Friday 21 May 2021

 

..क्र-365                                                                      दि.21.05.2021

        1 एप्रिल नंतर कोविड आजारातुन बरे झालेल्या रुग्णांचे

              म्युकरमायकोसिस’ आजाराबाबत सर्वेक्षण करा

                                                -विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार

म्युकरमायकोसिस आजारा बाबत टॉस्कफोर्स समिती स्थापन करा

वर्धा दि 21, (जिमाका):- म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य  आजाराचे रुग्ण  नागपूर विभागात आढळत असून  हा आजार कोविड झालेल्या व मधुमेह असलेल्या रुग्णांना होत असल्याचे आढळून आले आहे. हा आजार चेहरा, नाक, डोळयांचा भाग व  मेंदूवर परिणाम करणारा आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकारी यांनी  जिल्हा स्तरावर नाक,कान,घसा, नेत्र व दंत तज्ञ, न्युरो चिकित्सक आदी तज्ञ असलेल्या डॉक्टरांचा समावेश असल्याची टॉस्क फोर्स समिती गठीत करावी. समिती मार्फत  1 एप्रिल नंतर कोविड आजारातुन बरे होऊन सुटी मिळालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराबाबत समुपदेशन करावे असे सूचना नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त  डॉ.संजय कुमार यांनी आज  व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे घेतलेल्या बैठकित सर्व जिल्हाधिका-यांना दिल्यात.

बैठकिला वर्धा येथून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्यकार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे उपस्थित होते. सभेमध्ये कोविड बाधित असलेले अनाथ बालके त्यांची घ्यावयाची काळजी,  आपत्ती व्यवस्थापन निधी, रेतीघाट व गौण खनिज घाट परवाणगी याबाबती चर्चा करण्यात आली.

म्युकरमायकोसिस आजार प्रामुख्याने मधुमेह,रक्तदाब असलेल्या व कोरोनाच्या गंभीर आजारातुन मुक्त झालेल्या व्यक्तींना होत असल्याचे तज्ञाच्या निर्दर्शनास आले आहे. या आजारावर नियंत्रण आणण्याकरीता  जिल्हयातील रुग्णालयातून कोविड आजारातून मुक्त होऊन सुटी झालेल्या रुग्णांच्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी संपर्कात राहून  त्यांना म्युकरमायकोसिस आजाराचे लक्षणे आहे. काय? याबाबत वेळोवेळी  विचारणा करावी यामध्ये नाकातून काळया खपल्या पडणे,  नाक कोरडे होणे,  रक्तमिश्रिीत सर्दी,  गालावरील सवेंदना बदलणे, चेह-यावर सूज येणे,  डोळे लाल पडणे, नजर कमजोर होणे, दात दुखणे व कमजोर होणे अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ  टाक्सफोर्स समितीच्या माध्यमातुन  तपासणी करुन  पुढील उपचाराकरीता  रुग्णालयात दाखल करुन घ्यावे आवश्यकता पडल्यास शस्त्रक्रिया करावी अशा सूचना संजय कमुार यांनी आज दिल्यात.

तसेच म्युकरमायकोसिस आजाराबाबत प्रसारमध्यमे व सोशल मिडिया तर माध्यमांचा वापर करुन जनजागृती करावी अशाही त्यांनी यावेळी सूचना केल्यात.

आपत्ती व्यवस्थापनच्या निधीचे प्रस्ताव सादर करतांना आवश्यक असलेल्या कामासाठी निधीचे प्रस्ताव सादर करावे.

000000

..क्र-366                                                                      दि.21.05.2021

        शिक्षक पात्रता  परीक्षेचे प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन

वर्धा दि 21, (जिमाका):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद  पुणे  मार्फत जिल्हयात 2013 पासुन 2019 या कालावधीत घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र राज्य  शिक्षक पात्रता  परिक्षेमध्ये पात्र  झालेल्या विद्यार्थ्यांचे  प्रमाणपत्र  शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयास प्राप्त झालेले आहे. सदर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले असून  शिल्लक असलेले प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांनी घेउुन जावे असे आवाहन  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय मेहेर यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी  TET  परीक्षा  प्रवेशपत्र, गुणपत्रिका, डीटीएड, बीएड उर्त्तीण  गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, जात वैधता  प्रमाणपत्र, अंपगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र इत्यादी आवश्यक  कागदपत्रे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात सादर करुन   उपलब्ध करुन घ्यावे.

                                                                        0000

..क्र- 367                                                                     दि.21.05.2021

जुन महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

Ø प्राधान्य गट व अंत्योदय  अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत 

वर्धा दि.21  -राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना जुन महिन्याचे  अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात  आले आहे. प्रधानमंत्री गरीब  कल्याण योजने अंतर्गत  प्राधान्य गट योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्याना जुन महिन्याचे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत  देण्यात येणार आहे.

            नियमित प्राधान्य गट योजनेच्या  लाभार्थ्यांना  गहू प्रति व्यक्ती  3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये दराने, नियमितअंत्योदय अन्न योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. एपीएल शेतकरी योजना गहू प्रति व्यक्ती 3 किलो, तांदूळ  प्रति व्यक्ती  2 किलो.  गहू 2 रुपये दराने व तांदूळ 3 रुपये दराने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति व्यक्ती गहु 3 तांदूळ 2  किलो  व्यक्ती व प्रति शिधापत्रिका 1 किलो चनादाळ मोफत पुरविण्यात  येणार आहे. साखर फक्त अंत्योदय योजना प्रति शिधापत्रिका 1 किलो प्रमाणे किंवा साठा  उपलब्धतेनुसार 20 रुपये दराने देय राहील.

            केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 व्यक्ती 2 लिटर , 2 व्यक्ती  3 लिटर व 3 व्यक्ती वरील केरोसिन मिळण्‍यास पात्र शिधापत्रिका 4 लिटर याप्रमाणे देय राहील. गॅस सिलेंडर धारकांना केरोसिन देय राहणार नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                            00000

 

 

 

 

 

..क्र- 368                                                                     दि.21.05.2021

     राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार

Ø युवकांना मिळणार हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक हेल्थकेअर

 वर्कर क्षेत्रामधील प्रशिक्षण

           वर्धा दि 21 (जिमाका) : साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये  युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

            यासंदर्भातील कौशल्य विकास,रोजगार व  उद्योजकता विभागाचा सविस्तर शासन निर्णय १९ मे रोजी निर्गमित करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सध्या कोरोना साथीच्या अनुषंगाने तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ तयार ठेवण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण लवकरच सुरु करण्यात येईल. शिवाय कोरोनोत्तर काळातही या मनुष्यबळाचा उपयोग होणार असून या युवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगार मिळणार आहे.

           राज्यातील सर्व शासकीय इस्पितळे तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था यांची ग्रीन चॅनेलद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करुन त्यांची निवड करण्यात येईल. तसेच ज्या खाजगी इस्पितळांमध्ये २० पेक्षा अधिक बेड्स आहेत त्यांचीही व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करुन निवड करण्यात येईल. या संस्थांमार्फत युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण तुकडीमध्ये उमेदवारांची संख्या किमान २० व कमाल ३० असावी. परंतु विशेष बाब म्हणून या योजनेकरिता प्रशिक्षण तुकडीमध्ये एकूण प्रशिक्षणार्थ्यांची किमान मर्यादा ५ पर्यत करण्यास मुभा असेल.

वाहनचालक, ॲम्ब्युलन्स वाहनचालक या अभ्यासक्रमाचाही समावेश

        कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधांची ने-आण करण्यासाठी प्रशिक्षणामध्ये वाहनचालक तसेच ॲम्ब्युलन्स वाहनचालक या अभ्यासक्रमाचाही समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सक्षम यंत्रणेमार्फत पॅरामेडीकल कौन्सिलमध्ये करण्यात येईल.  प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांची सेवा किमान ६ महिने शासकीय किंवा खाजगी इस्पितळांना देणे अनिवार्य असेल. हे प्रशिक्षण प्राधान्याने ऑन जॉब ट्रेनिंग तत्त्वावर देण्यात येईल. याकरीता उमेदवारांचे वेतन संबंधित संस्थेकडून देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत टप्पेनिहाय प्रशिक्षण शुल्क कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल, असे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले.

         या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीही गठीत करण्यात आली असून यामध्ये सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन यांचे सचिव व इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कौशल्य विकास आयुक्त हे या कार्यक्रमाचे नियंत्रक अधिकारी असतील.

 

00000000

No comments:

Post a Comment