Wednesday 25 January 2012

वर्धा जिल्हा कुपोषणमुक्त ग्राम अभियान..


      ज्या महात्म्याने वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमातून जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा जयंती दिनी महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभिनाचा शुभारंभ केला बालकदिनाचे औचित्य साधून हे अभियान दिनांक 14 नोव्हेंबर 2011 (बालकदिन) पासून प्रत्यक्ष कार्यान्विय करण्यात आले असून, ते दिनांक 7 एप्रिल 2012 (आरोग्य दिन) पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यांत येणार आहे. राज्यातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालके सुदृढ व्हावीत असा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याचा कालावधीत वर्धा जिलह्यात संबंधित सर्व विभागाच्या समन्वयातून लोक सहभागाव्दारे उपक्रम राबविण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आलेला आहे. अशी माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
      वर्धा जिलहा कुपोषण मुक्त करण्याची ग्राम चळवळ उभी करुन कुपोषणचा जटील प्रश्न सोडविणे काळाची गरज आहे. आजही बालकांमध्ये कुपोषण ही समस्या पूर्णपणे संपलेली नाही. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून कालबध्द व नियोजन पूर्वक अभियान स्वरुपात राबविल्यास जिल्हा कुपोषण मुक्त होवु शकतो. तेव्‍हा ह्या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे व जिल्ह्याला कुपोषण मुक्‍त करण्‍यासही सहकार्य करावे.
     सन 2005-2006 या वर्षात राष्‍ट्रीय कुटुंब व आरोग्‍य सर्व्‍हेक्षणानुसार (NFHS-3) महाराष्‍ट्रात कमी वजनाच्‍या बालाकचे प्रमाण 40 टक्‍के होते. बालकाचे वजन त्‍यांच्‍या लांबी व उंचीच्‍या प्रमाणात मर्यादेपेक्षा कमी असते. अशा गंभीर तीव्र कुपोषित सॅम बालकांना साधारण बालकाच्‍या तुलनेत मृत्‍यूचा धोका 10 पटीने जास्‍त असतो. म्‍हणून अशा बालकांना विशेष आरोग्‍य व आहार सेवा प्राधान्‍यक्रमाने देऊन बाल मृत्‍यूदर कमी करता येतो.
    जिल्‍ह्यातील आरोग्‍य विभाग व एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्‍प  योजने अंतर्गत 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती स्‍त्रीया, स्‍तनदामाता आणि किशोरवयीन मुलीच्‍या आरोग्‍य व पोषणाचे काळजी घेतली जाते. कुपोषण म्‍हणजे केवळ सकस अन्‍न न मिळाल्‍याने होणारी मुलांची आबाळ नव्‍हे तर सकस अन्‍नाची अनुपलब्‍धता हे अनेकातले एक कारण आहे. सर्व अन्‍न घटक योग्‍य प्रमाणात, योग्‍य प्रकारे आणि योग्‍य वेळी न मिळणे म्‍हणजे कुपोषण आहे.कुपोषणाची कारणे – कुपोषण होण्‍याचे मुख्‍यतः चार कारणे आहेत. कमी वजनाची मुले जन्‍माला येणे, बाळ आहार व संगोपनाच्‍या देण्‍याच्‍या चुकीच्‍या पध्‍दती, अतिसार आणि पाण्‍याने होणारे अन्‍य आजार व न्‍युमोनिया.त्‍याशिवाय कुपोषणास अन्‍यही दर्शविलेल्‍या  सहा बाबी कारणीभूत आहे. लोहाची कमतरता, आयेाडिनची कमतरता, जीवनसत्‍व अ ची कमतरता, सर्व लसिकरण न होणे, झिंकची कमतरता व मुलांना जंत होणे.
     कुपोषणावर उपाय योजना – किशोरवयीन मुली व लग्‍न न झालेल्‍या महिला, गरोदर महिला यांचे BMI-Body mass Index  वाढविणे म्‍हणजेचे त्‍यांचे वजन उंचीच्‍या मानाने योग्‍य ठरणे. महिलांचा BMI- 18.5 पेक्षा कमी असू नये. Hb   11 ग्रॅमपेक्षा कमी असेल (रक्‍तक्षय) त्‍यांनी दररोज 2 याप्रमाणे सतत 100 दिवस लोहयुक्‍त (रक्‍तवर्धक) गोळ्या द्याव्‍यात. गरोदर स्त्रिया व किशोरवयीन मुलींना एक जेवन अतिरीक्‍त देणे.
  तसेच अन्‍यत्र बाबीसाठी खालील दर्शविलेली दशपदी पाळणे जरुरी आहे.मातेचे चिकाचे दुध जन्‍मानंतर एक तासाने पाजावे. जन्‍मा सहा महिनेपर्यंत फक्‍त आईचे दुध पाजणे. सहा महिने झाल्‍यावर आईच्‍या दुधासह पुरक आहार सुरु करणे. पोषण आहारामध्‍ये सर्व मुख्‍य आणि सुक्ष्‍म तत्‍वे उपलब्‍ध करणे, पोषण आहाराची वारंवारीता   6 ते 8 वेळा ठेवणे. रक्‍तातील लोहाचे प्रमाण वाढविण्‍यासाठी गोळी किंवा पिंकल देणे. मुले 9 महिने पुर्ण झाल्‍यावर जीवनसत्‍वे अ दर सहा महिण्‍यांनी देणे. आयोडिनयुक्‍त मिठाचे सेवन करणे. सर्व लसिकरण. मलमुत्राची योग्‍य विल्‍हेवाट लावणे. 24 महिने वर्यापर्यंत बाळाला उकळून थंड केलेलंच पाणी देणे. एक वर्षापासून पुढे दर सहा महिण्‍याने जंत नाशक औषण देणे. बाळाला औषध-पाणी देण्‍यापूर्वी हात साबून व पाण्‍याने स्‍वच्‍छ धुणे.
कुपोषण संपविण्‍यासाठीचा हा पहिला टप्‍पा आहे. मुलासाठी वरील दशपदी पाळलयाने ते मुल कमी वजनाचे किंवा कुपोषित होणार नाही.
बाळाचे आदर्श वजन खालील दर्शविलेल्‍या  तक्‍त्‍याप्रमाणे असावे.
वय
जन्‍मतः
0 ते 1
1 ते 2
2 ते 3
3 ते 4
4 ते 5
5 ते 6
आदर्श वजन
3 कि.ग्रॅ.
9 कि.ग्रॅ.
12कि.ग्रॅ.
15कि.ग्रॅ.
17 कि.ग्रॅ.
19 कि.ग्रॅ.
20कि.ग्रॅ.
  कुपोषण निर्मुलनासाठी जिल्‍ह्यातील आरोग्‍य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाडी मार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्‍न सुरु केलेले आहेत.आजचा बालक उद्याचा देशाचा नागरिक आहे. तेव्‍हा तो सुदृढ व निरोगी असणे जरुरी आहे.
    कुपोषणाची मोठी समस्‍या  कमी शिक्षित आणि आर्थिकदृष्‍ट्या मागासलेल्‍या  समाजामध्‍ये अधिक आहे. तेव्‍हा या अभियानाच्‍या यशस्‍वीतेकरिता प्रशासना सोबतच समाजाने लोक सहभागीतेच्‍या दृष्‍टीने कार्य केल्‍यास किमान जिल्‍ह्यातील कुपोषणाची समस्‍या  सोडविणे सहज शक्‍य होईल. या अभियानाच्‍या माध्‍यमातून बालआर, आरोग्‍य आणि संगोपनाच्‍या  संदर्भाने मातांचे, कुटुंबाचे व समाजाचे सक्षमीकरण होईल अशी आशा करु या ..!
                                                              0000000

No comments:

Post a Comment