Thursday 25 October 2012

सार्वजनीक वितरण व्‍यवस्‍था प्रणालीचे संगणकीकरण - अनिल देशमुख



                      सार्वजनीक वितरण व्‍यवस्‍थेचा आढावा

        वर्धा, दिनांक 25 –सार्वजनीक वितरण प्रणाली अधिक  गतीमान करण्‍यासाठी  तसेच शिधापत्रीकेवरील धान्‍य  शिधापत्रीका धारकांनाच वितरीत करण्‍याच्‍या दृष्‍टीने  वर्धा जिल्‍ह्यासाठी  शिधापत्रीका संगणकीरकरण  प्रकल्‍प नाविन्‍यपूर्ण योजने अंतर्गत राबविण्‍यात आला असून, शिधापत्रीका नोंदणीचे  काम पूर्ण झाले असल्‍याची माहिती अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी  आज दिली.
            शासकीय  विश्रामगृहाच्‍या सभागृहात  जिल्‍ह्यातील सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था प्रणालीचा आढावा अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी घेतला. त्‍याप्रसंगी  ते बोलत होते. आमदार सुरेश देशमुख, जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री  भोज  आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
         शिधापत्रीका  संगणकीकरण  प्रणाली अंतर्गत आज्ञावलीत शिधापत्रीका नोंदणीचे काम पूर्ण  झाले असून, सुमारे  2 लक्ष 59 हजार 298 प्रपत्रांचे नोंदणी झाली आहे. शिधापत्रींकावर गॅस असल्‍याबाबतचे  75 हजार 784 नोंदणीचे काम पूर्ण झाले असून,  ही संपूर्ण माहिती संगणकीकृत करण्‍यात आली असल्‍याची माहिती  यावेळी  अनिल देशमुख यांनी दिली.  
            शिधापत्रीकेतील कुटूंब प्रमुखासह सर्व व्‍यक्‍तींच्‍या  नावाखाली आधारकार्ड क्रमांक व गॅस जोडणी क्रमांक त्‍यासोबतच बँक खाते क्रमांक नोंदविण्‍यात येत असल्‍यामुळे  सर्व नागरिकांनी  आधारकार्ड व बँके खाते बँकेत आपले खाते उघडून   त्‍याची माहिती  सार्वजनिक वितरण प्रणालीच्‍या  संगणकीकरणासाठी तसेच केरोसीनसह इतर लाभ मिळविण्‍यासाठी तात्‍काळ संबंधीत  तहसिलदारांकडे  तात्‍काळ जमा करावी असे आवाहनही   अन्‍न व नागरी पुरवठा  मंत्री अनिल देशमुख यांनी केले.
             जिवनावश्‍यक वस्‍तु कायद्या अंतर्गत जिल्‍ह्यात  विशेष मोहीम राबविण्‍यात आली असून, मागील वर्षी  71 प्रकरणांची  जिल्‍ह्यात नोंद झाली आहे त्‍यापैकी  90 व्‍यक्‍तींना अटक करण्‍यात आली असून 70 गुन्‍ह्याची  नोंद आली असल्‍याची माहिती यावेळी दिली.
केरोसीन, एलपीजी प्रकरणातही  11 धाडी टाकण्‍यात आल्‍या असून, सर्वांविरुध्‍द गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहे. या प्रकरणांमध्‍ये 16 व्‍यक्‍तींना अटक करण्‍यात आली आहे.
            केरोसीन वाटपातील अनियमितता व  जनतेच्‍या  तक्रारीवरुन जानेवारी पासून ऑगस्‍ट पर्यंत 821  दुकानांची तपासणी करण्‍यात आली असून, यामध्‍ये 5  घाऊक , 4 अर्धघाऊक व 461 किरकोळ व हॉकर्स परवानाधारक दोषी आढळण्‍यात आले असून, सुमारे  1 लक्ष 12 हजार 500 रुपये दंडाची रक्‍कम  वसुल करण्‍यात आली आहे. तसेच 12 परवाने निलंबीत करण्‍यात आले असल्‍याची माहितीही त्‍यांनी यावेळी दिली.
            यावेळी  धान्‍य हमी योजना,अन्‍नपुर्णा, अंत्‍यांदय,बिपीएल,एपीएल आदी योजनांचा आढावा  यावेळी त्‍यांनी घेतला.
            प्रारंभी जिल्‍हा पुरवठा अधिकारी आर.ए.अनभोरे यांनी प्रास्‍ताविकात जिल्‍ह्यातील वितरण व्‍यवस्‍थेची  माहिती  दिली.
                                                            00000000


No comments:

Post a Comment