Wednesday 25 January 2012

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागोन टाकलेल्‍या धाड्यात 48 हजाराचा माल जप्‍त


      वर्धा, दि.24- येथील राज्‍य उत्‍पादन शुल्‍क  विभागाने नुकत्‍याच (दि.22ते 23 जानेवारी 2012) या कालावधीत बोरगाव सावळी व बाभुळंगाव (बाळापूर) येथे टाकलेल्‍या धाडीत 48 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे.
     मुंबई दारुबंदी कायद्या अंतर्गत झाडगाव शिवार  येथे चालू हातभट्टी दारु निर्मिती करीत असताना धाड टाकून भाऊराव शालीक टेकाम रा. बोरगांव सावळी तसेच बाभुळगांव बाबापूर शिवारात केशव तुकारामजी निकर व सागर शामरावजी चाहांदे यांचेकडून मध्‍यप्रदेश निर्मित विदेशी दारुच्‍या 136 बॉटल जप्‍त  करुन त्‍यांचेवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला तसेच शिवारात रविंद्र शांतराम वादाफळे यांच्‍या कडून 35 लिटर गावठी दारु जप्‍ती करुन गुन्‍हा नोंदविण्‍यात आला.
    या धाडीचे कार्यवाही राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे निरिक्षक के.जी. आकरे तसेच कर्मचारी डि.डि. बल्‍के, एम.डी.पाटील, एस.बी. लांबाडे, एच.एस.सुरजुसे, जी.एस.बावणे व आर.एस.म्‍हैसकर यांनी केली असे राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, वर्धा कळवितात.
                           000000

No comments:

Post a Comment