत्र भरण्‍याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी आहे. आवेदन पत्र शिक्षणाधिकारी कार्यालय, वर्धा, तसेच प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, सेलू काटे, वर्धा यांचेकडे उपलब्‍ध आहे. परीक्षेचे माध्‍यम इंग्रजी व हिंदी  आहे. तसेच आवेदन पत्र व माहिती पत्रक वेबसाईट www.navodaya.nic. परीक्षेचे स्‍थळ जवाहर नवोदय विद्यालय, सेलू काटे, वर्धा हे आहे.
उपलब्‍ध जागा एकुन 04 आहेत. त्‍यामध्‍ये सर्वसामान्‍य 02 जागा, अनुसूचित जाती 01 अनुसूचित जमाती 1, (3 मुलासाठी 01 मुलीसाठी) यांचा समावेश आहे. या संधीचा फायदा सर्व होतकरु विद्यार्थिनींनी घ्‍यावा, असे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय यांनी कळविले आहे.
0000000000000000000

प्र.प्र.क्र.39                                                             दिनांक-  18 जानेवारी 2016
                               राष्‍ट्रीय युवा दिन युवा सप्‍ताहाचे उद् घाटन
        वर्धा,दि.18- जिल्‍हा क्रीडा परिषद व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वर्धा यांच्‍यावतीने स्‍वामी विवेकानंद यांच्‍या जन्‍म दिनाचे औचित्‍य साधून दिनांक 12 जानेवारी रोजी राष्‍ट्रीय युवा दिन सप्‍ताहाचे उद् घाटन यशंवत महाविद्यालय वर्धा येथे करण्‍यात आले.
           कार्यक्रमाचे अध्‍यक्ष क्रीडा विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, तर प्रमुख पा‍हुने म्‍हणून सारंग रघाटाटे ,यशंवत महाविद्यालया चे प्राध्‍यापक श्री. मेंढे,. श्री. जाधव,प्रा. श्री. डुकरे,क्रीडा विभाग प्रमुख भालेवार उपस्थित होते
           जिल्‍हा युवा पुरस्‍कारार्थी सारंग रघाटाटे यांनी प्रश्‍नोत्‍तराच्‍या माध्‍यमातून युवक-युवतींशी संवाद साधला व जीवनात आपण केलेल्‍या चांगल्‍या कार्याचा संग्रह, माहिती तसेच फोटोच्‍या स्‍वरुपात संग्रह करुन ठेवल्‍यास त्‍याचा व्‍यक्‍तीगत जीवनात कसा लाभ होतो याविषयी युवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास युवक-युवतींनी मोठ्या संख्‍येने सहभाग नोंदविले.
          सुभाष रेवतकर यांनी प्रास्‍ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी चारुदत्‍त ना‍कट यांनी केले.यावेळी कार्यक्रमास क्रीडा अधिकारी श्रीमती चैताली राऊत, क्रीडा अधिकारी घनश्‍याम वरारकर, व्‍यवस्‍थापक रवी काकडे  व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व यशंवत महाविद्यालयाचे सर्व प्राध्‍यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्‍वी आयोजनाकरीता यशंवत महाविद्यालयाचे प्राचार्य मून यांचे विशेष सहकार्य लाभले.
                                                                    0000 
प्र.प.क्र. 37                                                                   दिनांक-18 जानेवारी 2016
विविधामध्ये आधार कार्ड काढण्याची सुविधा
         वर्धा,दिनांक 18 – आधार कार्ड अद्याप काढलेल्या नागरिकांसाठी विविधा केंद्रामध्ये नि:शुल्क नवीन आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विविधा केंद्रामध्ये सकाळी 11 ते 5 यावेळेत आधार कार्ड नसलेल्या सर्व नागरिकांना आपले आधार कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
आधार कार्ड नोंदणीमध्ये वर्धा जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य झाले असून केवळ 80 ते 85 हजार नागरिकांचे अद्याप आधार कार्ड नोंदणी झालेली नाही. त्यामुळे विविधा केंद्रामध्ये नवीन आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आधार कार्ड नोंदणी सोबतच आधार कार्डमधील नावासह इतर माहितीमध्ये दुरूस्ती करावयाची असल्यास नागरिकांना विविधा केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आधार कार्ड नोंदणी संदर्भात आधार कार्ड पर्यवेक्षक मंगेश देशमुख (मो. नं 99214 36429) यांचेशी संपर्क साधता येईल.
 प्र.प.क्र. 41                                                                   दिनांक-18 जानेवारी 2016
जलयुक्त शिवारमध्ये माथा ते पायथा पद्धतीने गावांची निवड
आशुतोष सलिल
Ø लोकप्रतिनिधींच्या संमतीने 974 गावांची  निवड
                 वर्धा, दिनांक 18 -  जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीटंचाई निर्माण होणार नाही तसेच भूगर्भातील जलसाठ्यात वाढ होऊन शेतीलाही शाश्वत सिंचनाचा लाभ होण्याच्या दृष्टीने गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी माथा ते पायथा या प्रणालीद्वारे कामांची  निवड करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी आज दिल्यात.
                   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती उपस्थित होते.       
               जलयुक्त शिवार अभियानामुळे मागील वर्षी जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम झाल्यामुळे आवश्यकतेनुसार शेतीलाही पाणी उपलब्ध होऊ शकले. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत पाहणी करण्यात येत असून यावर्षी हा कार्यक्रम राबविताना ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत अशा गावांमध्ये कामे घेणे शक्य आहे, त्यानुसारच तालुकास्तरावर नियुक्त केलेल्या समितीमार्फत गावची  निवड करावी. गावे निवडताना शिवार फेरी तसेच ग्रामसभेमध्ये गावाच्या निवडीमध्ये केलेल्या पद्धतीची माहिती देण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आलेजिल्ह्यात आर्वी, आष्टी, कारंजा तसेच समूद्रपूर आदी भागात पाणी टंचाई असलेल्या गावांची निवड करण्यासंदर्भात सवेक्षण करण्यात येऊन जिल्हास्तरावर निवडण्यात आलेल्या गावांना अंतिम मान्यता देण्यात येईल.
        जलयुक्त शिवार अभियानामध्ये गावे निवडताना त्या गावातील पाण्याचे नियोजन पाण्याचा ताळेबंद तसेच इतर गावांनाही केलेल्या कामांबद्दल आदर्श निर्माण होईल, यादृष्टीनेच तालुका कृषी अधिकारी यांनी लोकप्रतिनिधींच्या मान्यतेने निवड प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिल्यात.
       जलयुक्त शिवार अभियानामध्ये नाला खोलीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असल्यामुळे ही कामे घेताना नाला खोलीकरणानंतर नाल्यातील काढलेली माती परत नाल्यात वाहून जाणार नाही, याची खबरदारी घेताना या परिसरात असलेल्या विहिरींची संख्याही लक्षात घ्यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या अमलबजावणीसंदर्भात यावेळी माहिती  दिली.
0000
प्र..क्र. 40                                                                                             दिनांक – 18  जानेवारी 2016
शासकीय अधिकारी, कर्मचा-याना अशंदान निवृती वेतन
वर्धा,दि.18- अंशदान निवृत्तीवेतन ज्या कर्मचा-यांना लागू  आहे आणि ईतर विभागात सेवा वर्ग आहेत अशा सर्व अधिकारी कर्मचा-यांनी डीसीपीएस योजनेसाठी कोषागार कार्यालयात संपर्क साधवा असे आवाहन वरिष्  कोषागार अधिकारी शरद पराते यांनी केले आहे.
            अधिकारी,कर्मचारी यांचे सेवार्थ्मधून वेतन प्रदान होत नाही पण ते शासकीय अधिकारी,कर्मचारी आहे. दिनांक  6 एप्रिल च्या शासन निर्णयाअन्वये ज्यांना  PRAN  क्रः प्राप् झालेला आहे. त्यांचे अंशदायी निवृत्तीवेतन योजनाची नियोक्त्याची कर्मचा-याची (अंशदान) रक्कम प्रथम कोषागार अधिका-या वर्धा खात्यात जमा करावयाची आहे.
           परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेमध्ये अधिकारी,कर्मच-यांची  यांना वार्षिक विविरणपत्र  (R3) सन 2013-14 पर्यंत सर्व कार्यालयांना  वाटप करण्यात आले आहे. ज्या वार्षिक विवरण पत्रामध्ये मिसिंग क्रेडिट असतील त्यांनी कोषागाराकडे विहित नमुन्यात माहिती सादर करावी तसेच 31 मार्च पूर्वी नियुक्ती झालेल्या कर्मचा-यांचे फॉर्म (S1) दिनांक 21 जानेवारी पूर्वी कोषागारात सादर करावे,असे कोषागार अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
                                                    00000  










No comments:

Post a Comment